दसऱ्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये एकूण चार मुख्य दसरा मिळावे(DASRA MELAVA) पार पडले यामध्ये मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)व उद्धव ठाकरे (UDHAV TAHKRE)यांच्या दसरा मेळाव्याचा समावेश होता या मेळाव्यांमध्ये काय काय वक्तव्य झाली ते आपण पाहूया
हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी असलेला एक दसरा या सणाला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे याच दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते दसरा मिळावे चार ठिकाण होते बीड जिल्ह्यातील नारायण गड बीड जिल्ह्यातील भगवानगड तर मुंबईमध्ये शिवतीर्थ शिवाजी पार्क आणि आझाद मैदान मुंबई या ठिकाणी चार दसरा मिळावे पार पडले आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे चारीही दसरा मेळावे अत्यंत महत्त्वाचे ठरले
मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)यांचा नारायण गड येथील दसरा मेळावा(DASARA MELAVA)
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)यांनी बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे एका दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते गेल्या महिन्यात आपल्या उपोषणाला स्थगिती दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)हे नेमकं काय बोलतात याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं नेमकं मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागलं होतं
नारायण गडावर जमलेली अफाट गर्दी मनोज रंगे पाटील यांची समाजनिष्ठा सिद्ध करणारी होती याप्रसंगी बोलताना मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)यांनी नारायण गडाचे पावित्र्य राखून कुठलीही राजकीय भाष्य केले नाही तर कोणत्याही राजकीय व्यक्तीचा नावाचाही उल्लेख जरांगे पाटील यांनी टाळला याप्रसंगी बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाज राज्यासाठी झिजणाऱ्या या समाजात चा खुन्नस ठेवून डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर उलथवून टाकल्या शिवाय राहणार नाही
असा इशारा त्यांनी सरकारला नाव न घेता दिला आचारसंहिता लागण्याच्या आधी जर मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर पुढील भूमिका आपण नंतर जाहीर करू असे म्हणत जरांगे पाटील यांनी दंड देखील थोपटले शेतकऱ्यांना अनुदान नाही पिक विमा नाही शेतकरी त्रस्त आहेत असेही मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)यांनी सांगितले तसेच मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज यांच्या आरक्षणाचा प्रश्नही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला बंजारा समाजाच्या प्रवर्गाचाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला जरांगे पाटील यांनी थेटपणे कोणाचाही उल्लेख केला नाही पण ते नेमके कोणाबद्दल बोलत होते हे मात्र लपलेले नाही
या मेळाव्यासाठी 900 एकर मैदानावर ही सभा घेण्यात आली होती 500 क्विंटलचा बुंदीचा प्रसाद ही तयार करण्यात आला होता
पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)व धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत भगवानगड येथील दसरा मेळावा(DASARA MELAVA)
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवानगड येथे संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती दरवर्षी दसऱ्याला गोपीनाथराव मुंडे आवर्जून भगवानगडावर येत असत त्यांनी सुरू केलेली परंपरा गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या आमदार पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)यांनीही पुढे सुरू ठेवली या वर्षीच्या दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे की कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या मळ्याव्याला उपस्थिती लावली याप्रसंगी बोलताना पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)यांनी लोकसभा निवडणुकीत गडबड झाली पण ती पुसून टाकायची आहे आता मी राज्याचा दौरा करणार आहे व वंचितांना दलितांना कोणी त्रास देणाऱ्याला हिशोब घेतला जाईल असे वक्तव्य यांनी केले भगवानगडा वरील मेळाव्यामध्ये सुद्धा कुठलेही राजकीय भाष्य पाहायला मिळाले नाही पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)व कृषी मंत्री धनंजय मुंडे या दोघांनीही मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)यांचा उल्लेख करणे टाळले या मेळाव्यासाठी धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)यांनी आपली सर्व शक्ती या मेळाव्यात लावल्याचे दिसून आले या मेळाव्याला ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघेही उपस्थित होते
- हेही वाचा-http://नारायण गडा वरील दसरा मेळावा महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदलणार का? https://sankalptoday.com/will-the-dasara-mela-at-narayan-fort-change-the-political-equation-in-maharashtra/
