महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असणार याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे मुंबई येथील आझाद मैदानावर शपथविधीचा मुहूर्त देखील ठरला आहे 5 डिसेंबर 2024 रोजी याच ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम संपन्न होईल पण अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर आलेला नाही या मागची कारण काय आहेत
23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले या गोष्टीला आता दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे तरीपण स्पष्ट बहुमतात असलेली महायुतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यासाठी दिल्लीत आणि मुंबईमध्ये बैठकांचे सत्र चालू आहे. सुरुवातीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा होऊ लागल्या पण नवी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा,देवेंद्र फडवणीस,अजित दादा पवार आणि एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत मध्ये नेमके काय ठरले याची स्पष्टता आलेली नाही
पण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही अशी घोषणा प्रसारमाध्यमां समोर केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)हे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी निघून गेले नंतर त्यांची तब्येत ठीक नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमां मध्ये आल्या एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)यांना भेटण्यासाठी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दीपक केसरकर सातारा येथे गेले पण एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)यांनी त्यांनाही भेटणं टाळलं आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या दोन दिवसानंतर एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)हे मुंबई येथे परत आले आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण नाराज नाहीत गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असे जाहीर केले
https://x.com/DrSEShinde/status/1863489795223150920?t=lQkKBZ-k1TGtccywjImITw&s=19
खासदार श्रीकांत शिंदे यांची पोस्ट (MP Shrikant Shinde’s post)
काळिजीवाहु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)नाराज आहेत आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे राज्याचे भावी उपमुख्यमंत्री असतील अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या पण स्वतः श्रीकांत शिंदे यांनी आज एक्स वर एक पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये असला कुठलाही विचार आमच्या चर्चेत नाही लोकसभेनंतर मला केंद्रामध्ये मंत्री व्हायची संधी मिळाली होती पण पक्ष वाढीसाठी मी ते मंत्रीपद स्वीकारले नाही आणि उपमुख्यमंत्री मी होणार या बातमीमध्ये तथ्य नसल्याचं त्यांनी पोस्टमध्ये लिहिले
आझाद मैदानावर शिवसेनेचे नेते फिरकलेही नाही(Leaders of Shiv Sena did not even walk on Azad Maidan)
5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथ ग्रहण समारंभासाठी आझाद मैदानावर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांनी तेथील कामाचा आढावा घेण्यासाठी ही मंडळी आझाद मैदानावर आली पण शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता हा आझाद मैदानाकडे फिरकला नाही आणि याच कारणामुळे शिवसेना व एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)हे दोघेही नाराज असलेल्या चर्चा सुरू झाल्या
CM NEWS-मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचं धक्कातंत्र ;कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार ?
12 मंत्रीपदावर शिवसेना ठाम(Shiv Sena holds on to 12 minister posts)
महाराष्ट्र राज्याच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये अति महत्वाचे बारा मंत्रालयाचे मंत्री हे शिवसेनेचे झाले पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या गटाकडून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना करण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमां मध्ये आली आहे जर शिवसेनेची ही मागणी पूर्ण केल्यास भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी आणखीन वाढणार आहे कारण अति महत्त्वाचे बारा विभाग जर शिवसेनेला दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वाट्याला कोणते मंत्रीपद येणार व त्याचा फायदा या दोन पक्षाला काय होणार या कारणामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या या मागण्या मान्य करायला तयार नसल्याच्या चर्चा आहेत याच मंत्रालयांमध्ये गृह विभागासारखे अत्यंत महत्त्वाचे मंत्रिपद देखील शिवसेनेलाच पाहिजे असल्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेता निवड चार डिसेंबर रोजी (Election of Legislative Party Leader of Bharatiya Janata Party on December 4)
महायुतीमध्ये मुख्यमंत्र्याच्या नावावर चर्चा चालू असताना नवी दिल्ली येथून निरीक्षक म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे उद्या विजय रूपाणी तर चार तारखेला निर्मला सीतारामन या मुंबईमध्ये येणार आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे आणि यामध्ये विधानसभेचा पक्षनेता कोण असेल या नावावर चर्चा होणार आहे व ते नाव अंतिम केले जाणार आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षच्या नियमा प्रमाणे गटनेता हाच राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यामुळे चार तारखेच्या बैठकीमध्ये निवडला जाणारा पक्षनेता हाच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री असेल
शिवसेनेला सोडून भाजपा सत्ता स्थापन का करत नाही ?(Why doesn’t BJP form the government leaving Shiv Sena?)
भारतीय जनता पार्टीकडे 132 एवढे आमदार आहेत तर राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा हा 244 एवढा आहे जर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोघांचे मिळून आमदारांची संख्या ही 176 एवढी होईल म्हणजेच बहुमतापेक्षाही जास्त आमदार असतील एवढे स्पष्ट बहुमत असून देखील शिवसेनेला डावळून भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करायला तयार नाही यामागे काही कारणे देखील आहेत
Maharashtra Election Result:महाविकास आघाडीचा पराभव महायुतीचा विजय याची कारणे
लोकसभेमध्ये शिवसेनेचे असलेले खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतात जर एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)यांनी आपल्या खासदारांचा पाठिंबा हा काढून घेतला तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचेही पक्ष एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून आहेत जर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर चंद्रबाबू नायडू व नितीश कुमार यांची ताकद वाढेल या गोष्टीचा विचार भारतीय जनता पार्टीची वरिष्ठ मंडळी निश्चित करेल या कारणामुळेच शिवसेनेला बाजूला सारून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे त्यामुळेच सरकार स्थापनेसाठी वेळ लागत असल्याची चर्चा आहे
5 डिसेंबर रोजी होणाऱ्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेना पक्षाचे किती मंत्री शपथ घेतात हे फार महत्त्वाचे आहे सध्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे शपथविधी तारीख जशी जशी जवळ येत आहे तसं तसं दिल्ली आणि मुंबई मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे काल अजित दादा पवार हे अचानक दिल्लीसाठी रवाना झाले लवकरच भारतीय जनता पार्टीचे काही बडे नेते एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे या भेटीदरम्यान मंत्रिमंडळाबाबतीत चर्चा होणार आहे महायुतीची तिन्ही घटक पक्ष हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे आता एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)नेमके किती मंत्री पद मागतात आणि भारतीय जनता पार्टी त्यांना किती मंत्रीपद देते हे फार महत्त्वाचे आहे
दरम्यान स्वतः गृहमंत्री अमित शहा आहे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सत्ता स्थापनेमध्ये ज्या आमदारांची वर्णी मंत्री म्हणून लागणार आहे त्यांचे आजपर्यंतचे कामाचे रिपोर्ट कार्ड हे अमित शहा पाहणार आहेत विशेष म्हणजे महायुतीच्या सर्वच घटक पक्षांमधील मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड अमित शहा हे पाहणार आहेत तसेच मागच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री ज्यांना याही मंत्रिमंडळ स्थान मिळू शकते अशा मंत्रांचेही वेगळे रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार आहे मंत्री म्हणून त्यांची कामगिरी मंत्रालयात कार्यालयात किती वेळ ते होते कुठले कुठले निर्णय घेतले याविषयी सविस्तर माहिती येणार आहेत
आणि या निर्णयामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेला प्रत्येकाच्या नजरा ह्या दिल्लीकडे लागले आहेत दिल्ली मधून झालेला निर्णय हा तिन्ही पक्षाला मान्य असेल ?
महाराष्ट्रातल्या जनतेचे मात्र एकच म्हणणे आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये नवीन सरकारची स्थापना व्हावी सत्ता स्थापनेसाठी दहा-बारा दिवसाचा वेळ का लागत आहे याविषयी वेगवेगळ्या चर्चा या सध्या सबंध महाराष्ट्रात चालू आहेत नेमकं मुख्यमंत्री कोण होणार मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार कोणत्या मंत्राला कोणती खाती मिळणार आणि एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)नाराज आहेत का ? अशा विविध चर्चा या सध्या पाहायला मिळत आहेत पुढील 24 तास ही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या 24 तासांमध्ये पक्षनेता निवडीच ची प्रक्रिया पार पडेल आणि महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन होईल