नवी दिल्ली नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये(Delhi Assembly Elections) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून दिल्लीमधील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये 699 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे पण आज मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये( EXIT POLL)भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या सत्तेत विराजमान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत

दिल्ली विधानसभा निवडणूक(Delhi Assembly Elections)
दिल्ली मधील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीमध्ये 60% एवढे मतदान झाल्याची नोंद आहे तर सर्वाधिक मतदान हे दिल्ली मधील मुस्तफाबाद येथे झाले असून त्या ठिकाणी 66.7% एवढे मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद ही करोल बाग मध्ये झाली असून त्या ठिकाणी 47.4% एवढे मतदान झाले आहे तसेच दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये 47 ते 51 टक्के मतदान झाले आहे तर 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये 51 ते 55 टक्के मतदान झाले आहे तर 27 विधानसभा मतदारसंघांमध्ये 55 ते 59 टक्के मतदान झाले आहे तर 22 विधानसभा मतदारसंघां मध्ये 59 ते 63 टक्के मतदान झाले आहे आणि चार विधानसभा मतदारसंघां मध्ये 63 ते 67% मतदान झाले आहे
हे हि वाचा –Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या बातमी आणि अपडेट
आपण जर दिल्ली विधानसभा मतदारसंघाचा मागील चार विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघायला गेलो तर दिल्लीमधील मागील चार विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान हे 60% च्या वर झालेली आहे 2013 मध्ये दिल्लीमध्ये 65.6% मतदान झाले आहे 2015 मध्ये 67.1% मतदान झाले होते तर 2020 मध्ये 62.6% एवढे मतदान झाले होते
एक्झिट पोल मध्ये कोणाला किती जागा ? (How many seats in the exit poll)
मतदानाची वेळ संपल्याबरोबर दिल्ली विधानसभेसाठी वेगवेगळ्या संस्थांनी एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले यामध्ये दोन संस्थांचे एक्झिट पोल( EXIT POLL)वगळता बाकी सर्व एक्झिट पोल( EXIT POLL)करणाऱ्या संस्थानांनी भारतीय जनता पार्टी हीच सत्तेमध्ये येणार असल्याचा अंदाजा व्यक्त केला आहे या एक्झिट पोल( EXIT POLL)मध्ये मैट्रीज या संस्थेने आम आदमी पार्टी ला 32 ते 37 जागेच्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे तर भारतीय जनता पार्टीला 35 ते 40 च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाजा व्यक्त केला आहे तर काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाजा व्यक्त केला आहे

पीपुल्स इनसाइट या संस्थेने आम आदमी पार्टीला 25 ते 29 जागा मिळतील अशी शक्यता दिली आहे तर भारतीय जनता पार्टी 40 ते 44 एवढ्या जागी विजय होऊ शकतील असा अंदाज व्यक्त केला आहे तर काँग्रेसला शून्य ते एक या दरम्यान जागा मिळू शकतात
पीपुल्स प्लस च्या एक्झिट पोल( EXIT POLL)प्रमाणे आम आदमी पार्टी या पक्षाला १० ते १० च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज आहे तर भारतीय जनता पार्टीला 51 ते 60 च्या दरम्यान जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे तर काँग्रेसला पीपुल्स प्लस यांच्या एक्झिट पोल( EXIT POLL)प्रमाणे एकही जागा मिळणार नाही असा अंदाजा व्यक्त केला आहे

