4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग(CANCER DAY) दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याच्या मागे काय भूमिका आहे कर्करोगांचे(CANCER) प्रकार व तपासण्या या संदर्भात माहिती घेऊया

कर्करोग(CANCER) म्हणजे काय?
मानवाच्या शरीरातील पेशींचे अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग(CANCER) हा रोग होतो नेमकं कर्करोग(CANCER) कॅन्सर कोणत्या अवयवांमध्ये कोणत्या पेशी मध्ये कोणत्या उतीमध्ये होऊ शकतो सर्व कॅन्सरमध्ये एका गोष्टीचे मात्र साम्य असते ते म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ मानवाच्या शरीरामध्ये सामान्यपणे क्रमाक्रमाने पेशीचे विभाजन नियंत्रित पद्धतीने होते शरीर स्वतःच्या आवश्यकतेनुसार जुन्या पेशीच्या जागी नव्या पेशी तयार करतो शरीरामध्ये हीच पद्धत असते पण एखाद्या वेळेला जुन्या पेशांपेक्षा नवीन पेशी अतिरिक्त झाल्या तर त्या पेशींची एक शरीरामध्ये गाठ तयार होते यालाच आपण ट्यूमर असं म्हणतो
आज पर्यंत 200 हून अधिक प्रकारचे कॅन्सर आज जगाला ठाऊक आहेत
हे हि वाचा-CHILD PENSION -सरकारची योजना तुमच्या मुलांना मिळणार पेन्शन ?
कर्करोगाचे प्रकार?
मॅलीग्रंट कर्करोग(CANCER) अनियमित व अनिर्बंध वाढणाऱ्या पेशीपासून मारक गाठी बनतात आणि या गाठीच्या अवतीभवती असलेल्या अवयवांमध्ये उतीमध्ये या गाठी पसरतात या गाठी मधून पेशी बाहेर पडतात व लसीका संस्थेच्या सहाय्याने व रक्तवाहिन्यां मधून त्या इतर अवयवांमध्ये प्रवेश करतात त्यामुळे कर्करोग(CANCER) हा पसरायला सुरुवात होती याच प्रकारास कर्कप्रक्षेप (cancer projection)असं म्हणतात जेव्हा कर्करोग(CANCER) त्याच्या मूळ अवयवांमधून दुसऱ्या अवयवांमध्ये प्रवेश करतो त्यावेळीला त्यामधील पेशी या मूळ अवयवांमधील कर्कपेशी प्रमाणेच असतात
हे हि वाचा-Budget 2025-बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा
प्रक्षेपित कर्करोग (Projected cancer)
समजा एखादा अवयवांमधील कर्करोग(CANCER) हा इतर अवयवांमध्ये पसरला तर याचं आपण उदाहरण घेऊया फुफुसाचा कर्करोग(CANCER) हा फुफुसा मधून रुग्णाच्या मेंदूमध्ये स्थलांतरित झाला तर ज्या कर्कपेशीय फुफ्फुसामध्ये आहेत त्याच कर्कपेशीय मेंदूत देखील तयार होतात अशा आजारास प्रक्षेपित(Projected cancer) फुफुसाचा कर्करोग(CANCER) म्हणतात
2)कर्करोगाचा दुसरा प्रकार म्हणजे बींनाईन ट्यूमर या रोगामध्ये कर्करोगाची गाठ होते म्हणजे कसं तर पेशींच्या अनियमित व अनिर्बंध वाढीमुळे पेशीच्या गाठी तयार होतात पण ही बींनाईन ट्यूमर पण ही गाठ सहज काढून टाकता येते त्यामुळे अशा बींनाईन ट्यूमर या गाठींचा प्रसार हा इतर अवयवांकडे जाण्यापासून थांबवता येतो यामुळे नव्या अवयवांमध्ये नव्या प्रकारच्या जाती तयार करीत नाहीत यामुळे बींनाईन ट्यूमर हा प्राणघातक नाही
MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
शरीरातील उती वरून कर्करोगाचे तीन प्रकार पडतात
