मुदखेड तालुक्यातील छोटेसे गाव ईजळी मुदखेड शहरापासून जवळच असलेलं या गावांमधील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती
परंपरागत शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी मुळे शेतकरी चांगलाच परेशान होता पर्यायी शेतीला जोडधंदा असावा
ही संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात आली व शेतकरी हळूहळू शेतीपूरक व्यवसाय (AGRI bSUINESS) कडे वळू लागले याच गावामध्ये रुस्तुम मुंगल पाटील
हे आपल्या तीन मुलासहित राहतात मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुस्तुम भाऊंनी शेतामध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला व आपले
वडिलोपार्जित घर सोडून त्यांनी शेतामध्ये घर बांधलं व आता मुलांना पुढे काय करा लावायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला
फक्त पाच एकर जमीन असल्यामुळे एवढं मोठं कुटुंब चालवायचं कसं असाही प्रश्न रुस्तुमरांवांपुढे आला पण कुठल्याही परिस्थितीवर
मात करण्याची नैसर्गिक ताकद ही शेतकऱ्यांमध्ये आलेली असते त्यांनी सुद्धा बाजारपेठेचा अभ्यास चालू केला तेव्हा त्यांच्या लक्षात ही
आले की त्यांच्या घरापासून मुदखेड शहर हे दोन किलोमीटर आहे
त्यामुळे शहरातील लोकांना रोज लागणाऱ्या वस्तूचे उत्पादन करावे अशी संकल्पना रुस्तुमरावांच्या मनात आली व त्यांनी आपल्या मुलांशी
चर्चा केली सर्वांच्या मताने दुग्ध व्यवसाय चालू करावा असा ठराव झाला व रुस्तुमराव व त्यांचे तिन्ही मुले माहिती गोळा करण्यामध्ये व्यस्त झाली
त्यांच्या मुलांची नावे अभिमन्यू आनंद व अविनाश या तिघांनी वेगवेगळ्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचे बारकावे जाणून घेण्यास सुरुवात केली
नंतर प्रत्यक्षात दोन म्हशी विकत घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली व सर्वच काम ही घरातील व्यक्ती करू लागली त्यामुळे रोजगारांचा
प्रश्न सुटलाव त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये (MILK BUSINESS) फायदा होऊ लागला हळूहळू त्यांनी या व्यवसायाला वाढवायचे ठरवले व
आज घडीला त्यांच्याकडे 25 जनावरे आहेत
व महिन्याचे उत्पन्न हे लाखोंच्या घरात आहे तसेच जातिवंत दुधाळ जनावर तयार झाल्यामुळे हा व्यवसाय त्यांना फायदेशीर होत आहे
तसेच म्हैस विक्रीतुन व शेण विक्रीतुन पण मोठा फायदा होतो रोज जवळपास 70 लिटर दूध निघते त्याला सरासरी 60 रुपयाचा भाव येतो म्हणजे
चार हजार दोनशे रुपये रोज येतात खर्च वजा जाता त्यांना एक ते सव्वा लाख रुपये निव्वळ नफा होतो
दुग्ध उत्पादना (Milk production) मधून मोठ्या प्रमाणात कमी करत असताना मुंगल बंधुच्या लक्षात आले
की आपण नवनवीन तंत्रज्ञान अवगत केल्याशिवाय आपल्याला या व्यवसायाचा (Milk Business)
दुसरा टप्पा घाटचा येणार नाही व त्यामुळे त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या व पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेल्या
अनेक दुग्ध व्यवसायिकांना (Milk Business) भेटण्यास सुरुवात केली व त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या
