केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची घोषणा केली आहे यामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांना,मुलींना पेन्शन(Pension)मिळणार आहे या बाल पेन्शन(Pension)योजनेची घोषणा केली आहे ही योजना काय आहे व या योजनेसाठी किती पैसे भरावे लागतील याविषयी माहिती घेऊया

संपूर्ण देशामध्ये अनेक कर्मचारी संघटनेचे जुनी पेन्शन(Pension)योजना लागू करण्यासाठी आंदोलन चालू आहे तसेच ईपीएफओ मध्ये सुद्धा पेन्शन(Pension)सुरू करण्यासाठी आंदोलन हे देशभर चालू आहेत यांची मागणी कधी पूर्ण होईल याविषयी सतत चर्चा होत याही अर्थसंकल्पा मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)या ईपीएफओ च्या पेन्शन(Pension)धारकांचा प्रश्न विचारलामार्गी लावतील असे वाटत होते पण यावर्षीच्या अर्थसंकल्पा मध्ये कुठलीही घोषणा ईपीएफओ संदर्भात झालेली नाही ? पण याच दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी असा काही निर्णय घेतला त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी चक्क देशातील बालकांसाठी ज्यांची वय शून्य ते 18 वयोगटातील आहेत त्यांच्या साठी पेन्शन योजना सुरु केली आहे या योजनेची सुरुवात ही 18 सप्टेंबर रोजी अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती सर्वांना काही ठराविक रक्कम भरून त्यांना पुढे चालून पेन्शन(Pension)देखील मिळणार आहे या योजनेचा उल्लेख या वेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी केला आणि या योजनेची सविस्तर माहिती काय आहे आपण अर्ज दाखल करू शकतो किती पैसे मिळू शकतात अशा अनेक प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न याल लेखाद्वारे करत आहोत

नेमकी ही योजना काय आहे
देशातील प्रत्येक मुलाचे भवितव्य हे सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने एक आगळी वेगळी योजना आणली आहे ही ही योजना NPS व PFRDA stands for Pension Fund Regulatory and Development Authority याचाच मराठीत अर्थ होतो पेन्शन(Pension)फंड नियामक आणि विकास प्राधिकरण. ही भारतातील राष्ट्रीय पेन्शन(Pension)प्रणाली आहे या योजनेमुळे पालकांना त्यांच्या मुला-मुलींच्या नावाने दरमाहा पैसे टाकता येतील व त्यांची मुलं मुली जेव्हा मोठे होतील तेव्हा नोकरी किंवा व्यवसाय सांभाळत देखील ते या योजनेमध्ये पैसे गुंतवून पेन्शन(Pension)मिळवू शकतात ही योजना भारतातील प्रत्येक घटकातील भारतीयांसाठी उपलब्ध आहे यामध्ये काही ठराविक रक्कम आपण प्रत्येक महिन्याला भरल्यास आपल्या पाल्यांना दरमाहा पेन्शन(Pension)देखील मिळू शकतो या योजनेचे नाव NPS वात्सल्य योजना आहे केंद्र सरकारची ही योजना ज्यामध्ये आपण ठराविक रक्कम गुंतवू शकतो व त्यानंतर आपण निवृत्ती वेतन खाते देखील उघडू शकणार आहोत
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने किंवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन देखील आपण या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतो आपले खाते तिथे काढू शकतो तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ENPS या पोर्टलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी सुद्धा खाते उघडू शकता या योजनेमधून परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देखील दिला जाणार आहे

