- आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला नांदेड व
परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्यधाके
जाणवली यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा भूकंपाची
तीव्रता ही 4.2 रिश्टर स्केल इतकी होती तर भूकंपाचा केंद्रबिंदू
हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे होता
अजूनही नागरिक एकमेकांना फोन करून याबाबतीत विचारणा करत आहेत