बाऱ्हाळी दि. १८
-
- मुखेड तालुक्याच्या लेंडी प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटी स्तर दृश्य पाऊस झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव भासवाडी, मारजवाडी हे गाव अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. आतापर्यंत जवळपास दीडशे जणांना राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी लहान बोटींच्या साह्याने बाहेर काढले असून अजूनही नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. यात प्रचंड वित्तहानी झाली असून मौजे हसनाळ येथे जिवितहानी झाली असल्याचा संशय आहे. तसेच अनेक म्हशी, गुरे जनावरे वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. मात्र जीवित हानीची अद्यापही अधिकृत माहिती आलेली नाही.
बाऱ्हाळी – मुक्रमाबाद – उदगीर व कर्नाटक सीमा भागात पडलेल्या मुसळधार पावसाने लेंडी नदीला पूर आला. लेंडी आंतरराज्य प्रकल्पाची गळभरणी करून ३३% पाणी अडविण्याची व्यवस्था केलेली आहे. गळभरणीच्या कामादरम्यान लेंडी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी “आधी पुनर्वसन, मगच धरण” अशी ठाम मागणी करत गळभरणीला विरोध दर्शविला.
मात्र प्रशासनाने संचारबंदी लागू करून गळभरणीचे काम केलेले आहे. रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पूर परिस्थिती अधिकच बिकट झाली त्यामुळे भेंडेगाव, भिंगोली, हसनाळ, रावणगाव , भासवाडी , मारजवाडी पुराच्या पाण्याखाली गेली. रावणगाव, हसनाळ , भासवाडी या गावातील २०० ते ३०० जण अडकले. त्यांच्या
मदतीसाठी प्रशासनाने तातडीने राज्य आपत्ती निवारण दलाच्या दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून आतापर्यंत लहानपोटीच्या साह्याने २५० पेक्षा जास्त महिला व नागरिकांना बाहेर सुरक्षित काढण्यात यश मिळविले आहे. अजूनही अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जवान कार्यरत आहेत .या महापुराने गावात सहा
गावातील गावकऱ्यांचे महत्त्वाची कागदपत्रे, अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य , गुरे – जनावरे वाहून गेले आहेत. यात काही जण दगावल्याची भिती व्यक्त होत आहे. पण अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार राजेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी उपस्थित राहून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. तर घटनास्थळी खासदार रवींद्र चव्हाण , माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, यांनी भेटी देत परिस्थितीची माहिती घेतली आहे.