अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील
आज पत्रकार परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाले
त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर
आरोप करत मनोज जरांगे पाटील ते थेट आता देवेंद्र फडवणीस
यांचा बंगला सागर येथे निघाले आहेत
उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आज पत्रकार
परिषदेमध्ये माझं आंदोलन भरकवटण्यासाठी अनेक प्रयत्न केले
गेले जर माझा बळीच पाहिजे असेल तर मी सागर बंगला येतो माझा
बळी घ्या असा आरोप करत मनोज जरांगे पाटील गाडीत बसून
मुंबईकडे निघाले आहेत
एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना नितेश राणे यांनी मनोज जरांगे
पाटील यांना सांगितलं की सागर बंगल्याच्या आधी एक भिंत आहे
ती मी आहे आम्ही सुद्धा मराठा आहोत बघू पुढे काय होतं ते असे
नितेश राणे म्हणाले
एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका
बघता पुढील काही दिवस वातावरण तापेल कि काय अशी शक्यता आहे