दिल्ली विधानसभा निवडणुकीची(Delhi Election Result 2025) मतमोजणी आज झाली यामध्ये आम आदमी पार्टीचा(Aam Aadmi Party) सुपडा साफ झाला आहे व दिल्लीमध्ये आता भारतीय जनता पार्टी(BJP)चे(BJP)नवे सरकार स्थापन होणार आहे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)व मनीष सिसोदिया हे दोघेही या निवडणुकीमध्ये पराभूत झाले आहेत
हे हि वाचा-Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या बातमी आणि अपडेट
दिल्ली विधानसभेत साठी मतमोजणी(Delhi Election Result 2025) आज झाली यामध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party) मोठे अपयश आले तर तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी(BJP)ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे कथित मद्य घोटाळा व मागील दहा वर्षापासून समाधानकारक काम न केल्यामुळे आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party) जनतेने नाकारला आहे व भारतीय जनता पार्टी(BJP)ला घवघवीत यश आले आहे
दिल्ली विधानसभा मतमोजणी(Delhi Election Result 2025)
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सगळ्या देशाचे लक्ष हे दिल्ली विधानसभा मतमोजणीकडे(Delhi Election Result 2025) होते यामध्ये भारतीय जनता पार्टी(BJP)ला यश आले 2020 च्या विधानसभा निवडणुकीचा आपण जर विचार केला तर दिल्ली विधानसभे मध्ये 70 जागा आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टी(BJP)ला तेव्हा केवळ मात्र आठ जागा मिळाल्या होत्या तर आम आदमी पार्टीला एकूण 62 जागा मिळाल्या होत्या 2025 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र एकदम उलटे पाहायला मिळाले यामध्ये आम आदमी पार्टीला केवळ 22 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पार्टी(BJP)ला तब्बल 48 जागा मिळाल्या काँग्रेस व इतर कोणालाही एकही जागा मिळाली नाही 2020 च्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती व 2025 च्या ही निवडणूक मध्ये
त्यामुळे दिल्लीची निवडणुकी भाजपामय झाल्याचे पाहायला मिळाले आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party)दिल्लीमध्ये हॅट्रिक करता आली नाही तर भाजपाला तब्बल 27 वर्षानंतर बहुमता सत्ता मिळवता आली या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी मधील दिग्गज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया त्याचबरोबर सौरभ भारद्वाज दुर्गेश पाठे आणि सत्येंद्र जैन हे पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीमध्ये पराभूत झाले या निकालानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांनी जनतेचा हा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो अशी प्रतिक्रिया दिली तसेच त्यांनी भाजपाला विजयाबद्दल अभिनंदन देखील केले भारतीय जनता पार्टी(BJP)ने लोकांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र होऊन चांगली कामे करावीत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आम आदमी पार्टीला दुसरा धक्का म्हणजे त्यांच्या 36 विद्यमान आमदारांपैकी 21 आमदार हे पराभूत झाले आहेत तसेच या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टी(BJP)चेअध्यक्ष जेपी नड्डा हे बीजेपी(BJP) मुख्यालयाला पोहोचले आहेत काही वेळामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील बीजेपी (BJP) मुख्यालयात पोहोचतील व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील
आम आदमी पार्टीच्या पराभवाची कारणे(Reasons for the defeat of Aam Aadmi Party)
आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party)आलेल्या अपयशामध्ये अनेक कारणं आहेत पण त्यातील मुख्य कारण म्हणजे मागील दहा वर्षापासून एकाच मुद्द्यावर निवडणूक लढविणे हे देखील आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party) जबरदस्त फटका देऊन गेली आहे दिल्लीमध्ये चांगले रस्ते दिल्लीमध्ये वायु प्रदूषण कमी करणार व यमुना नदीची साफसफाई या विषयावर मागील दोन-तीन निवडणुका पासून अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)निवडणूक लढवीत आहेत अगदी 2020 च्या निवडणुकी मध्ये त थेट केजरीवाल यांनी मतदारांना सांगून टाकले जर पुढच्या पाच वर्षांमध्ये दिल्लीमध्ये चांगले रस्ते यमुना नदीची सफाई साफ पाणी तुमच्या घरामध्ये नळाने येणार व वायु प्रदर्शन कमी करणार जर या गोष्टी मी करू शकलो नाही तर पुढच्या वेळेला मला मतदान करू नका असेही सांगितले होते आणि त्या समस्या जशाच्या तशा आहेत त्यामुळे दिल्लीची जनता नाराज असल्याच्या चर्चा आहेत
कथित मध्ये घोटाळा दिल्लीमध्ये नवीन अबकारीनीती मुळे कथित मध्ये घोटाळा समोर आला आणि मनीष सिसोदिया आणि स्वतः माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांना अटक झाली त्यांना कारागृहात राहावं लागलं भ्रष्टाचाराविरुद्ध आवाजउठून त्याला एका आंदोलनाची रूप देऊन अरविंद केजरीवाले सत्तेत आले होते आणि या कथीत मध्ये घोटाळ्यामुळे कारागृहात अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांना जावे लागले होते त्यांनी कारागृहात बसूनच काही दिवस दिल्लीची सत्ता चालवली बाहेर आल्यानंतर त्यांनी आतिशीजी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री केले पण त्याचा काही फायदा झाला नाही
अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांनी राजकारणात आल्यानंतर आपण सरकारी गाडी वापरणार नाही सरकारी बंगला वापरणार नाही सुरक्षा रक्षक बरोबर ठेवणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा केल्या होत्या त्यावर काही दिवस अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)त्या तत्त्वावर चालत देखील राहिले पण त्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांनी सरकारी गाडी वापरायला सुरुवात केली सरकारी सुरक्षा देखील घेतली आणि दिल्लीमधील मुख्यमंत्री निवासाची चर्चा ही सबंध वर्षभर राहिली त्यावर केलेला कोट्यावधी खर्च हा देखील चर्चेचा विषय राहिला त्यामुळेच अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांना निवडणुकीमध्ये नुकसान झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे
सबंध निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते(Aam Aadmi Party)हे प्रचार करताना त्यांच्यामध्ये कुठेही जोश दिसत नव्हता त्याचाही फटका हा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला या उलट भारतीय जनता पार्टी(BJP)च्या मायक्रो प्लॅनिंग मुळेच भारतीय जनता पार्टी(BJP)ला यश देखील मिळाले आहे
भारतीय जनता पार्टी विजय होण्याची कारणे(Reasons for Bharatiya Janata Party’s victory)
भारतीय जनता पार्टी(BJP) या निवडणुकीमध्ये विजयाच्या कारणांपैकी एक कारण आहे ते 12 लाखापर्यंत करा मधून सवलत कारण दिल्लीमध्ये सर्वाधिक मतदार हे सरकारी नोकरदार आहेत त्यामुळे त्यांना बारा लाखापर्यंतच्या करा मध्ये सूट मिळाल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना झाला त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टी(BJP)ला भरभरून मतदान केल्याचे चर्चा आहे
तसेच नरेंद्र मोदी यांच्या शब्दावर देखील विश्वास ठेवला नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणातून मोदी की गॅरंटी हा शब्द वारंवार उच्चारतात त्यांनी जो शब्द दिला तेथे शब्द पाळतात अशी एक इमेज लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली आहे त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टी(BJP)ला झाला आहे

उत्तर प्रदेश मध्ये झालेला विकास पाहता त्यालगत असलेल्या दिल्लीमध्ये देखील लोकांना डबल इंजिन सरकारचे महत्त्व कळाले आणि त्यामुळेच आपणही भारतीय जनता पार्टी(BJP)च्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन पहावी या विचाराने देखील भारतीय जनता पार्टी(BJP)ला दिल्लीतील मतदारांनी मतदान केले कारण याआधी दिल्लीतील जनतेने काँग्रेसला आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party)बहुमत देऊन पाहिले होते त्याचा फारसा फायदा झाला नसल्यामुळे यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी(BJP)ला पसंती दिली
भारतीय जनता पार्टी(BJP)च्या मायक्रो प्लॅनिंग मुळे देखील भारतीय जनता पार्टी(BJP)ला यश मिळाले आहे बुथ लेवल पर्यंत व्यवस्थित प्लॅनिंग केली व स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला याचाही फायदा हा भारतीय जनता पार्टी(BJP)ला मोठा झाला आहे

कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री(Who will be the Chief Minister of Delhi?)
दिल्ली निवडणुकीमध्ये आलेल्या यशानंतर भारतीय जनता पार्टी(BJP)मध्ये सध्या चर्चा चालू आहे ती दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार आता या गोष्टीचा निर्णय हा भारतीय जनता पार्टी(BJP)चा पार्लमेंटरी बोर्ड करणार आहे तरी पण काही नावांची चर्चा ही सध्या चालू आहे यामध्ये पहिलं नाव आहे
प्रवेश वर्मा(PRAVESH VARMA) यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(ARVIND KEJRIWAL)यांचा पराभव केला आहे तसेच त्यांच्या समोरील दुसरी उमेदवार हे काँग्रेसचे संदीप दीक्षित हे होते या तिरंगी लढतीमध्ये प्रवेश वर्मा हे विजयी झाले आहेत
कपिल मिश्रा(KAPIL MISHRA)यांनी आम आदमी पक्षाचा गैर कारभार हा मतदारांसमोर मांडला होता ते सुद्धा मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत
विजेंदर गुप्ता2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीची(Aam Aadmi Party)जबरदस्त हवा असताना देखील दोन्ही वेळेला दिल्लीतील रोहिणी विधानसभा मतदार संघामधून विजेंदर गुप्ता हे निवडून आले होते यंदाही त्यांनी हॅट्रिक केली आहे त्यामुळे ते देखील मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत
हे हि वाचा-Union Budget 2025- मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी
सतीश उपाध्याय(SATISH UPADHAY) अगदी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणाशी संबंधित आहेत त्यांनी राष्ट्रीय स्वयं संघ विद्यार्थी परिषदेमध्ये काम केले आहे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील पाहिले जात होतं
मंजिंदर सिंग सिरसा(Manjinder Singh Sirsa) हे दिल्लीतील शिक समुदायाचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी याआधी दोनदा विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे त्यामुळे मंजिंदर सिंग सिरसा हे देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत