लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यात राजकीय
पक्षांना डोकेदुखी ठरत आहे ती बंड करणाऱ्या नेत्यांची
आधीच मताची जुळवाजुळव करता पक्षांना चांगलीच
दमछाक होत आहे पक्षामधून होणारा विरोध यामुळे
राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे
अमरावती लोकसभा मतदारसंघांमधून विद्यमान खासदार
नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली व लगेच बच्चू कडू यांनी बंड करत आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असे सांगितले बच्चू कडू व नवनीत राणा यांचे
पती रवी राणा या दोघांमध्ये मागे चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते यामुळे बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा विरोध
तीव्र होताना दिसत आहे बच्चू कडू हे अचलपूर मधून चार
वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत
सर्वांचे लक्ष लागून असलेला मतदार संघ म्हणजे बारामती बारामती मधून शरद पवार गटातर्फे सुप्रियाताई सुळे या निवडणूक लढवणार आहेत तर महायुतीतर्फे अजित पवार
यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार या निवडणूक लढविणार आहेत
पण शिवसेनेचे शिंदे गटाचे विजय शिवतारे यांचा मात्र सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध आहे महायुतीत हे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आहेत पण शिवतारे यांच्या बंडामुळे सुनेत्रा पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे अनेकदा बैठका होऊन सुद्धा विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आता पाहावा लागेल की देवेंद्र फडवणीस या सर्वांमध्ये सुवर्ण मध्य कसा साधतात