गोठ्यामध्ये ते तंत्रज्ञान वापरून दूध कसे वाढवता येईल याकडे लक्ष देऊ लागले तसेच त्यांच्या गावापासून जवळ असलेल्या
पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे जाऊन येथील तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून औषध व न्यूट्रिशन याबाबतीत
माहिती गोळा करू लागले कारण त्यांना या माहितीचा उपयोग हा त्यांच्या व्यवसायासाठी होऊ लागला त्यांची जिद्द बघून
उदगीर येथील प्राध्यापक प्रफुल्ल पाटील यांनी त्यांच्या दुग्ध व्यवसायाला भेट देऊन त्यांना अनेक सल्ले दिले यामध्ये प्रामुख्याने
त्यांना मुरघास बनवायचे व दुधामधील फॅट (milk Fat) व एस एन एफ (S.N.F.) कसे वाढवायचे याविषयी मार्गदर्शन केले
तसेच गायीचा व म्हशीचा व्यायाम हा झालाच पाहिजे ही बाब त्यांच्या लक्षात अभ्यासांती आली त्यामुळे मंगल बंधूंनी मुक्त गोठा
पद्धतीचा अवलंब केला व या मुक्त गोठा पद्धतीमधून यांना अनेक फायदे होत गेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की
गोठ्यामध्ये साफसफाई होऊ लागली यामुळे रोगराईचे प्रमाण आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले
तसेच गोठ्यात स्वच्छता राहिल्यामुळे परजीवी ची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाली कारण मुक्त गोठा पद्धतीमध्ये
जनावराच्या अंगावर बगळे चिमण्या ह्या बसून त्यांच्या अंगावरील पिसवा गोचीड व यांचा सफाया ते करतात त्यामुळे दुग्ध
उत्पादनामध्ये त्यांना अचानक वाट पाहायला मिळाली तसेच मुक्त गोठा पद्धतीमध्ये फॉगर्स लावून उन्हाळ्यामध्ये गाई म्हशीचे
शरीर पाणी टाकून थंड करण्यास त्यांना मदत होऊ लागली अशाच पद्धतीने असे अनेक काम करण्याच्या पद्धती बदलून त्यांनी
चांगले यश संपादन केले जनावरांसाठी खलीच्या वाढणाऱ्या किमती ही दुग्ध व्यवसायिकांसाठी डोकेदुखी ठरते कारण त्यामुळे
उत्पादन खर्चामध्ये भरपूर वाढ होते व या कारणामुळे दुग्ध व्यवसाय हा तोट्यात जायला लागतो हे सर्व बघून त्यांनी घरामध्येच
एक मोठे गोदाम बांधले व या गोदाम मध्ये त्यांना वर्षभर लागणारी खली पेंड जेव्हा स्वस्त होते तेव्हा खरेदी करून ते या
गोदांमध्ये ठेवतात यामधून त्यांना खलीच्या किमतीमध्ये 20 ते 30 टक्के नफा होतो व पुढे हाच नफा त्यांचे दुग्ध उत्पादनाचा
खर्च कमी करून त्यांना फायद्याचा सौदा ठरतो असेच काही दुग्ध व्यवसायामध्ये प्रयोग मुंगल बंधू करू लागले असे करत करत
त्यांनी कडबा कुट्टी मशीन मुरघास बनविणे मुक्त गोठा पद्धत यासारखे प्रयोग करून आपला व्यवसाय फायद्यात आणला
त्यांच्याकडे एक जातिवंत रेडा आहे व त्यापासून होणारी वासरांची उत्पत्ती ही चांगल्या दर्जाची होते पुढे चालून त्यांच्या दुधाच्या
प्रमाणामध्ये सुद्धा वाढ होते यांचा हा रेडा आजूबाजूंच्या गावांमध्ये खूप प्रसिद्ध आहे
मागील अनेक वर्षापासून श्रीमंत व्हायचं स्वप्न उराशी बाळगून मुंगल बंधूंनी कुठल्याही कार्यक्रमाला जाणे टाळले जर अत्यावश्यक
असेल तर तिघांपैकी कोणीतरी एक जाऊन त्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतो यामुळे या तिन्ही भावांचं लक्ष हे 24 तास त्यांच्या
डेरी फार्म कडे असते व यामुळे घरामध्ये सुद्धा एकोपा राहतो
तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एकत्र बोलून त्यांनी वेळोवेळी व्याख्यानेचे आयोजन केले त्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा नवनवीन
तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांचा फायदा होऊ लागला त्यापैकी एका शेतकऱ्यांनी आपल्या मित्रासमवेत इजळी गावामध्ये सरकी पेंड
चा कारखाना चालू केला व आजूबाजूच्या गावातील लोकांना ही बाजारभावापेक्षा 50 रुपये कमीनी पेंड विकायला सुरुवात केली
त्याचाही फायदा सर्वांनाच झाला आता गावातच पेण मिळत असल्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचला आधी त्यांच्या घराच्या
हाकेच्या अंतरावरून त्यांना पेंड मिळते यांच्या याही प्रयत्नाला मोठी यश आले व एका सुशिक्षित व्यक्तीला स्वतःच्या गावातच काम
मिळाले आता त्यांनी असे ठरवले आहे की आपण लवकरच दुग्ध प्रक्रिया उद्योगांमध्ये उतरायचे असं त्यांचं ठरलेलं आहे यासाठी
लागणारा तंत्रज्ञान व ज्ञान या दोन्ही गोष्टीसाठी ते काम करत आहेत व त्यांना निश्चित यश येईलच असे मला वाटते काही मुदखेड
शहरातील नोकरदार वर्ग हे उच्च प्रतीचे दूध मिळते म्हणून थेट त्यांच्या गोठ्यावर येऊन दूध घेऊन जातात त्यामध्ये त्यांची विक्री
ही दिवसाकाठी 60 ते 70 लिटर एवढी होते त्यामुळे बाजारात जाऊन कुठलाही वेळ वाया जात नाही तिन्ही भावांनी कामाचे
नियोजन वाटून घेतल्यामुळे कामाचा अतिरिक्त दबाव कोणावरही येत नाही सगळ्यात मोठे बंधू हे गुलाबाच व्यवसाय करतात
व सकाळी लवकर उठून दूध सुद्धा काढू लागतात त्याच्यानंतर चे मधले बंधू बाजारात जाणे दूध विक्री करणे घरचं व दुग्ध व्यवसायात
लागणाऱ्या सामानांची खरेदी करणे ही सर्व जबाबदारी यांच्यावर आहे तर लहान या भावावर साऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी आहे
संध्याकाळी चार ला जाऊन हे सर्वजण चारा कापतात व ट्रॅक्टर मध्ये घेऊन मोठ्यात येतात लगेच दूध काढण्यासाठी त्या राहतात
साधारणतः संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांची पूर्ण काम होते त्यामुळे कामाचा जास्त ताण राहत नाही
आता रुस्तुमरावांनी दोन मजली सुंदर घर बांधले आहे व ते आता मुलांना शेतामध्ये मार्गदर्शन करतात एकीचे बळ मिळते फळ या म्हणीप्रमाणे रुस्तम राव यांच्या परिवाराने एक राहिल्यामुळे किती फायदा होतो याचं मोठं उदाहरण जगासमोर उभे केले आहे
चारा आणण्यासाठी नेण्यासाठी एक ट्रॅक्टर घेतला आहे व दूध वाहतुकीसाठी दोन मोटरसायकल आहेत
त्यांनी व्यवसायाचे गमक सांगताना असे सांगितले की कामामध्ये सातत्य व उच्च प्रतीचे दूध उत्पादन व योग्य नियोजन जनावराची नियमित तपासणी’ वेळेवर औषध उपचार लसीकरणाचे काटेकोर पालन चाऱ्याचे योग्य नियोजन ही यशाची सूत्रे आहेत
आज एक जातिवंत रेडा त्यांच्याकडे आहे
रुस्तुम रावांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा शेतीनिष्ठ शेतकरी हा सन्मान मिळाला आहे
या परिवाराचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी जिद्दी व माहिनतीच्या जोरावर त्यांनी आर्थिक बाजू भक्कम केली आहे त्यांना त्यांच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा