नाशिक– राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आर.सी. नरवाडिया यांनी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू या दोघांनाही दोषी धरत दोन वर्षाच्या कारावासाची व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली यामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद तसेच आमदारकी रद्द होणार का ?
माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सध्या होत आहेत कृषी मंत्री काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत त्यातच आता सध्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील व गोत्यात आल्या असून त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता दाट आहे ?
हे हि वाचा-IPL 2025 Schedule : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२ मार्चपासून रंगणार थरार
नेमकं प्रकरण काय आहे ?(What is the real issue?)
एखाद्या बिल्डरने बांधलेल्या सदनिका यातील दहा टक्के सदनिका या सरकारी कोठ्यासाठी राखीव असायच्या हा कोठा आर्थिक दुर्बल घटकांसाठी,पत्रकारांसाठी,इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असायचा
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून 1995 मध्ये नाशिक शहरांमधील कॅनडा कॉर्नर भागामध्ये एका अपार्टमेंट मधील सदनिका या माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी घेतल्या होत्या सवलतीच्या दरामध्ये घरे मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते कोकाटे यांनी सादर केलेली कागदपत्रे ही खोटी सादर केली तसेच त्यांच्या नावावर घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते याप्रकरणी माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर या प्रकरणी 1997 साली नागरी जमीन(सिलिंग आणि विनिमय) विभागाचे त्यावेळचे अप्पर जिल्हाधिकारी कै. विश्वनाथ पाटील यांनी नाशिक मधील सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा व बनावटीकरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता हा गुन्हा माणिक शिवाजीराव कोकाटे,विजय शिवाजीराव कोकाटे,प्रशांत त्र्यंबक गोवर्धन,पोपट गंगाराम सोनवणे यांच्या विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती तत्कालीन पोलीस निरीक्षक नामदेव पवार यांनी तपास करून दोषा रोप पत्र दाखल केले होते याच प्रकरणांमध्ये आज नाशिकच्या अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी आर.सी नरवाडीया यांनी कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षाचा कारावास व प्रत्येकी 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली
हे हि वाचा–MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
कोकाटेंची आमदारकी रद्द होणार का ?
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे याबाबत प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 आणि पोट कलम तीन नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली तर त्याची आमदारकी रद्द होऊ शकते तसेच दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर पुन्हा सहा वर्षांसाठी तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो म्हणजे तो निवडणूक लढविण्यास अपात्र असतो तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दिशा निर्देश देखील हे सांगतात की एखाद्या लोकप्रतिनिधीला फौजदारी प्रकरणात किमान दोन वर्ष शिक्षा झाली तर त्या दिवसापासून संबंधित लोकप्रतिनिधी कोणत्याही सार्वजनिक पद धारण करण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो असे दिशानिर्देश मा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहेत
याआधी देखील माजी मंत्री सुनील केदार यांना देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्या दोषी ठरवून पाच वर्षाचा सश्रम कारावास व बारा लाख 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी ठोठावली होती यानंतर राज्याच्या विधिमंडळ सचिवालयाने 23 डिसेंबर 2023 रोजी अधिसूचना काढून सुनील केदार यांना अपात्र ठरविले होते
खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील कर्नाटकच्या कोलार येथील एका सभेच्या दरम्यान मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून ते बरेच अडचणीत आले होते त्यावेळी राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते या वक्तव्यानंतर खासदार राहुल गांधी यांच्यावर गुजरात मध्ये खटला दाखल करण्यात आला होता 23 मार्च रोजी गुजरात मधील सुरत येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी झाली यामध्ये राहुल गांधी यांना दोषी ठरविण्यात आले व त्यांना दोन वर्षाची शिक्षा देखील झाली यानंतर राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देखील दिला होता त्यांना जामीन देखील मिळाला होता पण त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आणि राहुल गांधी यांना त्यांना मिळालेले घर देखील सोडावे लागले होते माणिकराव कोकाटे यांना देखील वरच्या न्यायालयात जाण्यासाठी वेळ देण्यात आला आहे तसेच त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे पण आता नेमकं पुढे कारवाई काय होती हे पाहावे लागणार आहे
माणिकराव कोकाटे हे सध्या कृषी मंत्री आहेत त्यामुळे वरील दिलेल्या दोन उदाहरणावरून नेमके आता विधिमंडळ सचिव काय कारवाई करतात ते पाहावं लागणार आहे पुढच्याच महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आहे या प्रकरणाचे पडसाद हे होणाऱ्या अधिवेशनावर पडणार काय ?

खासदार राहुल गांधी व सुनील केदार यांच्याप्रमाणे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार काय ?
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली तरी ते मंत्रीपदावर राहू शकतात ?
एखादा व्यक्ती आमदार नसताना देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करू शकतो पुढच्या सहा महिन्याच्या आत त्याला विधानसभा किंवा विधान परिषद दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागते
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यापुढे एक मोठा पेच निर्माण झाला आहे कारण याआधी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामासाठी त्यांच्यावर दबाव होता ? तर आता नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव कोकाटे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे तसेच माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील रद्द होईल का ? अशी देखील चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे त्यामुळे दोन दिग्गज नेत्यानबाबतीत अजित दादा पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय आल्याबरोबर लगेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी देखील केलेली आहे ज्या पद्धतीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी जी तत्परता दाखवली हीच तत्परता ही माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत दाखवावी अशी ही मागणी विरोधक करत आहे आता नेमकं शासन या निकालाकडे कसे पाहते व खरंच माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होईल काय ? ते पुढील काही दिवसात स्पष्ट होईल