Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभेच्या तारखांच्या घोषणा केल्या केल्या व देशभरामध्ये आचारसंहिता लागली महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत पहिला टप्पा हा 19 एप्रिल तर शेवटचा टप्पा एक जून रोजी पूर्ण होईल व चार जून रोजी मतमोजणी होईल महाराष्ट्रामध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कधी मतदान होणार ते पाहूया 19 एप्रिल भंडारा- गोंदिया ,नागपूर ,चंद्रपूर गडचिरोली, रामटेक 26 एप्रिल बुलढाणा, अकोला अमरावती, वर्धा, नांदेड ,परभणी यवतमाळ- वाशिम, हिंगोली 7 मे रायगड ,बारामती ,धाराशिव ,लातूर ,सोलापूर ,माढा ,सांगली ,सातारा ,कोल्हापूर ,हातकणंगले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर ,जालना ,छत्रपती संभाजीनगर, मावळ पुणे ,शिरूर,अहमदनगर, शिर्डी, बीड 20 मे धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर…
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज येथे पत्रकार परिषद झाली ही पत्रकार परिषद दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये पार पडली पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार व मतमोजणी चार जून रोजी होणार आहे त्याबरोबरच संपूर्ण देशामध्ये आदर्श आचारसंहिता लागली आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा सर्वत्र ओळख आहे आज याच भारत देशाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले यामध्ये 97 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार महाराष्ट्राची निवडणूक ही पाच टप्प्यात होईल व त्याची तारीख 19 एप्रिल ते 1 जून ही आहे मतमोजणी चार जून रोजी होईल.
आज दुपारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक पत्र लिहिले त्यामध्ये त्यांनी मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाचा पाढा वाचला यामध्ये काही मुख्य मुद्दे आहेत मागील दहा वर्षांमध्ये मी घेतलेला प्रत्येक निर्णय हा गरीब शेतकरी युवा महिला यांना सशक्त बनविण्यासाठी घेतला आहे महिलांचे जीवन सुधारण्यासाठी मीठ मोठमोठ्या योजना घोषित केल्या प्रधानमंत्री आवास योजना यामधून पक्की घरे बांधून दिली या पत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी 370 चा पण उल्लेख केला तसेच ट्रिपल तलाक आम्ही बंद केला संसदेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम नवीन संसद भवन बांधणे तसेच आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्यावर कठोर प्रहार करून त्यांना संपविले शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत…
आज दुपारी तीन वाजता भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकीच्या घोषणा करतील व त्यानंतर लगेच देशामध्ये आचारसंहिता लागू होईल आचारसंहिता ही निवडणूक आयोगाच्या वतीने लावली जाते ही प्रामुख्याने जिथे निवडणुका आहेत त्या राज्यापुरतं या मतदारसंघापूर्ती त्या लोकसभा मतदारसंघापूर्ती किंवा त्या ग्रामपंचायती पूर्ती लावली जाते म्हणजेच जिथे निवडणूक आहे तेथे आचारसंहिता लागते सगळ्यात पहिली आचारसंहिता 1960 ला लावली आचारसंहिते मध्ये निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली रक्कम या उमेदवाराला खर्च करता येते त्यापेक्षा जास्त खर्च करता येत नाही व सदरील खर्चाचे विवरण रोजच्या रोज निवडणूक आयोगाला द्यावे लागते यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठलाही शासन निर्णय हा आचारसंहिता लागल्या नंतर घेता येत नाही पण आश्वासन…
गेल्या लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथा पालथ झाली यामध्येच रावेर मतदारसंघ याच्याकडे सर्वांचे लक्ष होते कारण मागील काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर नाथाभाऊ यांनी शरद पवार यांना साथ दिली मध्यंतरी विधान परिषदेच्या उमेदवारी घेऊन नाथा भाऊ आमदार झाले काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या यादीमध्ये नाथाभाऊ यांच्या सुनबाई रक्षाताई खडसे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली यामुळे प्रसार माध्यमांमध्ये खडसेविरुद्ध खडसे असा सामना रंगणार काय असे वाटत होते पण आज एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन तब्येतीचे कारण…
राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेले तेथे निकाल हा अजित पवार यांच्या बाजूने लागला याच्या विरोधात शरद पवार गट न्यायालयात गेला त्यावर आज सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान मा सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला चांगलं खडसावलं कोर्टाने असे सांगितले की तुम्ही यापुढे शरद पवार यांचे फोटो वापरणार नाही असं लेखी न्यायालयाला द्यावे असे सांगितले शरद पवार गटाची वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी छगन भुजबळ यांचे एक विधान वाचून दाखवले यामध्ये छगन भुजबळ म्हणाले की आपल्याला घड्याळ निशान तसेच शरद पवार यांचे फोटो वापरावे लागतील ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी यानंतर माननीय कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले की…
मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत व ठिकठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत पण यावेळी मात्र अनेक पोलीस स्टेशनमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत असंच काही घडलंय हिंगोली जिल्ह्यातील वसमत मध्ये मनोज रंगे पाटील यांच्यावर व इतर 80 ते 90 कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये वसमत शहर पोलीस स्टेशन व वसमत ग्रामीण पोलीस ठाणे या दोन्हीही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये विनापरवाना रॅली काढणे विनापरवाना सभा घेणे व जिल्हाधिकारी यांचे जमाबंदीचे आदेश लागू असताना सुद्धा जमाव जमवणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आईन लोकसभेच्या तोंडावर मनोज जरांगे…
लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीची आज दुसरी यादी जाहीर झाली यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या काही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले यामध्ये प्रामुख्याने बीडमधून प्रीतम ताई मुंडे ऐ वजी पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर नांदेड मधून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना परत एकदा संधी मिळाली आहे तसेच नागपूर नितीनजी गडकरी ‘चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार ‘ सुजय विखे पाटील लातूर सुधाकर ‘ मुंबई पियुष गोयल ‘ रक्षा खडसे ‘ रणजीत सिंग निंबाळकर पुणे मुरलीधर ‘ सुभाष भामरे ‘ स्मिता वाघ वर्धा रामदास तडस जालना रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे तसेच या यादीमध्ये मुंबईमधून गोपाळ शेट्टी व मनोज कोटक यांना वगळण्यात आले…
केरळमध्ये मागील काही दिवसांमध्ये मम्प्स या आजाराचेएका दिवसात 200 रुग्ण मिळाले आहेत तर मागील दोन महिन्यांमध्ये 11468 मिळाले आहे हा आजार मानवाच्या शरीरामध्ये असलेल्या रोगप्रतिकारशक्ती वर हल्ला करतो आजाराची लक्षणे या मध्ये प्रामुख्याने गाल फुगणे मान फुगणे ताप डोकेदुखी अंगदुखी अशी काही प्राथमिक लक्षणे पाहायला मिळतात लक्षणे ही दोन ते तीन आठवडे पाहायला मिळतात हा आजार मानवी शरीरावर काय आघात करतो मम्प्स एक वायरस पैरामिक्सोवायरस मुळे होतो याचा प्रसार करोना सारखा होतो म्हणजे हवेतून व थुंकी मधून होतो या आजारामुळे पेनक्रिया वर परिणाम होतो हा आजार रोखण्यासाठी कोविड सारखेच नियम पाळावे लागतील म्हणजे मास्क वारंवार साबण लावून हात धुणे हे…
मिरची चे भाव एका दिवसामध्ये वीस हजार रुपयावरून थेट आठ हजार रुपये प्रति क्विंटल आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली घटना आहे कर्नाटक मधील हावेरी येथील हावेरी हे कर्नाटक मधील मिरचीसाठी प्रसिद्ध आहे येथे लांबून व्यापारी मिरची घेण्यासाठी येतात येथे मोठ्या प्रमाणात मिरचीची उलाढाल होते पण एकाच दिवसांमध्ये वीस हजार रुपये प्रतिक्विंटल असणारी मिरची थेट आठ हजार रुपये आली त्यामुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून जाळपोळ करायला लागले तेथील मार्केट कमिटीचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान केले व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सगळे शेतकरी हे अडचणीत आलेले आहेत जीवापाड महिनत करून तयार करण्यात आलेल्या पिकाला जेव्हा कवडीमोल भाव मिळतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मनाला…