पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल च्या नावाखाली अडवणूक करत असाल तर तुमच्या विरुद्ध एफ आर आय करण्यात येईल अशा सूचना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिल्या
आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकर्स अधिवेशनात बोलताना केले राज्यातील सर्व बँकांना गतवर्षीपासून वारंवार सूचना करून देखील बँका कुठले ना कुठल्या कारणांमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यामध्ये अडवणूक करतात व यात प्रामुख्याने तुमचा सिबिल स्कोर हा चांगला नसल्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही हे कारण पुढे करतात पीक कर्ज देताना सिबिल स्कोर पाहू नका असा राज्य शासनाचा आदेश असून देखील बँका या आदेशाला केराची टोपली दाखवतात आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना स्पष्ट सूचना केल्या की सिबिल स्कोर मागितला आणि त्यामुळेच कर्ज नाकारले तर तुमच्यावर एफ आर आय होईल मग आमच्याकडे येऊ नका अशाही सूचना बँकांना दिल्या यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे शेतकऱ्यांची कुठेही अडणूक किंवा फसवणूक झाली नाही पाहिजे याकडे सरकारचे बारकाईने लक्ष आहे आणि वारंवार आम्ही नाबार्ड व बँकांना सूचना करून सुद्धा बँका आमच्या सूचनांकडे कानाडोळा करत आहेत त्यामुळे पाऊल उचलावं लागत आहे असेही याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलं
सिबिल स्कोर म्हणजे काय
मुळात सिबिल स्कोर म्हणजे काय हे समजून घेणे जरुरी आहे मराठीत आपल्याला सांगायचं तर सिबिल म्हणजे तुमची कर्ज फेडण्याची पत ही ठरविण्याचे एक माप म्हणजेच सिबिल स्कोर हा सिबिल स्कोर एक पासून ते हजार पर्यंत असतो व आपल्याला कर्ज मिळवायचे असेल तर किमान 700 चा सिबिल स्कोर हा चांगला समजला जातो आपण कुठल्याही बँकेमधून कर्ज तो उचललं तर त्याचा हप्ता हा वेळेच्या वेळी दिला तर या सूचना बँका सिबिल ला करतात व त्या पद्धतीने सिबिल तुमचा स्कोर हा कमी किंवा जास्त करतो यामुळे कर्ज हा ग्राहक वेळच्यावेळी परत करतो व जर सिबिल स्कोर 700 च्या खाली असेल तर बँका तुम्हाला कर्ज देण्यापासून किंवा नकार देतात आणि मग मात्र कुठली बँक तुम्हाला कर्ज देत नाही त्यामुळे आपला सिबिल चांगलं ठेवणे हा फार महत्त्वाचे आहे
शेतकरी आणि सिबिल स्कोर
मुळात शेतकरी हा सध्या अनेक अडचणींमध्ये अडकलेला आहे पर्यावरण आणि दिलेला दगा नैसर्गिक संकट किंवा मानवनिर्मित संकट यामुळे शेतकरी कायमस्वरूपी हा संकटांमध्ये ग्रासलेला असतो अनेक समस्यांना तोंड देत शेतकऱ्यांना शेती करावी लागते पण आपल्या पेरणीसाठी शेतकरी हे बँका वर अवलंबून असतात आणि पेरणीच्या आधी पीक कर्ज वाटप होणं गरजेचं असतं पण इथे सुद्धा बँका ऑगस्ट महिन्यापर्यंत पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया चालू ठेवतात त्यामुळे जून महिन्यामध्ये पेरणी कशी करायची हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असतो आणि जेव्हा शेतकऱ्यांनी पेरलेले अन्नधान्य जेव्हा बाजारात येते तेव्हा व्यापारी हे अडून पाहून शेतीमालाचे भाव पाडतात व शेतकऱ्यांपुढे वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि कधीकधी हा शेतीमाल विक्री करण्यासाठी त्यांना पुढच्या जून ची सुद्धा वाट बघावी लागते अशामध्ये पीक कर्ज नूतनीकरण करण्यासाठी पैसे शेतकऱ्यांकडे नसतात आणि ह्या एका कारणांमुळे शेतकरी वेळेवर पीक कर्ज फेडू शकत नाही आणि याचा परिणाम हा थेट त्यांच्या सीबीलोवर होतो कारण तुम्ही वेळेत जर कर्ज फेडलं तरच तुमचा सिबिल स्कोर हा चांगला राहतो अन्यथा तो खराब होतो खराब झालेल्या सिबिल स्कोरवर शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात आणि मग शेतकरी खाजगी सावकारांच्या विळख्यात अडकतात य दुसरी गोष्ट म्हणजे एकदा सिबिल स्कोर खराब झाला की कर्ज मिळणे बंद होते व कर्ज मिळाल्याशिवाय सिबिल स्कोर परत एकदा चांगला करता येत नाही याला दुसरा पर्याय नाही त्यामुळे सिबिल स्कोर खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे बँका पाठ फिरवतात व शेतकरी अत्यंत