NPS वात्सल्य योजनेसाठी अटी
ही योजना प्रत्येक भारतीय परिवारा साठी आहे या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी मुलाचे व मुलीचे वय हे 0 ते 18 वर्ष यादरम्यानच असले पाहिजे 18 वर्षावरील मुलामुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही प्रत्येकाला केवायसी करून घेणे अनिवार्य असेल या योजनेसाठी विकल्प आहेत यामध्ये डिफॉल्ट चॉईस या योजनेमध्ये 50% इक्विटी मध्ये गुंतवणूक केली जाईल दुसरा विकल्प आहे ऑटो चॉईस यामध्ये 25 ते 75 टक्के एवढी गुंतवणूक इक्विटी मध्ये टाकता येऊ शकते तसेच तीन वर्षानंतर 25% पर्यंत रक्कम आत्या मधून काढता येईल
महिन्याला किती पैसे जमा करावे लागतील
हे हि वाचा –Budget 2025-बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा
ही पेन्शन(Pension)योजना NPS वात्सल्य योजना या योजनेमध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी खाते निघाल्यानंतर आपण यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त अमर्याद पैसा आपण या योजनेमध्ये गुंतवू शकतो समजा तुमच्या मुलाचा जन्म किंवा मुलीचा जन्म हा आत्ताच झालेला आहे तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या नावे खाते काढू शकता व आजपासूनच रक्कम गुंतवायला चालू करू शकता जेव्हा तुमचे ते पाल्य 18 वर्षाची होईल तेव्हा ती खाते त्यांच्या नावाने होऊन जाईल तोपर्यंत पालक देखील त्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकतात
हे हि वाचा –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
NPS वात्सल्य योजनेमध्ये किती परतावा मिळू शकतो ?
समजा एखाद्या पालकाने आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने NPS वात्सल्य योजनेमध्ये खाते उघडले व त्यामध्ये दरमहा 1000 रुपये टाकायला सुरुवात केली आपण उदाहरणा दाखल धरू 18 वर्ष वयापासून सुरुवात केली खाते उघडल्यानंतर आपण त्यामध्ये जर आपण दरमहा 1500 रुपये जमा केले तर आणि ही रक्कम 18 वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत जमा केली तर यामध्ये जवळपास सात लाख वीस हजार रुपयाची गुंतवणूक होईल व आपण या गुंतवणुकीवर जर व्याजाचे प्रमाण काढले तर ते व्याज होतं जवळपास ३ कोटी 77 लाख एवढं व्याज या योजनेमध्ये मिळू शकतं अशा पद्धतीने तुमचा एकूण कॉपर्स हा तीन कोटी 83 लाख रुपयांचा होईल व त्यानंतर जर तुमच्या मुलाने आपले
हे हि वाचा –KAILAS MANSAROVAR YATRA कैलासा मानसरोवर यात्रेला भारत व चीन या देशांची सहमती
सर्व पैसे हे ॲन्युईटी प्लॅनमध्ये गुंतून पेन्शन(Pension)घेतल्यास त्या मुलाला ॲन्युईटी प्लॅनमध्ये व्याजदर हा फक्त पाच ते सहा टक्के असतो तरी तरीपण तुमच्या मुलाला वर्षाचे कमीत कमी 19 ते 23 लाखांचे व्याज मिळेल आपण जर याच रकमेला वर्षाच्या बारा महिन्यांनी भागाकार केला तर दर महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांचे हमी पेन्शन(Pension) मिळू शकते ज्या आई-वडिलांना मुलाच्या भविष्याची काळजी लागून असते त्यांना निश्चित या योजनेत पैसे गुंतवल्यास त्यांना चिंता करण्याची गरज राहणार नाही कारण की साठ वर्षानंतर प्रतिमा दीड ते दोन लाख रुपये पेन्शन(Pension)हे तुमच्या मुलाला मिळू शकते मुलगा जेव्हा अठरा वर्षाचा होईल तेव्हा तो या योजनेमधून सर्व पैसे विड्रॉल करू शकतो पण जर रक्कम ही अडीच लाखाच्या पुढे असेल तर मात्र फक्त 20% एवढीच रक्कम त्या मुलाला खात्यामधून काढता येईल व बाकी 80 टक्के रक्कम ही ॲन्युईटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकतात
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2056331
ही योजना सुरू केल्यानंतर जर पालकाचा किंवा पाल्याचा मृत्यू झाल्यास पालकाचा मृत्यू झाल्यास केवायसी करून नवीन एखादा नाव हे या योजनेमध्ये देता येऊ शकते पण जर पाल्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नावे असलेले पूर्ण पैसे हे त्याच्या आई-वडिलांना देण्यात येतील जर एखाद्या वेळेला आई-वडिलांच्या दोघांचा मृत्यू झाल्यास कुठलीही राशी जमाना करता सुद्धा अठरा वर्षापर्यंत हे खात चालू राहील ?
या योजनेबद्दल आणखीन काही माहिती पाहिजे असल्यास संबंधित वेबसाईटवर जाऊन आपण सर्व माहिती तपासून घ्यावी व जर आपल्याला ही योजना आवडली असेल तर आपण आपल्या पाल्यांसाठी पेन्शन(Pension)योजना घ्यावी
याआधी देखील सरकारने सामान्य नागरिकांसाठी अटल पेन्शन(Pension)योजनेची सुरुवात केली होती पण त्या योजनेला प्रतिसाद म्हणावा तेवढा मिळाला नाही असे बोलले जाते त्यामुळे याही योजनेचा प्रसार हा व्यवस्थित होणे गरजेचे आहे
नोट– सदरील लेख हा उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे सदरील लेख हा फक्त माहितीस्तव आहे कुठलीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक व सर्व दस्तावेज तपासून पाहून नंतरच गुंतवणूक करावी