Close Menu
Sankalp Today
    Recent News

    Two brothers together-ठाकरे बंधू एकत्र पण पुढे काय होणार?

    July 7, 2025

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 9
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » महाराष्ट्रातून हे असू शकतात राज्यसभेचे खासदार ?
    No Comments

    महाराष्ट्रातून हे असू शकतात राज्यसभेचे खासदार ?

    तावडे,भुजबळ,दानवे,पाटील,जाणकर यांच्यापैकी राज्यसभेवर कोण जाणार?
    Sankalp TodayBy Sankalp TodayAugust 10, 2024

    लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या व त्यानंतर विधान परिषदेच्या ही निवडणुका या
    महाराष्ट्रामध्ये पार पडल्या आता राज्यसभेच्या ही दोन जागांसाठी निवडणुका जाहीर
    झाल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याविषयी सध्या
    चर्चा चालू आहे आपण या लेखामध्ये याविषयी चर्चा करूया
    नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या नऊ राज्यातील एकूण 12 जागांसाठी निवडणूक
    कार्यक्रम जाहीर केला यामध्ये महाराष्ट्र,हरियाणा,बिहार,राजस्थान,आसाम,मध्य प्रदेश,त्रिपुरा,तेलंगाना
    व ओडिसा या राज्यांचा समावेश आहे या राज्यांमध्ये 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे,
    यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम या तीन राज्यांमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घ्यायची तारीख 26 ऑगस्ट ची आहे
    तर बाकी हरियाणा त्रिपुरा तेलंगाना ओडिसा बिहार राजस्थान या राज्यांमध्ये
    28 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे व वरील नऊ राज्यांमधील 12 राज्यसभेच्या
    निवडणूक ची मतदान प्रक्रिया ही दिनांक 3 सप्टेंबर रोजी होईल हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर
    वरील सर्व राज्यांमध्ये राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या राज्यसभेच्या मताची गोळाबेरीज करायला सुरुवात केली आहे
    व त्याचबरोबर या जागांसाठी त्या त्या राजकीय पक्षामधून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे
    आपल्या पक्षाकडे जाऊन उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय कार्यकर्ते हे कामाला लागले आहेत
    विशेषता महाराष्ट्रामध्ये दोन जागांसाठी राज्यसभेच्या निवडणूक का होणार आहेत या दोन्हीही जागा या त्या
    जागेवरील खासदारांनी लोकसभेमध्ये संपादित केलेला विजय यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत यामध्ये पहिली जागा आहे
    उत्तर मुंबई मधून भारतीय जनता पार्टीने पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती व पियुष गोयल हे या
    निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत व नियमाप्रमाणे लोकसभेला निवडून आल्यानंतर त्या खासदाराचा
    राज्यसभेचा राजीनामा गृहीत धरला जातो तसेच महाराष्ट्रातील दुसरी जागा आहे भारतीय जनता पार्टीचे साताऱ्याचे
    उमेदवार उदयनराजे भोसले शेत लोकसभेमध्ये निवडून गेले आहेत ही जागा ही सध्या रिक्त आहे त्यामुळे या दोन
    जागांवर भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देऊ शकती याविषयी सध्या चर्चा चालू झाली आहे
    अजित पवार गटाला संधी मिळू शकते (Ajit Pawar group may get a chance)
    लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केवळ चार जागा लढविल्या या बदल्यात
    अजित दादा पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला एक राज्यसभेची जागा देण्याचा शब्द भारतीय जनता पार्टी कडून
    दिला आहे अशी चर्चा आहे त्यामुळे दोन पैकी एक जागा भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकते अशी
    शक्यता सध्या राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे खरंच ही जागा अजित पवार गटाला मिळाली तर या जागेसाठी
    अनेक जण इच्छुक आहेत
    नितीन पाटील सातारा(nitin patil satara)
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे राज्यसभेसाठी
    इच्छुक आहेत नितीन पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा चे अध्यक्ष आहेत व त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे
    साताऱ्याची लोकसभेची जागा ही अजित पवार गटाची होती पण महायुतीमध्ये ही जागा छत्रपती उदयनराजे भोसले
    यांच्यामुळे साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐवजी भारतीय जनता पार्टीला देण्यात आली व यामुळे नितीन पाटील
    यांचे खासदारकीचे स्वप्न भरले पण उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ अजित दादा पवार जेव्हा साताऱ्याला आले तेव्हा
    त्यांनी भर सभेमध्ये नितीन पाटील यांना असे आव्हान केले की तुम्ही जर उदयनराजे भोसले यांना निवडून आणलं तर मी
    तुम्हाला राज्यसभेवर घेईल असा शब्द अजित दादा पवार यांनी नितीन पाटील यांना दिला होता जस राज्यसभेची ही जागा
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जर सुटली तर अजित दादा पवार आपला दिलेला वादा पूर्ण करतात की नाही ते पहावे लागेल
    छगन भुजबळ(Chhagan Bhujbal)
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून एका जागेसाठी नितीन पाटील यांच्या बरोबरच छगन भुजबळ हे सुद्धा
