महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवड्याचा वेळ झालेला आहे तरी पण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मुख्यमंत्रीपदासाठी काही नावांची चर्चाही जोरात चालू आहे पण प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट नाही
एक आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी लोटून देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याविषयी महायुतीमध्ये काही निश्चित ठरताना दिसत नाही कधी एकनाथराव शिंदे यांचे नाव समोर येतं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस (DEVENDRA FADVANIS)हेच विराजमान होतील अशाही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात महायुतीला या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील नेमकं मुख्यमंत्री पदाचा निर्णय का होत नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे
आपण जर थोडे काही वर्ष मागचा विचार केलात तर एक खूप मोठी गोष्ट आपल्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण होतो आणि दोन-तीन दिवसाचा कालावधी जातो तेव्हा तेव्हा त्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे धक्का तंत्र समोर आले आणि नवीन चेहरा हा मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळाल
उत्तर प्रदेश मध्ये भाजपाचे धक्का तंत्र
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले तेव्हा केशव प्रसाद मोरया हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चा उत्तर प्रदेश मध्ये होत्या केशव प्रसाद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांना वाटत होतं पण मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्ड मध्ये आठवड्याच्या वर वेळ गेला आणि यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत नसलेले नाव समोर आले आणि ते नाव होते योगी आदित्यनाथ(YOGI ADITYNATH)लोकसभेचे खासदार असलेले योगी आदित्यनाथ(YOGI ADITYNATH)हे आश्चर्यकारक रित्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर योगी आदित्यनाथ(YOGI ADITYNATH)हे चर्चेतच नव्हते तरी पण भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उत्तर प्रदेश ला नवीन मुख्यमंत्री मिळाला यामागे राजकीय विश्लेषक कारण सांगतात की मतांचे ध्रुवीकरण थांबविण्यासाठी योगींचे नाव आधी जाहीर केले गेले नाही कारण काहीही असो पण तीन दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर भारतीय जनता पार्टीने नवीन चेहरा हा मुख्यमंत्री म्हणून दिला
हे हि वाचा –Maharashtra Election Result:महाविकास आघाडीचा पराभव महायुतीचा विजय याची कारणे
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी नवीन चेहरा
उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे धक्का तंत्र पाहायला मिळाले राजस्थानमध्ये देखील माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे(VASUNDHARA RAJE)यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने राजस्थानमध्ये निवडणुका लढविल्या आणि भारतीय जनता पार्टीला राजस्थानमध्ये बहुमत देखील मिळाले हे बहुमत मिळाल्यानंतर वसुंधरा राजे(VASUNDHARA RAJE)याच मुख्यमंत्री होतील कारण याआधी देखील वसुंधरा राजे(VASUNDHARA RAJE)यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळलेली होती आणि राजस्थान सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव हे वसुंधरा राजे(VASUNDHARA RAJE)यांचेच होतं पण या ठिकाणी सुद्धा तीन दिवसाचा कालावधी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने भजनलाल यांच्या रूपाने नवीनच चेहरा हा मुख्यमंत्रीपदासाठी दिला उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये देखील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने तीन चार दिवसाचा वेळ घेतला होता आणि वसुंधरा राजे(VASUNDHARA RAJE)ऐवजी भजनलाल राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते
हे हि वाचा –One Nation One Election One Nation One Election|एक देश एक निवडणूक प्रस्ताव मंजूर
ओडिसा मधील भाजपाचे धक्का तंत्र
बऱ्याच वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला ओडिसा मध्ये सत्ता काबीज करता आली ओडीसा राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांमध्ये प्रमुख नाव होते धर्मेंद्र प्रधान यांचे धर्मेंद्र प्रधान यांच्याच नेतृत्वाखाली ओडिसा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमताचा आकडा गाठता आला आणि धर्मेंद्र प्रधान हेच ओडिशाचे मुख्यमंत्री होणार असे वाटत होते पण या प्रक्रियेला साधारणता आठवडा लागला आणि मोहन मांझी हे ओरिसाचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले धर्मेंद्र पधान हे मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना अगदी नवं नाव भारतीय जनता पार्टीने समोर आणले या प्रक्रियेमध्ये देखील साधारणता आठवड्याचा वेळ गेला होता
