सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजना हा चर्चेचा विषय झाला आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा पद्धतीचा योजना सरकारने जाहीर
केलेले आहेत व सरळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये काही रक्कम टाकली जात आहे यामुळे राज्यातील एक गट आनंदी आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा
शेतकरी मात्र सध्या त्रस्त झाला आहे कारण अनंत अडचणी आहेत पण या अनंत अडचणीमध्ये महत्त्वाची आहे मजूरदारी(farm laborer) करणाऱ्या लोकांनी शेतीकडे
आता पाठ फिरवली आहे आणि शहरी भागात जाऊन कमी कष्टाची कामे करण्याकडे त्यांचा उभा आहे यामुळे सध्या शेती करण्यासाठी मजूरच(farm laborer) मिळत नाही
ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळतात या समस्येचे मूळ कारण काय आहे व यावर समाधान काय आहे याविषयी या लेखामध्ये आपण चर्चा करूया
शेतीचे काम हे इत्यादी त्याची नाही तर यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळे लागतेच आणि त्यासाठी लागणारे मजूर(farm laborer) हे पूर्वी गावात भेटत होते पण
सध्या परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे मजूर(farm laborer) शेतीमध्ये काम करायला तयारच नाही व जे तयार होतात त्यांचा रोज हा शेतकऱ्याला न परवडण्यासारखा आहे
याची काही प्रमुख कारणे आम्ही शोधली आहे
1)सरकारकडून मिळणारे मोफत धान्य
(Free food grains from the government)
लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत राशन योजना ही पुढील वर्षी चालू राहणार अशी घोषणा केली. कोविड लॉकडाऊनच्या काळात सुरू
झालेली ही योजना ही नंतर वाढत गेली हे सुद्धा कारण मजूर(farm laborer) न मिळण्यासाठी कारणीभूत आहे कारण मोफत धान्य मिळाल्यामुळे आता काम कशासाठी
करायचे असा प्रश्न मजूर(farm laborer) शेतकऱ्यांना विचारतात धान्य सोडून बाकी लागणारा भाजीपाला व बाकी गोष्टींसाठी एक दोन दिवस काम केलं तर ते पुरेसे आहे
मग शेतात राबायचं कशासाठी आपल्या राजकीय फायद्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्ष हे अशा पद्धतीच्या योजना काढतात पण या योजनांचा परिणाम काय होईल
याविषयी सहसा ते चर्चा करताना दिसत नाहीत पण अशा पद्धतीच्या मोफत योजनांमुळे माणसांमधली कार्यशक्ती ही क्षीण होत चालली आहे कारण पूर्वी असं म्हटलं जायचं
देरे हरि पलंगावरीअसंच काही सध्या घडताना चित्र दिसत आहे मोफत धान्य मोफत इलाज यामुळे काम कशासाठी करायचं हा प्रश्न मजूर(farm laborer) सध्या विचारत आहेत
असाच काही अनुभव मला आला आहे आम्ही कधी असं म्हणणार नाहीत की गरिबांना मोफत राशन देऊ नका पण त्यासाठी काही निकष असणं सुद्धा गरजेचे आहे कारण अशा
योजनांमुळे शेतकरी तर अडचणीत आहेत पण उद्योग धंदे सुद्धा अडचणीत येत आहेत उद्योगपती हे कुठल्याही किंमतीमध्ये मजुरांना घेण्यासाठी तयार आहेत पण ती आर्थिक परिस्थिती
ही शेतकऱ्यांची नसल्यामुळे शेतकरी हा उद्योजकांनी इतका रोज देऊ शकत नाही
2)मतदारांना आकर्षित करण्यासाठी बनविल्या गेलेल्या योजना
(Schemes designed to attract voters)
राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत हे डोळ्यापुढे ठेवून सत्ताधारी पक्षाने सध्या योजनांचा धडाका लावला आहे यामध्ये प्रामुख्याने लाडली बहीण योजना लाडका
भाऊ योजना अशा पद्धतीच्या योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये प्रतिमा हा दीड हजार रुपये सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहेत त्यामुळे मजुरी करणाऱ्या
महिलांनी आता शेतीकडे पाठ फिरवली आहे कारण त्यांना उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे हे त्यांना घरी बसून भेटत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी रोजंदारीवर शेतात
जाऊन काम करण्याची मानसिकता काही महिला मजुरांची(farm laborer) राहिलेली नाही
3)रोजगार हमी योजनेचा कार्यप्रणाली बदलावी लागेल
(The functioning of the Employment Guarantee Scheme will have to be changed)
गावातील विविध काम करण्यासाठी रोजगार हमी ही योजना अत्यंत सुंदर योजना आहे पण या योजनेचा सुद्धा परिणाम हा शेतीला मजूर न मिळण्यासाठी होत आहे प्रत्येक
शेतकऱ्याची एकच मागणी आहे की ज्यामध्ये सरकार ज्याप्रमाणे रोजगार हमी मध्ये गावातील मजुरांना(farm laborer) पक्का असा काही दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देतात
व त्या बदल्यात पैसे व धान्य देतात पण या योजनेचा मनाव तेवढा फायदा हा दिसत नाही आता शेतकऱ्यांची मागणी आहे की रोजगार हमी मधूनच शेतीच्या कामासाठी सुद्धा
मजूर(farm laborer) द्यावीत आणि त्या बदल्यात शेतकरी पैसे द्यायला तयार आहे यामध्ये मजुरांचा(farm laborer) फायदा हा असा होईल की एक तर रोजगार हमीचे सरकारचे
पैसे मिळतील व दुसरे उत्पन्न म्हणजे शेतकऱ्यांनी दिलेले पैसे यामुळे मजुरांचे(farm laborer) उत्पन्नही दुप्पट होऊ शकते यासाठी गरज आहे ती शासन स्तरावर या योजनेमध्ये
काही बदल करावे लागतील ज्यामुळे शेतकरी व शेतमजूर दोघांचाही फायदा यामधून होऊ शकतो
4)शहरी भागांकडे असलेला नागरिकांचा कल
(Tendency of citizens towards urban areas)
सध्या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर(farm laborer) तसेच त्यांचे मुले यांचा एक सध्या शहराकडे मोठ्या प्रमाणात
दिसत आहेमोठ्या शहराप्रमाणे तालुक्याचे ठिकाणी जास्त रोज भेटल्यामुळे शेतीच्या कामाकडे मजुरांनी(farm laborer) पाठ फिरवली आहे
व अशा व्यवस्थेमुळे शहरी भागावर येणारा लोकसंख्येचा ताण यामुळे तिथली सुद्धा व्यवस्था आहे की कोलमडून पडली आहे व ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मजुरांची समस्या तयार झाली आहे
5)शेतीमालाला कमी हमीभाव नसणे
(Lack of guarantee for agricultural produce)
शेतीमालाला भाव नसणे हे सुद्धा खूप मोठे कारण आहे कदाचित तुम्ही या मताशी सहमत नसाल पण आज मी पिकवलेल्या मालाला उद्या बाजारात किती भाव येईल हे
शेतकऱ्यांना माहीत नसते त्यामुळे शेतीवर कुठलाही खर्च करताना शेतकऱ्यांना शंभर वेळेला विचार करावा लागतो कारण आपण केलेला खर्च आप निघेल की नाही याबद्दलच
शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असते आणि कित्येक वेळा तर उत्पादन खर्चही हा शेतमालातून निघणे अवघड जाते त्यामुळे मजूर(farm laborer) लावून एखाद्या पिकाचे
योग्य नियोजन कराव असं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतं पण पुढे हमीभाव नसल्यामुळे हा खर्च करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहतात आणि एका अर्थाने त्यांचे बरोबरचे
कारण एवढी मेहनत करून जर पुढे पदरात काहीच पडत नसेल तर करायचं कशासाठी अनेक वेळा अनेक नेत्यांनी अनेक सरकारांनी आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देऊन असे
सांगितले पण योग्य तो हमीभाव अद्याप मिळालेला नाही कधी कांदा कधी सोयाबीन तर कधी कापूस तर कधी हळद या सर्वच पिकां बाबतीत विचार केला तर यांचा खर्च निघणं
सुद्धा अवघड कधी कधी होतं तर मजुरांवर(farm laborer) खर्च करायचा तरी कुठून हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यां पुढे उभा असतो
