अमरावती -अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा
या कायम आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहतात बऱ्याच प्रयत्नानंतर नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघांमधून भाजपाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी मिळाली या उमेदवारी देखील मित्र पक्षांनी विरोध केला
यामध्ये बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर होते त्यांनी आपल्या पक्षातर्फे एक उमेदवार अमरावती लोकसभेमध्ये उभा केला त्यामुळे नवनीत राणा यांना मोठे आव्हान तयार झाले
एका जाहीर सभेमध्ये बोलताना नवनीत राणा यांनी
भाजपाचा प्रचाराचा जो मुख्य मुद्दा आहे नरेंद्र मोदी
यांची लाट यावरच राणा यांनी टीका केली त्या म्हणाल्या
2019 मध्ये मोदी लाट तरीपण मी अपक्ष निवडून आलेच
त्यामुळे मोदी लाटेवर भरोसा न ठेवता आपल्या आपल्या
कामाला लागा असे आव्हान त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना
केले यामुळे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे काँग्रेस म्हणते की आम्ही आधीच म्हटलं होतं की मोदी
लाट नाही यावर आज राणा यांनी याला दुजोरा दिला आहे
तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपा कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहे आता हे पहावं लागेल की राणादांपत्य या कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार व नरेंद्र मोदी लाटेचा काय परिणाम होईल हे निकालच्या दिवशी स्पष्ट होणारच आहे