विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने जन आरोग्य योजने(Jan arogya yojna)मध्ये मोठा बदल केला आहे आणि याचा फायदा देशातील कोट्यावधी जेष्ठ नागरिकांना(Senior citizens)होणार आहे
2019 मध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाचा सर्वात जास्त खर्च हा वैद्यकीय सेवांवर होतो एखादी घटना घडली तर आणि दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ आली तर मध्यमवर्गीयांना तसेच गोरगरिबांना पैशाच्या अभावामुळे आपला जीव गमवावा लागतो सरकारी दवाखान्यांमध्ये इलाज हा तितकासा चांगला होत नाही व गंभीर आजारांवर तर सरकारी दवाखान्यात इलाज व्यवस्थित केला जात नाही त्यामुळे सामान्य नागरिक हे खाजगी रुग्णालयाकडे जातात पण खाजगी रुग्णालयाची भरमसाठ फीस व तेथील वैद्यकीय सेवा शुल्क हे जास्त असल्यामुळे त्यांच्या खिशाला परवडत नाही अशा परिस्थितीमध्ये हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्रामधील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केला होता आणि जन आरोग्य योजना(Jan arogya yojna) याच योजनेला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुद्धा म्हणतात यामध्ये पूर्वी एका कुटुंबाला पाच लाखापर्यंत वैद्यकीय विमा मिळत होता जेणेकरून पाच लाखांपर्यंतचा खर्च हा संपूर्ण केंद्र सरकार करत होती त्याचा फायदा अनेकांना झाल्याचे एका पाहणी अहवालावरून दिसून आले पण यासाठी पात्र लोकांनाच आयुष्यमान कार्ड(ayushman card)मिळत होते पण काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेची व्याप्ती वाढून सत्तर वर्ष व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना(Senior citizens)आयुष्यमान कार्डाचे(ayushman card) वाटप केले जाणार आहे ज्यामुळे उतरत्या वयामध्ये त्यांच्या वैद्यकीय खर्चाला त्यांना त्यांच्या मुलांकडे पाहण्याची वेळ आता राहणार नाही या योजनेचे स्वागत जेष्ठ नागरिकांनी केले आहे
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(Jan arogya yojna)या योजनेची व्याप्ती वाढल्यानंतर याचा फायदा देशातील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना(Senior citizens) होणार आहे यामध्ये पाच लाखापर्यंत चा रुग्णालयात होणारा खर्च हा सरकार देणार आहे
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे
(Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana)
या योजनेची सुरुवात 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या नावाने ओळखली जाते यासाठी सरकारने काही निकष घालून दिलेले आहेत त्या निकषास पात्र असलेल्या परिवारांना आयुष्यमान कार्ड(ayushman card)वितरित केले जाते आणि या कार्डच्या आधारे पाच लाखापर्यंत चा इलाज हा मोफत केला जातो यामध्ये सरकारी रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांचा सुद्धा समावेश आहे यासाठी पात्र निकष असे आहेत की 2011 मध्ये सामाजिक आर्थिक व जातीगत जनगणना झाली होती या यादीवरूनच आयुष्यमान कार्ड(ayushman card)कोणाला द्यायचे याविषयी त्या निकषांवर कार्ड देण्यात आले
आयुष्यमान कार्ड(ayushman card)मिळविण्यासाठी सरकारच्या यादीत आपले नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी सरकारी रुग्णालयात मध्ये सुविधा उपलब्ध आहे तसेच आपण ऑनलाइन पोर्टल द्वारे सुद्धा आपण आपले नाव आहे की नाही ते तपासून शकतो ते कसे तपासायचे ते पाहूया
सगळ्यात आधी आपल्याला www.pmjay.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला mi eligible ऑप्शन दिसेल यावर क्लिक करून आपण आपला मोबाईल नंबर टाका लगेच आपल्याला एक ओटीपी येईल तो ओटीपी जशाच्या तशा त्यावर टाका नंतर आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे व त्यानंतर आपल्याला आपले राशन कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे लगेच समजून जाईल आणि जर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला तपासता येत नसेल तर यासाठी शासनाने टोल फ्री नंबर दिलेले आहेत ते अशा प्रकारचे आहेत
14555 व 1800111565 या टोल फ्री क्रमांक वर आपण
कॉल करून आपण माहिती घेऊ शकता जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला आपले आयुष्यमान कार्ड(ayushman card)हे डाऊनलोड करून घ्यावे लागेल व स्वतःजवळ ठेवावे लागेल हे काढ कसे डाउनलोड करायचे ते आता पाहूया
आयुष्यमान कार्ड(ayushman card)कसे डाउनलोड करायचे
यासाठी आपल्याला पहिला पर्याय आहे तो आपण सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन तेथील सेंटरवर आपण आपले कार्ड(ayushman card) डाऊनलोड करून घेऊ शकतो