1)उती अर्बुर्द किंवा साराकोम हा कर्करोग(CANCER) हा संयुजी उत्तीर्ण होणारा कर्करोग(CANCER) हात कर्करोग(CANSER) स्नायू असती आणि रक्तवाहिन्यांमध्ये होतो
2)उती कर्करोग(CANCER) किंवा कर्क अर्बुर्द हा कर्करोग(CANCER) स्थाने फुफ्फुस या ठिकाणी होतो
३) ल्युकीमिया लिंफोम हा कर्करोग(CANCER) असती मज्जी मधील रक्तपेशींना होतो कधी कधी तो लसिका ग्रंथी मध्ये आढळतो
कर्करोगाचे मुख्य प्रकार
कार्सीनोमा -त्वचा अंतर्गत अवयवांच्या आवरणाच्या उती मधून तयार होणारा कर्करोग(CANCER)
साकोर्मा चरबी स्नायू रक्तवाहिन्या हाडे यांच्या उतीमध्ये तयार होणारा कर्करोग(CANCER)
ल्युकीमिया रक्त तयार करणाऱ्या उतीमध्ये उगम पावणारा कर्करोग(CANCER)
लिंफोमा किंवा मायलोमा मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेत तयार होणारा कर्करोग(CANCER)
सेंट्रल नर्व्हस सिस्टिम कॅन्सर हा मेंदूच्या आणि पाठीच्या मणक्यात तयार होणारा कर्करोग(CANCER)
कर्करोगाची कारणे मुख्यतः कर्करोगाची कारणांमध्ये अति प्रमाणामध्ये धूम्रपान करणे फार महत्त्वाचे कारण आहे भारतीयांमध्ये असलेले धूम्रपणाची व्यसन यामुळे हा रोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो लठ्ठपणा हार्मोन्स व्यायामाचा अभाव
कर्करोगाच्या तपासण्या एम.आर.आय बायोप्सी रक्त तपासणी सिटीस्कॅन इत्यादी तपासण्यांचा समावेश होतो
कर्करोगाचे भारतामध्ये प्रमाण वरचेवर वाढत जात आहे नऊ जणांपैकी प्रत्येक एका भारतीयाला करत करून पुण्याचा धोका आहे मग तो पुरुष असो किंवा महिला महिलांमध्ये विशेषता गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर हे आजार दिसतात
कर्करोगा (CANCER) बद्दल जनजागृती व्हावी यासाठी 4 फेब्रुवारी हा कर्करोग(CANCER) दिन म्हणून साजरा केला जातो 1993 मध्ये जिनेवा आणि स्विझरलँड मध्ये युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलच्या वतीने प्रथम साजरा केला गेला यामध्ये मुख्यतः कॅन्सर(CANCER) या दोघा बाबतीत जनजागृती करणे व एक विचार मंथन करणे यासाठी या दिवसाची निवड केली गेलेली आहे 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो 1993 ला 12.7 मिलियन एवढे कॅन्सरचे(CANCER) रुग्ण जगभरात होते तर दरवर्षी सात मिलियन लोकांना कॅन्सर(CANCER) मुळे आपला जीव गमावत होते यामुळे कॅन्सर(CANCER) रोगाबाबतीत जनजागृती करून हा या रोगाच्या रुग्णांची संख्या कमी करणे व जनतेमध्ये जनजागृती करणे यासाठी हा दिवस आहे या दिवशी विशेषता कॅन्सर रोगा संदर्भित जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन केले जाते तर वेगळ्या ठिकाणी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने मोफत तपासणी शिबिर देखील ठेवले जाते ज्या माध्यमांमधून कॅन्सर(CANVER) झालेल्या पेशंटची ओळख पटविणे व त्यांना योग्य ते औषध उपचारासाठी तयार करणे या गोष्टींचा समावेश असतो तसेच सोशल मीडियावर सुद्धा या संदर्भामध्ये जनजागृती करणे हे या दिवशी केले जाते
