आयोध्या 22 जानेवारी ला आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
झाल्यापासून लाखो भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले व कोट्यावधी
रुपयाचे दान दिले या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अनेक चमत्कार होत आहेत
असं ऐकायला मिळत आहे पण एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
यामध्ये चक्क एका गरुड पक्षाने राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून
प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची परिक्रमा करायला चालू केले ते पाहून तेथील भक्त
आश्चर्यचकित झाले प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या भोवती गोल प्रदक्षणा मारण्यास
या गरुड पक्षाने सुरुवात केली तेथील सुरक्षा रक्षकांना काय करावे ते कळत नव्हते
पुजारी तिथे आले काही वेळानंतर परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर हा पक्षी सरळ बाहेर निघून गेला
पुरणाच्या मते गरुड पक्षी हा भगवान विष्णूचे वाहन आहे आणि प्रभू रामचंद्र हे भगवान
विष्णूचेच अवतार आहेत त्यामुळे त्यांच्या वाहनाने त्यांची परिक्रमा केली
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे