मनोज जरांगे पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
यांच्या मध्ये आरोप प्रति आरोप हे हे चालू आहेत
विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मनोज जरांगे पाटील
यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करणार
असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले यानंतर
मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले व याच
दरम्यान लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व
आचारसंहिता लागली व आचारसंहिता लागल्यामुळे
मनोज जरांगे पाटील यांना सभा घेण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली पण जरांगे पाटील हे न्यायालयात
जाऊन त्यांनी सशर्त परवानगी मिळवली काल एका
पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं
की मला रात्री एक वाजता व तीन वाजता देवेंद्र फडणवीस
साहेब यांचा फोन आला व त्यांनी मराठा आंदोलकावर
दाखल केलेली गुन्हे याबाबतीत चर्चा केली
अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली मागील काही दिवसापासून मराठा समाज हा महायुतीवर नाराज आहे
ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची
आंतरवाली सराटी येथे भेट घेतली होती आता हे पहावं
लागेल की जरांगे पाटील यावर नेमकी काय भूमिका घेतात