अडचणीत येतो यामुळे सरकारने काही वर्षांपूर्वी पीक कर्ज देताना सिबिल स्कोर ची अट शिथिल केली होती बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल च्या कारणामुळे पीक कर्ज देत नाही असं म्हणू नये सिबिल स्कोर न बघता पीक कर्ज द्यावे अशी योजना सरकारने काढली पण बँका या सूचनांकडे गांभीर्याने पाहत नाहीत व खराब झालेल्या सिबिल स्कोर मुळे शेतकरी कुठे कर्जही घेऊ शकत नाही व त्याच्या समोर दुसरा पर्याय सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे शेती व्यवस्था ही कोलमडून जातीची काय हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे
आजच्या घोषणांचा काय फायदा होईल
आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना काही सूचना केला यामध्ये सिबिल स्कोर बाबतीत सुद्धा त्यांनी बँकांना सूचना केल्या याप्रसंगी बोलताना आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे आणि जर तुम्ही सिबिलच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असाल तर तुमच्याविरुद्ध एफ आर आय होईल आणि नंतर तो एफ आर आय घेऊन माझ्याकडे येऊ नका अशाही सूचना याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिल्या आता या संदर्भामध्ये बँका काय निर्णय घेतात ते आता पहावे लागेल पण कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज हा एकमेव पर्याय आहे ही योजना चांगली आहे पण याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे तेवढे जरुरी आहे सरकारी स्तरावर पीक कर्जाबाबतीत एखादी समिती गठित करून जर याविषयी कारवाई केली तर अधिक चांगले होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कारण प्रत्येक शेतकरी हा बँकांच्या विरुद्ध तक्रारी करण्याचे धाडस दाखवत नाही व जे लोक धाडस दाखवतात त्यांचे काम बँका लगेच करतात त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
प्रताप काळे
उद्यान पंडित पुरस्कार विजेता प्रगतशील शेतकरी गाव धानोरा काळे तालुका पूर्णा जिल्हा परभणी
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला दिलेल्या सूचना ह्या अत्यंत चांगल्या आहेत व यामुळे शेतकऱ्यांना सिबिलच्या नावाखाली कर्ज ना करणाऱ्या बँकांवर यामुळे लगाम बसेल व पीक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया ही सुलभ होईल आता गरज आहे ती बँकांनी शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयाप्रमाणे मदत करण्याची तसेच शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्या पीक कर्जाचे परतफेड ही नियमित व वेळेत करावी जेणेकरून आपल्याला आणखीन कर्ज मिळविण्यासाठी त्याचा फायदा होईल व तसेच बँका व शेतकरी यांच्यामध्ये समन्वय असण्याचीही गरज आहे
बंडू पाटील वडजे
प्रगतशील शेतकरी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता गाव
हळदव तालुका लोहा जिल्हा नांदेड
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना ज्या काही सूचना केल्या आहेत त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले आहेत यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत व याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे लोहा तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यासाठी सिबिल मुळे अडवणूक करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा असे आव्हान मी शेतकऱ्यांना करीत आहे शासन हे शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे
आता हे पाहावं लागेल की बँका या सिबिल च्या नावाखाली शेतकऱ्यांची आडवणूक करणार नाही ही अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही पण मागे दिलेल्या आदेशाला जसं बँकांनी केराची टोपली दाखवली तशी या वेळेला दाखवू नये हीच नम्र अपेक्षा बँकांनी सुद्धा शेतकरी अडचणीत आहे हे समजून त्याला त्रास होऊ नये असे प्रयत्न करावे म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे व शेतकरी इथला राजा आहे
Recent News
पीककर्ज देताना सिबिल अडथळा आणल्यास FIR दाखल करणार देवेंद्र फडणवीस
पीक कर्ज देताना सिबिल स्कोर पाहु नका