Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
आज 23 मार्च याच दिवशी भारताचे क्रांतिकारक शहीद भगतसिंगजी राजगुरूजी व सुखदेवजी यांना ब्रिटिश सरकारने फासावर लटकवले होते आणि इथूनच देशांमध्ये एका नवीन क्रांती सुरुवात झाली फासावर लटकताना इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम अशा घोषणा देत हसत हसत फासावर चढले पण ब्रिटिश सरकारने या तिघांना 24 मार्च 1931 ला फाशी देण्याचा आदेश दिला होता पण त्यांना 23 मार्च 1931 रोजी त्यांना फासावर लटकवण्यात आले यामागचे कारण काय आहे शहीद भगतसिंग यांना जशी फाशीची शिक्षा सुनावली गेली तसं देशांमध्ये क्रांतीचे वातावरण तयार झाले व ब्रिटिश सरकारला भीती होती की जर याचे रूपांतर बंडा मध्ये झाले तर आपल्याला सावरण कठीण जाईल लोकांचा उद्रेक…
काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली व देशामध्ये याविषयी चर्चा सुरू झाली पण ही ईडी असते काय व तिचे काय काम असते ते पाहूया ईडी म्हणजे काय एनफोर्समेंट डायरेक्टोरेट अर्थात प्रवर्तन निर्देशालय ही एक आर्थिक गुन्हा संदर्भात तपास करणारी यंत्रणा आहे वित्त मंत्रालयातील राजस्व विभाग च्या मध्ये ईडी काम करते 1956 मध्ये ईडी ची स्थापना केली गेली व याची मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे एडी काम कसं करते ईडी आर्थिक गुन्ह्यांचा तपास करते जर कुठल्याही पोलीस स्टेशनला एक कोटीच्या वरचा घोटाळ्याचा अर्ज आला तर सदरील पोलीस स्टेशनला ही माहिती ईडी ला दयावी लागते पण जर एखादं प्रकरण ईडीकडेच…
लोकसभेच्या निवडणुकीला फार कमी वेळ राहिला आहेव महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सध्या आरक्षणा च्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे प्रत्येक गावातून एक उमेदवार अशी रणनीती करून एक हजार उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून उभा करण्याची मराठा समाजाने ठरविले आहे व त्यातच निवडणूक लढविण्यासाठी जे डिपॉझिट आहे ते पण एक दोन व पाच रुपयाचे नाणे घेऊनच डिपॉझिट भरायचं असाही गनिमी कावा मराठा समाजाने तयार केला आता ही खबर निवडणूक आयोगापर्यंत गेली वही चिल्लर मोजण्यासाठी बराच वेळ लागेल यामुळे बाकी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी वेळ लागेल हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने आज डिपॉझिट भरण्याच्या नियमांमध्ये मोठ्या बदल करून फक्त 1000 रुपये पर्यंत चिल्लर डिपॉझिट…
लोकसभा निवडणूक 2024 याच्या तारखा जाहीर झाले व देशांमध्ये आचारसंहिता लागली केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच अंतिम मतदार यादी जाहीर केली यामध्ये आपलं नाव बुथ हे पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन पहा अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा. अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी https://shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा. यादीत नाव तपासण्यासाठी http://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
नवी दिल्ली आज प्रवर्तन निर्देशालय इडी ने आज मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना अखेर अटक केली मागील काही दिवसापासून त्यांना हजर होण्यासाठी नोटीस पाठवत होती पण अरविंद केजरीवाल हजर होत नव्हते याआधी या घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया यांनाही अटक झाली होती ऐन लोकसभेच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत उद्या सकाळी अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले जाईल
महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने आज आपली सात उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली यामध्ये नवीन चेहरे देण्यात आले आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे पाहूया कोणा कोणाला उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिली नांदेड वसंतराव चव्हाण नंदुरबार गोवल पाडवी पुणे रवींद्र धंगेकर सोलापूर प्रणिती शिंदे अमरावती बळवंत वानखेडे लातूर शिवाजीराव काळगे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज
आज सकाळी झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू हे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरच्या जवळ असलेले रामेश्वर तांडा येथे आहे या तांड्यामध्ये व या परिसरातील दांडेगाव वारंगा सिंदगी दिग्रस बु या परिसरामध्ये भूकंपाची तीव्रता जास्त आहे सकाळी सहा वाजून सहा मिनिटाला पहिला गुड आवाजमध्ये तीव्र भूकंपाचा धक्का जाणवला लगेच 6 वाजून 19 मिनिटाला दुसरा धक्का जाणवला गुड आवाज व तीव्र धक्के यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले सहा वाजून सहा मिनिटाच्या भूकंपाची तीव्रता ही ४.२ रिश्टर स्केल तर दुसरा भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ही ३.६स्केल एवढी होती भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा हा दाखविला आहे तेथे जास्त नुकसान नाही पण दांडेगाव येथे मात्र घरांना तडे गेले…
इंटरनेटच्या युगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर सर्च करतो पण तुम्हाला माहिती आहे काय की अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण इंटरनेटवर सर्च केल्यास आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते गुगलवर खाली दिलेल्या कोणत्याही गोष्टी चुकूनही सर्च करू नका अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल 1)बॉम्ब बनण्याची प्रक्रिया याबाबतीत आपण कुठलीही गोष्ट सर्च केली तर आपण सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेच्या रडारवर याल 2)गर्भपात करणे विषयी आपण जर गर्भपाता संदर्भात कुठलीही गोष्ट सर्च करू नका 3)चाइल्ड पॉर्न पॉर्न फिल्म बघणे व बनवणे दोन्ही क्राईम आहे 4) पीडित महिलेचे नाव सर्च करणे बऱ्याच वेळेस एखाद्या पीडित महिलेचे नाव हे पोलीस प्रशासनाकडे गुप्त ठेवले जाते…
मनोज जरांगे पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मध्ये आरोप प्रति आरोप हे हे चालू आहेत विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करणार असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले यानंतर मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले व याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व आचारसंहिता लागली व आचारसंहिता लागल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना सभा घेण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली पण जरांगे पाटील हे न्यायालयात जाऊन त्यांनी सशर्त परवानगी मिळवली काल एका पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मला रात्री एक वाजता व तीन वाजता देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोन आला व त्यांनी मराठा आंदोलकावर…
नांदेड दि. 20 -लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.पोलीस,महसुल, इन्कम टॅक्स, परिवहन, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क,प्राप्तीकर,सिमा सुरक्षा बल,अंमली पदार्थ नियंत्रण दल, डाक विभाग, अंमलबजावणी संचालनालय, परिवहन, नागरी उड्डयन विभाग अं मलबजावणी संचालनालय विभागाचे अधिकारी उपस्थिती होते. आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्ह्यात सायंकाळपर्यंत 44 लाखाची रोकड, 7 लाखाचे मद्य व 16 लाखाचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. रोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला हि कोणाची…