जागतिक कॅन्सर दिवसाचे अवचित्य साधून आज लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच कॅन्सर संदर्भामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये कॅन्सर पासून वाचण्यासाठी काय करावे लागते व कॅन्सर झाल्यानंतर उपचार पद्धती काय आहे कॅन्सरचे प्रकार काय आहेत याविषयी लोहावासीयांना जनजागृती करण्यात आली याप्रसंगी
आज उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे जागतिक कर्करोग(CANSER) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या हस्ते रिबन कापून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉ.शितल पानझडे मॅडम , डॉ.रुबी मॅडम ,डॉ.पूर्वा सरकार मॅडम डॉ.दिनेश राठोड सर व व या शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले रुग्ण याप्रसंगी संकल्प टुडे चे संपादक संतोष पवार यांचे सुद्धा मार्गदर्शन उपस्थितांना लाभले याप्रसंगी बोलताना संतोष पवार यांनी कर्करोगाची तपासणी करून घेणे कसे गरजेचे आहे व ज्यांना कर्करोग(CANCER) आहे त्यांनी स्वतःची मानसिकता ही कशी सकारात्मक ठेवली पाहिजे कारण आज बऱ्याचशा कर्करोगांचा इलाज हा होऊ शकतो त्यामुळे आपण सकारात्मक मानसिकता ठेवून या रोगाला सामोरे जाणे गरजेचे आहे तसेच डॉक्टरांनी दिलेला सल्ला हा तंतोतंत पाळा तसेच याप्रसंगी बोलताना संतोष पवार यांनीही मागणी केली की आपल्या देशातील जुनी चिकित्सक पद्धत आयुर्वेदिक या पद्धतीनुसार असाध्य रोगांवरही इलाज करणे शक्य झाले आहे तरी जागतिक स्तरावर आयुर्वेदिक उपचार पद्धती सुद्धा कर्करोगासाठी तयार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी संतोष पवार यांनी केले
एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये स्तन कर्करोग(CANCER) मुख कर्करोग(CANSER) गर्भाशय कर्करोग(CANCER) यांचे प्रमाण हे जास्त असल्याचे पाहायला मिळाले आणि ही संख्या आपण पाहायची म्हटलं तर प्रत्येक एक लाख लोकसंख्येच्या मागे महाराष्ट्रात स्तनाचे कर्करोग(CANCER) याचे प्रमाण आहे 78% गर्भाशयाचे कर्करोगाचे प्रमाण आहे 50.3%% व मुख कर्करोगाचे प्रमाण हे 26.6% एवढे प्रमाण असल्याची माहिती एका वृत्तपत्रानुसार देण्यात येत आहे
जगातील सर्वात जास्त रुग्ण असलेल्या या कर्करोगाला हरविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहेत तसेच आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करणे धूम्रपान न करणे व महिलांनी आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणे हे गरजेचे आहे हे जर केल्यास आपण या रोगाला सहजरीत्या हरवू शकतो भारतामध्ये अनेक असे मोठे रुग्णालयात आहेत की जिथे कॅन्सर पेशंट चा इलाज हा मोफत देखील केला जातो
आपण पाहू शकतो की अनेक मोठ्या सेलिब्रिटींना देखील या आजाराने ग्रासलेले आहे तरी पण ते आजही एक साधी जीवनशैली जगत आहेत व त्यांनी या आजारावर मात देखील केलेली आहे त्यामुळे घाबरण्याची कारण नाही पण काळजी मात्र निश्चित घ्या
नोट –सदरील माहिती हि वाचकांच्या माहितीस्तव आहे वैद्यकीय उपचारा साठी नाही हि माहिती इंटरनेट वरील उपलध माहिती वरून मिळवली आहे तरी डॉक्तरांचा सल्ला जरूर घ्या