शिवतीर्थावरील उद्धवजी ठाकरे यांचा दसरा मेळावा(DASARA MELAVA)
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा(DASARA MELAVA) घ्यायची परंपरा चालू केली होती तीच परंपरा आजवर चालू आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धवजी ठाकरे यांनी ही परंपरा चालू ठेवली शिवसेनेच्या फुटी नंतर दोन दसरा मिळावे घेण्यात येऊ लागले या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे (UDHAV TAHKRE)यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला याप्रसंगी बोलताना आज न्याय मंदिराचे दरवाजे ठोठावुन होऊन हात दुखत आहेत पण आम्हाला न्याय मिळाला नाही असे वक्तव्य उद्धव ठाकरे (UDHAV TAHKRE)यांनी केले दोन महिन्यानंतर आमचे सरकार महाराष्ट्रात येणार आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर आपण बांधणार असेही सांगितले नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज हे मत मिळवायचे यंत्र वाटते छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले जाती जातीत भांडण भाजपा लावत आहे असाही आरोप ठाकरे यांनी केला आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर धारावीचे टेंडर आम्ही रद्द करू असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे (UDHAV TAHKRE)यांनी दिले या मेळाव्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला संबोधित केले याप्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप देखील केले
तसेच या मेळाव्यामध्ये खासदार संजय राऊत शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांचेही भाषण झाली
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)यांचा दसरा मेळावा(DASARA MELAVA)
शिवसेनेच्या फुटी नंतर दोन दसरा मेळावे व्हायला लागले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)यांनी पहिला दसरा मेळावा(DASARA MELAVA) हा बीकेसी एमएमआरडीए च्या मैदानावर घेतला होता पण त्यानंतर दोन दसरा मेळावे हे आझाद मैदान मुंबई येथे घेण्यात आले याप्रसंगी बोलताना एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)यांनी आज मोरू दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी चकरा मारत आहे असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (UDHAV TAHKRE)यांना लगावला
तसेच या दाढी वाल्यानेच महाविकास आघाडीला उध्वस्त केले दाढी होती म्हणून उध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी असा टोलाही विरोधकांना एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)यांनी लगावला
आज काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटत आहे मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे मला हलक्यात घेऊ नका असे ही एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)यांनी सांगितले
हेही वाचा-http://स्व.रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://sankalptoday.com/ratan-tata-was-cremated-with-state-honors/
या मेळाव्यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी होलार समाजासाठी महामंडळ नसल्याचे सांगितले तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)यांनी होलार समाजासाठी सरकार महामंडळ स्थापन करेल असे सांगितले तसेच वंजारी समाजासाठी सुद्धा लवकरच महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणाही केली
वरील सर्व दसऱ्या मेळाव्यामध्ये मराठवाड्यातील दोन दसरा मिळावे यामध्ये राजकीय भाष्य पाहायला मिळाले नाही पण मुंबईमधील दोन्ही दसरा मेळाव्यात एकमेकांवर जबरदस्त टीका झाल्याचे पाहायला मिळाले
होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज झालेल्या मेळाव्यातील टीकेला प्रचारा दरम्यान निश्चित दोन्हीही गट उत्तर देतील
मुंबईमधील दोन्हीही दसरा मेळाव्यामध्ये जनतेच्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बगल दिल्याचे दिसत आहे पडलेले शेतमालाचे भाव वाढलेल्या किमती वाढलेली बेरोजगारी याविषयी कुठलेही भाष्य या मेळाव्यामध्ये पाहायला मिळाले नाही
मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)यांच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी राज्य सरकारला दिले अल्टिमेटन हेही खूप महत्त्वाचे आहे कारण अवघ्या काही तासांमध्ये राज्यांमध्ये आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वी राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल खरंच कुठला मोठा निर्णय घेईल की नाही हे पाहावे लागेल जर असा निर्णय घेतला नाही तर मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)नेमकी काय भूमिका घेतात हे मात्र अत्यंत महत्त्वाचे असेल
एकंदरीत वरील चारही दसरा मेळाव्याचे परिणाम हे आपल्याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चित पाहिला मिळतील राजकीय दृष्ट्या हे चारीही दसरा मिळावे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत
गजानन चव्हाण