6)नवीन पिढीने शेतीकडे पाठ फिरवली
( The new generation turned their backs on agriculture)
सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतीची एकूण परिस्थिती पाहता नवीन पिढी आता शेती करण्यासाठी फारशी इच्छुक दिसत नाही व या शेतीतून बाजूला जाण्यासाठी काही पर्याय नवयुवकांनी
हुडकून काढलेले आहेत एखाद्या छोट्या कंपनीत नोकरी करणे मुलांचे शिक्षण हे कारण लावून शहरी भागात जाऊन राहणे शहरी भागात राहून मी शेतीकडे लक्ष देतो असे
सांगणेवरीलपैकी कारण कुठलेही असो पण नवीन पिढीने शेतीकडे पाठ फिरवायला चालू केलेली आहे त्यामुळे त्या घरातील कर्ता पुरुष याच्या एकट्यावरच शेतीचे ओझे पडले आहे
पण काही प्रमाणामध्ये काही युवकांनी पुढाकार घेऊन शेतीमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे व निश्चित ज्या नवयुवकांचा कल हा शहरी भागाकडे आहे त्यांच्यापेक्षा जास्त
उत्पन्न ही शेतकऱ्याची मुलं काढत आहेत हेही समाजामधलं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे
7)व्यसनाचे प्रमाण वाढले
( Addiction rate increased)
व्यसन हे सुद्धा मजुरांची(farm laborer) समस्या वाढायला कारणीभूत ठरत आहे यामध्ये ग्रामीण असो का शहरी भाग असो येथे वाढलेल्या व्यसनाच्या सवयीमुळे
मजुरांची(farm laborer) कार्यशक्ती कमी झालेली आहे त्यामुळे ते शेतीत नाही तर कुठेच काम करायला तयार नाहीत
वरील सर्व कारणांचा विचार केला यामध्ये अजून भरपूर कारणे ही मजूर(farm laborer) समस्येसाठी निघू शकतात पण या समस्येवर यांत्रिकीकरण हा एकमेव पर्याय आहे
पण शेवटीलाही यंत्र करण्यासाठी मानवाची गरज भासते त्यामुळे शेतीला मजूर हे लागणारच आहे तरीपण शेतकऱ्यांनी यांची करण्याच्या मदतीने मजूर(farm laborer) समस्येवर
मात करण्याचा प्रयत्न करावा वरील आपण सर्व कारणे वाचले तर तुमच्या लक्षात येईल की यातली एकही समस्येचे समाधान हे आपल्या हातात नाही शासन स्तरावर निर्णय घ्यावे
लागतील व शासनाची उदासीनता ही आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यामुळे आपण स्वतः काही गोष्टींचा अभ्यास करून यांत्रिकीकरण करून या मधुर समस्या मधून कायमस्वरूपी
बाहेर पडणं जरुरी आहे
यासाठी अजून एक पर्याय म्हणजे समूह शेती आपल्या गावातील वैयक्तिक हेवेदारी विसरून आपण सामूहिक शेतीचा प्रयोग करून मजूर(farm laborer) समस्येवर बऱ्यापैकी
आळा घालू शकतो आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये एकमेकांच्या शेतात जाऊन त्यांचे काम करून द्यायचे व आपलेही काम करून घ्यायचे अशा पद्धतीची व्यवस्था ही आजही आहे
म्हणजे खूप पूर्वी सुद्धा आपल्या पूर्वजांना माहिती होतं की उद्या मजूर(farm laborer) समस्या होऊ शकते यामुळे कदाचित समूह शेतीची संकल्पना त्यावेळेला आपल्या मागच्या
पिढीने वापरली असेल केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीप्रमाणे आपणही समस्येवर लक्ष देण्यापेक्षा समाधानावर लक्ष देणे गरजेचे आहे व या काळया आईचे
सेवक आहोत आणि आपण घेतलेला काळया आईच्या सेवेचा वसा आपण दुसरं कोणाकडे बघून टाकायचं नाही
हा लेख आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा ठेवतो व आपली यावर प्रतिक्रिया ही जरूर आपण खाली नोंदवावी हीच नम्र अपेक्षा
टीप-हा लेख मला आलेला अनुभव व मला आलेल्या मजुरांची अडचणी च्या अनुभवानंतर मी हा लेख लिहिला आहे कदाचित काहीजण माझ्या या अनुभवाशी सहमत नसू शकतात कुठल्याही सरकारी योजनांना संकल्प टुडे विरोध नाही