मध्यप्रदेश मध्ये शिवराज सिंग चव्हाण ऐवजी मोहन यादव मुख्यमंत्री
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे शिवराज सिंग चव्हाण हे होते मध्यप्रदेशचे सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे पाहिले जात होते त्यांनी सुरू केलेल्या लाडली बहीण योजनेची चर्चा सबंध देशांमध्ये झाली केंद्रीय नेतृत्वाने देखील मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली आणि भारतीय जनता पार्टी बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचली शिवराज सिंग चव्हाण हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार हे निश्चित समजलं जात होतं पण भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली कार्यालयात मात्र वेगळी चर्चा चालू होती आणि तीन-चार दिवसाचा वेळ गेल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शिवराज सिंग चव्हाण योजी मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा भारतीय जनता पार्टीने केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला याही संपूर्ण प्रक्रियेमध्ये तीन ते चार दिवसाचा वेळ हा दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना लागला होता आणि नवीन चेहरा हा देण्यात आला होता
2014 मध्ये महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडवणीस (DEVENDRA FADVANIS)यांच्या रूपाने नवीन चेहरा देण्यात आला होता
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला यश आले आणि नंतर चर्चा सुरू झाली ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल यामध्ये काही प्रमुख नावे होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पंकजाताई मुंडे आणि विनोद तावडे यांचे नाव देखील त्यावेळी चर्चेत होते या तिघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार ही चर्चा असताना दिल्लीमध्ये झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाली आणि हा निर्णय घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने घेतलेला वेळ हा देखील आठवड्याचा होता
वर चर्चा केलेल्या आपण सर्व उदाहरणांमध्ये आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की ज्या ज्या वेळी भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यासाठी तीन दिवसाच्या वर कालावधी लागला तेव्हा तेव्हा नवीन चेहरा हा समोर आलेला आहे हा भारतीय जनता पार्टीचा मागील काही वर्षाचा इतिहास आहे
आज महाराष्ट्र मध्ये देखील तशाच पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे नाव चर्चेत असताना दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर एकनाथराव शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही अशी घोषणा करून टाकली भारतीय जनता पार्टीने कोणालाही मुख्यमंत्री केले तरी आमचा पाठिंबा त्याला असेल अशी घोषणा देखील केली आणि एकनाथराव शिंदे यांच्या या घोषणेनंतर देवेंद्र फडवणीस (DEVENDRA FADVANIS)हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे तरी आज पर्यंत मुख्यमंत्री कोण होणार याविषयी स्पष्टता आलेली नाही सध्या तरी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा आहे
मग ही घोषणा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी एवढा वेळ का घेत आहे नेमकं दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे कळायला मार्ग नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस (DEVENDRA FADVANIS)हेच विराजमान होणार की भारतीय जनता पार्टीचे धक्का तंत्र महाराष्ट्रात काम करणार आणि अगदी नवीन चेहरा हा महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री असणार का?असा प्रश्न वरील काही राज्यांमध्ये घडलेल्या प्रक्रियेमुळे उपस्थित होतो
5 डिसेंबरला आझाद मैदानावर नेमकं कोण शपथ घेणार हे पुढील दोन दिवसाच्या आतच घोषणा होईल पण या दरम्यान नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये नेमकं काय घडणार याविषयी जनमानसाच्या मनामध्ये उत्सुकता आहे मुंबईमध्ये लवकरच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आहे या बैठकीमध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडेल व या बैठकीला वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी उपस्थित असतील अशाही चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे त्यांच्या मूळ गावी सध्या गेलेले आहेत त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हेही कळायला मार्ग नाही पुढील 48 ते 72 तास महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतील