Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » Anemia:एनीमिया प्रकार, लक्षण, कारण आणि इलाज
    3 Comments

    Anemia:एनीमिया प्रकार, लक्षण, कारण आणि इलाज

    Anemia:हे सुपर फूड खा ऍनिमिया होईल समाप्त
    Sankalp TodayBy Sankalp TodayMay 14, 2025

    तुम्हाला जर सततचा थकवा जाणवत असेल कुठल्याही कामांमध्ये मन लागत नसेल एका जागी खूप वेळ बसल्यानंतर उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे होत असेल तुमचा चेहरा निस्तेज असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे यालाच इंग्रजीत ॲनिमिया(Anemia) असे म्हणतात शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही सुपर फूड आहेत की जे आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे ते आपण पाहूया

    भारतीयांमध्ये ॲनिमिया(Anemia) अर्थात शरीरात रक्त कमी असण्याचे प्रमाण हे बाकी देशांपेक्षा अधिक आहे 70 टक्के भारतीयांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते ?आणि या समस्येमुळे अनेक आजारांना सामोरे जावं लागतं ॲनिमिया(Anemia) नेमका का होतो या मागची कारण काय आहेत व उपाय काय आहेत

    ॲनिमिया(Anemia)ची लक्षणे व ॲनिमिया काय आहे?(What are the symptoms of anemia and what is anemia?)
    आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन व रेड ब्लड सेल्स अर्थात लाल रक्तपेशीची कमतरता असणे यामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा ही पुरुषांमध्ये 14 ते 17 च्या दरम्यान नॉर्मल समजली जाते तर तीच मात्रा महिलांमध्ये 12 ते 15 च्या दरम्यान नॉर्मल समजली लहान मुलांमध्ये तेरा ही रेंज नॉर्मल समजली जाते जर यापेक्षा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी असेल तर आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते यामध्ये महत्त्वाचे लक्षण असते ते थकवा जाणवणे थोडे जरी काम केले तरी शरीरामध्ये लगेच थकवा जाणवायला लागतो कुठल्याही कामात मन न लागणे कुठलंही काम करत असताना

    हे ही वाचा-हाडांमधील कमजोरी दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय

    आपले मन त्या कामांमध्ये लागत नाही हे सुद्धा ॲनिमिया(Anemia)ची लक्षण असू शकते आपण जर आपल्या मुख्य तीन ऋतूचा विचार केला तर यामध्ये मुख्यतः उन्हाळ्यामध्ये आपण दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर निघाल्यास लगेच डोके दुखायला लागते व अस्वस्थ वाटायला लागते ही सुद्धा ॲनिमिया(Anemia)ची लक्षणे आहेत तर हिवाळ्यामध्ये आपली हातपाय थंड पडणे ही सुद्धा ॲनिमिया(Anemia)ची लक्षणे आहेत आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपल्याला आयरन हे गरजेचे असते तसेच त्यासोबतच विटामिन सी सुद्धा हिमोग्लोबिन वाढवायला मदत करते

    हे ही वाचा-CHILD PENSION -सरकारची योजना तुमच्या मुलांना मिळणार पेन्शन ?

    हिमोग्लोबिनचे मुख्यता काम म्हणजे आपल्या शरीरातील वेगळ्या अंगांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे आपण हिमोग्लोबिनला ऑक्सिजन वाहक देखील म्हणू शकतो जर ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आपले अंग हे काम व्यवस्थित करत नाही व त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आजार तयार व्हायला लागतात मुख्यतः याची प्रमुख लक्षणे ही चेहऱ्यावर दिसायला लागतात चेहरा निस्तेज व पिवळसर दिसतो यामुळेच आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्या शरीरामध्ये रक्त कमी असल्याचे निदान चेहरा पाहूनच करतात हातापायांना मुंग्या येणे शरीर पांढरे दिसते डोळे पिवळे दिसू शकतात?

    ॲनिमिया(Anemia) होण्याचे कारणे?(Causes of anemia?)
    मुख्यता ॲनिमिया(Anemia) चे खूप कारणे आहे पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतं ते आपल्या आहारामध्ये पोषक तत्वांची कमतरता ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते आणि ॲनिमिया(Anemia) सारखा आजार आपल्याला होतो तसेच यातले दुसरे कारण म्हणजे मुळव्याधी मुळव्याधीचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त हे शरीराच्या बाहेर फेकले जाते त्यामुळे देखील शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते तसेच महिलांमध्ये देखील ज्या महिलांना मुळव्याधी आहे व मासिक पाळी मध्ये अधिक प्रमाणात होणारा रक्तस्त्राव हे देखील महिलांमधील ॲनिमिया(Anemia)ची लक्षने दिसतात

    या सहा गोष्टींमुळे ॲनिमिया(Anemia) दूर होईल?(Will these six things cure anemia?)
    नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी काही फळे आहेत की जी आपण आपल्या आहारांमध्ये समाविष्ट केले पाहिजे
    पालक
    हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक हे अत्यंत महत्त्वाची पालेभाजी आहे यामध्ये आयरन ची मात्रा ही मोठ्या प्रमाणात असतील त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या त्यासोबतच पालक आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे

     


    बीट
    आपण जेवताना सहसा आपल्या आहारामध्ये बीटाचा समावेश केला पाहिजे कारण बीटामध्ये नाइट्रेट्स ची मात्रा अधिक प्रमाणात असते या नाइट्रेट्स मुळे शरीरामध्ये नायट्रिक ऍसिड तयार होते की जी आपल्या रक्तवाहिन्या उघडण्याचे काम करते यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तसंचार व्यवस्थित होईल व रक्त संचार व्यवस्थित झाल्यास आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होईल तसेच हाय बीपी मध्ये देखील बीट रूट अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि बीट खाल्ल्यामुळे आपला चेहरा देखील तेजस्वी दिसायला लागतो बीट मध्ये विटामिन ए.सी व विटामिन बी हे मुबलक प्रमाणात असतात

    आंबा
    सध्या आंब्याचे सीजन चालू आहे आंबे मुबलक प्रमाणात सध्या बाजारामध्ये आलेले आहेत आंबे देखील ॲनिमिया(Anemia)मध्ये लाभदायक असतात पण आंबे खाताना एक काळजी घ्यावी लागते आंबे बाजारातून विकत आणल्यानंतर किमान दोन ते तीन तास थंड पाण्यात बुडवून ठेवले पाहिजे ज्यामुळे आंब्यामधील उष्णताही कमी होते आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन सी व फॉलिक ऍसिड असते व हे दोन्ही घटक रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यामध्ये मदत करत असतात तसेच आंब्यामध्ये पोटॅशियम विटामिन बी व फॉलिक ऍसिड हे मोठ्या प्रमाणात असते यामुळे आंब्याचे सेवन केल्यानंतर आपल्याला लगेच शरीरामध्ये पूर्ती यायला लागते ज्यांना ॲनिमिया(Anemia)चा समस्या आहे त्यांनी उन्हाळ्यात आंबे जरूर खावेत

     


    मनुका (किशमिश)
    अंगूर ला वाळवलया नंतर मनुका तयार होतात चवीने गोड असतात व मनुकांमध्ये आयरन ची मात्रा मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शहरांमधील रक्त वाढीसाठी हे आयरन हे घटक फार महत्त्वाचा आहे यामुळे ॲनिमिया(Anemia) आजारामध्ये किशमिशचे सेवन रोज जरूर केले पाहिजे किशमिश जर भिजून खाल्ले तर आणखीन लाभदायक ठरते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये किशमिश भिजून आपण खाऊ शकतो व ते पाणी किंवा दूध त्यामुळे समस्येपासून मुक्ती होऊ शकते

    डाळिंब
    पुरातन काळापासून डाळिंब हे रक्त वाढीसाठी व शरीरामध्ये स्फूर्ती आणण्यासाठी प्रसिद्ध फळ आहे डाळिंबाच्या दाण्याचा रंग देखील लाल असतो डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आयरन फायबर व विटामिन ची मात्रा ही मुबलक प्रमाणात असते डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटामिन सी विटामिन के आणि विटामिन बी असते त्यामुळे रक्त वाढीसाठी या विटामिन ची गरज असते
    तसेच डाळिंबामध्ये पोटॅशियम आयरन आणि मॅग्नेशियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे देखील ॲनिमिया(Anemia) मध्ये डाळिंब फायदेशीर ठरू शकते

     

    गुळ शेंगदाणा लाडू
    गुळ आणि शेंगदाण्याच्या लाडू हा रक्त वाढीसाठी चांगला असतो आपण आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलेले आहे ग्रामीण भागामध्ये रक्त वाढीसाठी गुळ शेंगदाणा लाडू हे मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जाते सकाळी रिकाम्या पोटी गुळ शेंगदाना लाडू खाल्ल्यास रक्ता मध्ये वाढ होते?व या लाडू मध्ये गुळ असल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी देखील मिळते
    वरील सर्व दिलेल्या सुपर फूड विचार केल्यास नैसर्गिक पद्धतीने आपणही ॲनिमिया(Anemia) पासून मुक्ती मिळू शकतो व आपल्या शरीरामध्ये रक्त देखील वाढू शकते बाजारामध्ये मिळणाऱ्या काही केमिकल युक्त औषधांमुळे व त्याचे साईड इफेक्ट मुळे अनेक जण रक्त वाढीच्या गोळ्या घेणे टाळतात पण आपण

     

    जर नैसर्गिक पद्धतीने वरील फळांचा भाज्यांचा उपयोग जर आपल्या रोजच्या जेवणामध्ये केला तर निश्चित आपण ॲनिमिया(Anemia) पासून मुक्ती मिळू शकतो वर दिलेले सुपर फूड हे अगदी सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतात आणि ही रक्त वाढीची पद्धती नैसर्गिक असल्यामुळे यामध्ये कुठलाही केमिकल पोटामध्ये जायची शक्यता ही कमी असते
    नोट वरील दिलेली माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून जमा केलेली आहे आपल्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी हा लेख लिहिला आहे या लेखामध्ये सुचवलेले उपाय हे आपल्या माहितीस्तव आहेत आपल्याला जर कुठलाही गंभीर आजार असल्यास आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वर दिलेल्या पदार्थांचा उपयोग करावा

    Post Views: 469
    Anemic Causes of anemia Symptoms of dying from anemia Types of anemia What are the 4 types of anemia What causes a person to lose blood without bleeding
    View 3 Comments

    3 Comments

    1. Pingback: Bycott turkey-भारतीयांनी तुर्कीला शिकविला चांगला धडा - Sankalp Today

    2. Pingback: Benefits of Soaking:या गोष्टी भिजवून खा व निरोगी राहा - Sankalp Today

    3. Pingback: Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं - Sankalp Today

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130216
    Views Today : 1531
    Who's Online : 3
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.