    इच्छुक आहेत मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघांमधून छगन भुजबळ हे निवडणूक
    लढवायला इच्छुक होते पण त्यांना काही उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर घेतल्यावर त्यांची
    राज्यसभेची एक जागा रिक्त होती या जागी छगन भुजबळ इच्छुक होते पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या
    नेत्यांनी राज्यसभेची उमेदवारी ही अजित पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा ताई पवार यांना उमेदवारी दिली त्यामुळे छगन भुजबळ
    हे नाराज असल्याच्याही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये होत्या आताही राज्यसभेची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली तर
    छगन भुजबळ सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत पण छगन भुजबळ यांना असलेला विरोध यामुळे त्यांना उमेदवारी देताना
    अजित दादा पवार निश्चित चारदा विचार करतीलच
    भारतीय जनता पार्टी कडून राज्यसभेला कोणाची वर्णी लागू शकते
    (Who can be nominated to Rajya Sabha from Bharatiya Janata Party?)
    महाराष्ट्र मध्ये रिक्त असल्या दोन्ही जागी भारतीय जनता पार्टीचे खासदार होते त्यामुळे या दोन्ही जागा गरज पडल्यास
    भारतीय जनता पार्टी स्वतःकडे ठेवून देऊ शकते असे झाले तर राज्यसभेसाठी चर्चेत असलेले काही नावे
    रावसाहेब दानवे(Raosaheb Danve)
    रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघांमधून अनेक वेळा निवडणूक निवडून आले आहेत पण यंदाच्या
    लोकसभेमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला रावसाहेब दानवे हे या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते
    व त्यामुळेच या राज्यसभेला भारतीय जनता पार्टी कडून रावसाहेब दानवे यांचा विचार होऊ शकतो तसेच भारतीय जनता पार्टीच्या
    पक्षश्रेष्ठी सुद्धा रावसाहेब दानवे यांच्या नावाला विरोध नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा
    मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते आंतरवाली सराटी हे गाव सुद्धा जालना जिल्ह्यात येते सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा
    समाज हा चांगलाच आक्रमक झालेला आहे त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या रूपाने एक मराठा चेहरा देऊन मराठा समाजाची
    नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो व या गोष्टीला भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीचा कुठलाही विरोध नाही
    रासपाच्या वतीने महादेव जानकर(Mahadev Jankar on behalf of RASPA)
    राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे व यामुळेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांना परभणी
    लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये महादेवजी जानकर यांना पराभवाचा सामना
    करावा लागला त्यामुळे आता महादेवजी जानकर यांना उमेदवारी देऊन धनगर समाजाला आपल्या बाजूने वळविण्याचा
    प्रयत्न भारतीय जनता पार्टी कडून घेऊ शकतो
    विनोद तावडे(Vinod Tawde)
    भारतीय जनता पार्टी कडून विनोद तावडे यांना सुद्धा संधी मिळू शकते विनोद तावडे यांनी बिहार या राज्यामध्ये अत्यंत मोलाची
    भूमिका पार पाडली व राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यामुळे भारतीय जनता पार्टी विनोद तावडे यांना सुद्धा
    राज्यसभा ची उमेदवारी देऊ शकते कारण मागच्या राज्यसभेला देखील विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा ही मोठ्या प्रमाणात
    होती पण गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांना उमेदवारी मिळाली नाही विनोद तावडे यांचे एकंदरीत काम
    पाहता भारतीय जनता पार्टीची पक्षश्रेष्ठीही विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही असू शकते तसेच एखादा मराठा
    चेहरा देऊन मराठा समाजाची नाराजी काही प्रमाणात कमी करून घ्यायचा ही प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होऊ शकतो
    तर महाराष्ट्र मधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची रणनीती असू शकते व या राज्याचे
    सभेच्या जागेसाठी वरीलपैकी कोणाची वर्णी लागते हे आता पहाव लागेल पण येणाऱ्या विधानसभेत ला लक्षात घेऊन
    भारतीय जनता पार्टी ही विधानसभेमध्ये आपल्याला उपयोगी पडेल अशा उमेदवाराला उमेदवारी येऊ शकते त्यामुळे
    महाराष्ट्रातील दोन जागी कोण खासदार होणार याविषयी आता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत
    उमेदवारी कोणाला मिळेल याविषयीचा सस्पेन्स लवकरच संपेल व कोण राज्यसभेचे उमेदवार असतील याविषयी चित्र स्पष्ट होईल

    Post Views: 411
    bjp chagan bhujabal nitin patil satara rajysabha rajysabha election vinod tavade
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024366 Views

    Tirupati Latest News तिरुपति बालाजी मंदिरा मध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत?

    September 25, 2024172 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    149386
    Views Today : 1400
    Who's Online : 3
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.