तसेच कार्ड डाऊनलोड करण्याची दुसरी पद्धती ऑनलाइन आहे यावर सुद्धा आपल्याला कार्ड(ayushman card) मिळेल यासाठी आपण आपले आधार कार्ड घेऊन आपल्याला सेतू केंद्रावर जायचे आहे येथे आपल्याला आयुष्यमान कार्ड(ayushman card)जर पात्र असाल तर लगेच डाऊनलोड करून मिळेल
तसेच तिसरी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण हे कार्ड(ayushman card)डाऊनलोड करू शकतो यासाठी सगळ्यात आधी आपल्याला www.setu.pmjay.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे वेबसाईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन पाहायला मिळतील
1)सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करून घ्यायचे आहे यासाठी आपण आपला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (Jan arogya yojna)साठी दिलेला मोबाईल नंबर किंवा आपला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे व रजिस्टर करायचे आहे
2)एकदा रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला K.Y.C.कम्प्लीट करायची आहे यानंतर
3)इ केवायसी कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला आपण तर पात्र असाल तर लगेच कार्ड डाऊनलोड करता येईल
आयुष्यमान कार्डाचे लाभ
(Benefits of Ayushman Card)
1)पात्र प्रत्येक परिवाराला पाच लाखापर्यंत चा विमा कवच यामध्ये मिळते
2)या योजनेद्वारे आपल्याला मोफत इलाज हा सरकारी व निवडक खाजगी रुग्णालयामध्ये इलाज करता येतो
3)आपण रुग्णालयात ऍडमिट झाल्यानंतर व आपल्याला डिस्चार्ज भेटल्यानंतर पुढील पंधरा दिवसासाठी हा मेडिकल कव्हर या योजनेमध्ये आहे त्यामुळे पंधरा दिवसाचे औषध सुद्धा आपल्याला मिळतील
आपल्याकडे जर गोल्डन कार्ड असेल तर आपल्याला कॅशलेस सुद्धा इलाज करता येईल
ही या योजनेची वैशिष्ट्ये व आयुष्यमान कार्ड(ayushman card)कसे डाउनलोड करायचे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे या योजनेचा फायदा 2019 पासून भारत देशातील अनेक कुटुंबांनी उचललेला आहे पण या योजनेमध्ये नवीन सुद्धा रजिस्टर करण्याची प्रक्रिया ही आपण कार डाऊनलोड करण्याची जी पद्धत पाहिलेली आहे त्याच पद्धतीमध्ये आपल्याला नवीन लोकांना सुद्धा यामध्ये रजिस्टर करता येईल व आपण तर पात्र असाल तर आपल्याला आयुष्यमान कार्ड(ayushman card)मिळेल
या योजनेचे स्वागत हे सर्व स्तरांमधून सध्या होत आहे आता या योजनेची व्याप्ती वाढवून प्रत्येक सत्तर वर्ष वय असलेले नागरिक व त्यावरील नागरिकांना आता आयुष्यमान कार्ड(ayushman card)मिळणार आहे त्यामुळे त्यांचा इलाज करणे आता सोपे जाणार आहे
याविषयी बोलताना भारतीय जनता पार्टीचे नेते एडवोकेट गंगाप्रसाद यन्नावार संकल्प टुडे ला सांगितले की या योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे वयश्री योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे साडेचार कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे यामध्ये सहा कोटीच्या आसपास ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्यमान कार्ड(ayushman card)मिळणे अधिक सोपे होईल त्यामुळे उतरत्या वयामध्ये कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचा इलाज करण्यासाठी पाच लाखा पर्यंत कुठलेही पैसे आता सामान्य माणसांना द्यायची गरज नाही यासाठी मी केंद्रातील मंत्रिमंडळ तसेच विशेष करून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांच्याही अभिनंदन करतो व आभार मानतो की त्यांनी या योजनेची व्याप्ती वाढवून देशातील जेष्ठ नागरिकांना(Senior citizens)ताठ मानेने जगण्याची एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे
आपण वरील सर्व गोष्टींचा विचार केला तर या योजनेचा फायदा हा निश्चित आतापर्यंत सामान्य कुटुंबांना झालेला आहे आणि आता या योजनेची व्याप्ती वाढवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना(Senior citizens)सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे कारण एखादी वैद्यकीय अडचण आली तर त्या वेळेला पैसे नेमके आणायचे कुठून हा प्रश्न जेष्ठ नागरिकांना पडलेला असतो आणि जर घरची आर्थिक परिस्थिती ही बिकट असेल तर इलाजा शिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्वतःचा जीव देखील गमावा लागत होता पण आता या योजनेच्या नंतर पाच लाखापर्यंतचा इलाज हा होईल आणि त्याचा फायदा हा नक्कीच देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि आपण सुद्धा वरील दिलेल्या पद्धतीने आपले आयुष्यमान कार्ड(ayushman card)आपण जरूर काढून घ्यावे ही संकल्प टुडेची नम्र विनंती