महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभेच्या निवडणुकीचे पुढील
दोन तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडतील यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय
पक्षांच्या हालचालीला वेग आला आहे विभाग वारी ते मतदान केंद्रापर्यंत कशा पद्धतीने रणनीती आखायची
याविषयी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत पण यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही
मतदारसंघ अशी आहेत की ज्यात थेट रक्ताच्या नात्यांमध्येच विधानसभेच्या काही मतदारसंघाचे
निवडणुका होऊ शकतात त्याविषयी आपण चर्चा करूया
बारामती विधानसभा मतदारसंघ(Baramati Assembly Constituency)
या मतदारसंघावर काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड असलेला मतदारसंघ हा मतदारसंघ
ओळखला जातो तो शरदचंद्र पवार यांचा मतदारसंघ म्हणून शरद पवार(Sharad Pawar) यांनी विधानसभेला
तसेच लोकसभेला अशी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे पण 1995 च्या नंतर त्यांनी आपले पुतणे
अजित दादा पवार यांना या मतदारसंघांमधून विधानसभेसाठी उमेदवारी दिली व तेव्हापासून ते 2019 पर्यंत
अजित दादा पवार हे सतत या मतदारसंघांमधून निवडून येत आहेत शरद पवार(Sharad Pawar)यांनी
बारामती लोकसभा व बारामती विधानसभा इथून स्वतःच्या मुलीला सौ सुप्रियाताई सुळे यांना लोकसभेवर पुतण्या
अजितदादा पवार(Ajit Dada Pawar)ना विधानसभेवर संधी दिली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा
विधिमंडळामध्ये दोघेही वेगवेगळ्या जागी काम करू लागले पण गतवर्षी अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)
यांनी केलेला बंड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह हे दोन्ही
अजित पवार यांना मिळाले व त्यांनी काकाची साथ सोडली यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
सुप्रियाताई सुळे व सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली ननंद विरुद्ध भाऊजाई अशी ही लढत
झाली यामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी सुनेत्राताई पवार यांचा पराभव केला या पराभवामध्ये बारामती विधानसभा मतदार
संघामधून सुप्रियाताई सुळे यांना आघाडी मिळाली त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या कारण 1995 पासून
अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत
आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार(Sharad Pawar) यांनी एक नवीन खेळी खेळत
असल्याचे बोलले जात आहे ती आहे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना
बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सध्या चालू आहे कारण
लोकसभेला अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांच्या भावाने शरद पवार यांची साथ देणे पसंत केले व यानंतर बारामतीकरांनी
युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे जर अजित दादा(Ajit Dada Pawar) पवार विरुद्ध
त्यांचे पुतणे अशी लढाई येथे झाल्यास हे पाहावं लागेल की या मतदारसंघांमध्ये काका वरचढ ठरतो की पुतण्या बारामती विधानसभेतील
ही निवडणूक ही अत्यंत जवळच्या नात्यांमध्ये असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे पण आता
शरद पवार(Sharad Pawar) युगेंद्र पवार व अजित पवार(Ajit Dada Pawar) नेमका कुठला निर्णय घेतात हे पाहावे लागेल
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ(Loha Kandahar Assembly Constituency)
पूर्वीचा कंधार विधानसभा मतदारसंघ त्यानंतर त्याचे नाव बदलून लोहा विधानसभा मतदारसंघ असे झाले या मतदारसंघाचा
आजवरचा जर आपण इतिहास बघायला गेलो तर या मतदारसंघांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व हे राहिलेले आहे
इथून भाई केशवराव धोंडगे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे 1962 ते 1995 पर्यंत येथे केशवराव धोंडगे हे अनेक
वेळा या मतदारसंघांमध्ये निवडून आले तसेच काँग्रेसचे ईश्वरा भोसीकर व शेतकरी कामगार पक्षाचे भाई गुरुनाथराव कुरुडे
यांनी सुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले 1995 च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून शिवसेनेचे रोहिदासजी चव्हाण
हे निवडून आले त्यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे
यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी विजय संपादित
केला व या मतदारसंघाचे त्यांनी
प्रतिनिधित्व केले पण 2009 च्या निवडणुकीमध्ये चिखलीकर यांचा पराभव झाला व शंकरांना धोंडगे हे विजयी झाले 2014 च्या
विधानसभा निवडणुकीमध्ये परत एकदा प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) हे मोठ्या फरकाने विजयी
झालेव यानंतर चिखलीकर यांनी
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व त्यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली व ते विजयी देखील झाले
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचे भाऊजी शामसुंदर शिंदे हे या मतदारसंघांमधून
शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली व ते विजयी झालेपण 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये
प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांचा पराभव झाला व त्यांनी परत एकदा लोहा विधानसभा
मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची
इच्छा व्यक्त केली व इथूनच श्यामसुंदर शिंदे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सौ आशाताई शिंदे या विधानसभेसाठी इच्छुक
असल्याची चर्चा आहे सौ आशाताई शिंदे या प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांच्या बहीण
नुकतेच आशाताई शिंदे यांनी
शरद पवार यांची देखील भेट घेतली त्यामुळे आशाताई शिंदे हे विधानसभेची निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित आहे
व महायुतीकडून प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) हे सुद्धा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत
आता जर महाविकास आघाडी कडून सौ.आशाताई शिंदे यांना जर उमेदवारी मिळाली आणि महायुती मधून
प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांना उमेदवारी
मिळाली तर या मतदारसंघांमध्ये आपल्याला भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत पाहायला मिळू शकते
दिंडोरी विधानसभा मतदारसंघ
दिंडोरी विधानसभा मतदारसंघ हा नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघांमध्ये 1962 पासून
ते 2019 पर्यंत वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांना या मतदारसंघांमधून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे पण या
मतदारसंघातील चर्चेत असलेले सध्याचे नाव म्हणजे विद्यमान आमदार नरहरी झिरवळ हा मतदारसंघ राखीव मतदार संघ आहे
नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले यानंतर 2009 च्या निवडणुकीमध्ये
नरहरी झिरवळ यांचा पराभव झाला व 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरहरी झिरवळ हे परत एकदा विजयी झाले
तसेच 2019 च्या निवडणुकीमध्ये नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले पण 2019 ते 2024 च्या
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली अजित दादा पवा(Ajit Dada Pawar)र यांनी आपल्या काकाशी
बंड करत महायुतीमध्ये सामील झाले व राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह हे दोन्हीही निवडणूक आयोगाने
अजितदादा पवार (Ajit Dada Pawar) यांना दिले या सर्व घडामोडी
च्या दरम्यान सुरुवातीच्या काळामध्ये नरहरी झिरवळ हे शरद पवार(Sharad Pawar) यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले
एकदा पत्रकारांना बोलताना ते असं म्हणाले की माझी छातीचा चिरून पाहिली तर त्यामध्ये शरद पवार यांचा फोटो दिसेल
पण पुढे त्यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांची साथ सोडून अजित दादा पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले जुलै
2019 मध्ये शरद पवार हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अचानक नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ
यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली व यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गोकुळ झिरवळ यांनी सांगितले
की मी शरद पवार(Sharad Pawar) साहेबांसोबत आहे व जर शरद पवार(Sharad Pawar) साहेबांनी संधी दिल्यास
मी दिंडोरी विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे व त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रभर चर्चेचा
विषय झाला कारण नरहरी झिरवळ अजितदादा पवार यांच्यासोबत तर त्यांचे पुत्र हे शरद पवार(Sharad Pawar) साहेबांसोबत
जर खरोखरच असे झाल्यास दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला पिता विरुद्ध पुत्र अशी लढत पाहायला मिळू शकते
वरील तीन विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास राजकारणात काहीही होऊ शकतं असंच म्हणावं लागेल या वर्चस्वाच्या
लढाईमध्ये राजकीय मंडळी स्वतःची नातीगोती कशी विसरतात हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही ?
पण या राजकीय मंडळीच्या या निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्ते तसेच मतदार संघातील मतदार मात्र कमालीचे वैचारिक अडचणीत
सापडलेली दिसतात कारण कालपर्यंत ही नेते मंडळी एकमेकांचा प्रचार करत होते आज ते एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत
बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये काका पुतण्या(Uncle Nephew in Baramati Assembly Constituencies)
लोहा मतदारसंघांमध्ये भाऊ विरुद्ध बहीण(Brother versus sister in Loha constituencies)
दिंडोरी मतदार संघामध्ये वडील विरुद्ध मुलगा(Father vs son in Dindori constituency)
असा सामना विधानसभेला होतो की काय हे आता पहावे लागेल
Recent News
विधानसभा निवडणूकत नातेवाईक आमनेसामने?
विधानसभेत भाऊ बहीण,मुलगा वडील,काका पुतण्या मध्ये लढत