जेवीसी पोल्स च्या एक्झिट पोल( EXIT POLL)प्रमाणे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला 39 ते 45 च्या दरम्यान जागा मिळतील तर आम आदमी पार्टीला 22 ते 31 च्या दरम्यान जागा मिळतील आणि काँग्रेसला शून्य ते दोनच्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज जेवीसी पोल्स मे व्यक्त केला आहे
चाणक्य स्ट्रॅटेजीज च्या एक्झिट पोल( EXIT POLL)प्रमाणे आम आदमी पार्टीला 25 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पार्टीला 39 ते 44 च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला दोन ते तीन जागांच्या दरम्यान समाधान मानावे लागेल असा अंदाजा चाणक्य स्ट्रॅटेजीज नी व्यक्त केला आहे
पोल डायरी च्या एक्झिट पोल( EXIT POLL)नुसार दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला 18 ते 25 च्या दरम्यान जागा मिळण्याच्या शक्यता आहे तर भारतीय जनता पार्टीला 42 ते 50 च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला शून्य ते दोन च्या दरम्यान जागा मिळू शकतात
डीवी रिसर्च च्या एक्झिट पोल( EXIT POLL)नुसार आम आदमी पार्टीला दिल्लीमध्ये 26 ते 34 च्या दरम्यान जागा मिळू शकतात तर भारतीय जनता पार्टीला 36 ते 44 च्या दरम्यान जागा मिळू शकतात डीवी रिसर्च च्या एक्झिट पोल( EXIT POLL)नुसार काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे
वि प्रिसाइड च्या एक्झिट पोल( EXIT POLL)नुसार आम आदमी पार्टीला दिल्लीमध्ये एकूण 46 ते 52 च्या दरम्यान जागा मिळू शकतात तर भारतीय जनता पार्टीला मात्र 18 ते 23 च्या दरम्यान जागा मिळू शकतात काँग्रेसला शून्य ते एक पर्यंत जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे
एकंदरीत आपण वरच्या दिलेल्या एक्झिट पोल( EXIT POLL)च्या आकड्यानुसार जर पाहायला गेलं तर फक्त दोनच एक्झिट पोल( EXIT POLL)करणाऱ्या संस्थांनी आम आदमी पार्टी परत सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवली आहे तर बाकी सर्व एक्झिट पोल( EXIT POLL)करणाऱ्या संस्थांनी भारतीय जनता पार्टी हा पक्ष सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवली आहे
मॅट्रिज व वी प्रिसाइड या दोन संस्थांनी आम आदमी पार्टी सत्तेत येईल अशी शक्यता वर्तवली आहे पण या एक्झिट पोल( EXIT POLL)च्या आकड्यांमध्ये कोणत्याच एक्झिट पोल( EXIT POLL)करणाऱ्या संस्थांनी काँग्रेसला शून्य ते तीन याच दरम्यान जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे आपण जर गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकालावर नजर टाकली तर 70 पैकी 62 जागी आम आदमी पार्टी विजयी झाली होती
तर आठ जागी भारतीय जनता पार्टी विजयी झाली होती आणि काँग्रेसला खात सुद्धा उघडता आलं नव्हतं तसं पाहायला गेलं तर मागील पाच वर्षात दिल्लीमध्ये घडलेल्या घडामोडीचा स्पष्ट परिणाम हा दिल्ली विधानसभेच्या एक्झिट पोलवर सध्या तरी दिसत आहे आणि आम आदमी पार्टी हा पक्ष सत्तेपासून दूर जाणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत भारतीय जनता पार्टीची दिल्लीमध्ये वापसी होऊ शकते अशी सुद्धा शक्यता एक्झिट पोलच्या आकड्यावरून दिसत आहे
हे हि वाचा –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
आपण दिल्ली विधानसभेचा विचार करायला गेलो तर दिल्लीमधील मतदार हे लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभा राहताना दिसतात तर विधानसभेला मात्र एक हाती सत्ता आहे अरविंद केजरीवाल यांच्या हातात देताना आपण पाहिलेले आहे पण मागील पाच वर्षांमध्ये अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता घटली असल्याची चर्चा अनेक प्रसार माध्यम करत होते आणि त्याचाच उठणा कुठे फटका हा या निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे कथित मद्य घोटाळा,दूषित झालेली यमुना नदी आणि वाढतं प्रदूषण यामुळे दिल्लीची जनता त्रस्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले होते या गोष्टींचा सुद्धा परिणाम या निवडणुकीवर झाले असल्याची शक्यता आहे
हे हि वाचा –GOLD RATE-सोन्याचे दराने तोडले सर्व रेकॉर्ड? प्रति १० ग्राम साठी मोजावे लागतील ऐवढे पैसे?
दोन-तीन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी ज्या विद्यमान आमदारांना आम आदमी पार्टीने उमेदवारी दिली नव्हती त्यांनी आम आदमी पार्टीच्या सदस्यांचा राजीनामा दिला व याप्रसंगी त्यांनी केलेले पोस्ट देखील बरीच व्हायरल झाली
शेवटीला हे एक्झिट पोलचे आकडे आहेत आणि बऱ्याच वेळेस एक्झिट पोल( EXIT POLL)च्या आकड्याच्या वेगळी निकाल देखील लागलेले आहेत तर बऱ्याच वेळेला एक्झिट पोल( EXIT POLL)च्या आकड्याच्या आसपास ही निकाल लागलेले आहेत आता हे एक्झिट पोलची आकडे किती खरे आणि किती खोटे यासाठी आपल्याला आठ फेब्रुवारी पर्यंत ची वाट पाहावी लागेल पण एक्झिट पोल( EXIT POLL)ने मिळालेल्या संकेतानुसार भारतीय जनता पार्टी ही दिल्लीमध्ये सरकार बनवेल अशी शक्यता दिसत आहे