नांदेड लोकसभा मतदारसंघां मधून आत्तापर्यंत निवडून आले सर्व
खासदार त्यांचे नाव व पक्ष याविषयी चर्चा करूया लोकसभा निवडणूक 2024 मध्ये
नांदेड लोकसभा मतदारसंघां मध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये
1)नांदेड उत्तर 2)भोकर नांदेड दक्षिण 3)मुखेड 4)देगलूर व 5)भोकर या विधानसभा मतदार
संघांचा समावेश होतो तसेच आपण नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर यामधील दोन तालुके हे हिंगोली
लोकसभा मतदारसंघां मध्ये जातात यामध्ये किनवट हादगावव एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश
हा लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये होतो तो आहे लोहा विधानसभा मतदारसंघ अशा प्रकारची रचना
नांदेड लोकसभा मतदारसंघाची आहे
1952 च्या पहिल्या निवडणुकीमध्ये
या निवडणुकी मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघ हा हैदराबाद स्टेट मध्ये होता
कारण त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता ही हैदराबाद मध्ये नव्हते भारत देश स्वातंत्र झाला
पण हैदराबाद संस्थान चा समावेश हा भारता मध्ये झाला नव्हता नंतर झालेल्या
हैदराबाद मुक्तिसंग्राम नंतर नांदेड पासून ते औरंगाबाद पर्यंत सर्व भाग हा संयुक्त
महाराष्ट्रात गेला व तेव्हा पासून नांदेड व मराठवाडा हे महाराष्ट्रा चा भाग झाले
1952 च्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघां मध्ये दोन मतदार संघ
तयार झाले यामध्ये एक राखीव तर दुसरा खुला लोकसभा मतदारसंघ झाला व
या ठिकाणी पहिली निवडणूक पार पडली
1952 लोकसभा निवडणूक
या निवडणुकी मध्ये काँग्रेसचे शंकरराव श्रीनिवास टेळकीकर
हे विजयी झाले होते
1952 लोकसभा निवडणूक
या निवडणुकी मध्ये काँग्रेसचे देवराव नामदेव कांबळे
हे विजयी झाले होते
1957 लोकसभा निवडणुक मध्ये
शेतकरी कामगार पक्षाचे हरिहरराव सोनुले हे विजयी झाले होते
राखीव मतदार संघामधून देवराव नामदेव कांबळे हे दुसऱ्यांदा विजयी झाले
1957 च्या लोकसभेच्या निवडणुकी नंतर व 1962 च्या निवडणुकीच्या आधी पूर्वी नांदेड लोकसभा
मतदारसंघां मध्ये दोन मतदारसंघ होते एक राखीव तर दुसरा खुला मतदार संघ होता पण 1962
च्या निवडणुकी आधी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये नांदेड मधील दोन मतदारसंघापैकी
एक राखीव असलेला मतदारसंघ कमी झाला व फक्त एकच खुला मतदार संघ राहिला पूर्वी नांदेड
लोकसभा मतदारसंघां मध्ये दोन खासदार होते तर 1962 च्या निवडणुकी नंतर एकच मतदारसंघ राहिला
1962 लोकसभा निवडणूक
निवडणुकी मध्ये काँग्रेसचे तुलसीदास सुभानराव जाधव हे विजयी झाले होते
1967 लोकसभा निवडणूक
या निवडणुकी मध्ये काँग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर निवडून आले होते
1971 लोकसभा निवडणूक
या निवडणुकी मध्ये काँग्रेसचे व्यंकटराव बाबाराव तरोडेकर हे दुसऱ्यांदा निवडून आले होते
1977 लोकसभा निवडणूक
यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव शंकरराव धोंडगे हे निवडून आले होते
1980 लोकसभा निवडणूक
यामध्ये काँग्रेसचे शंकरराव भाऊराव चव्हाण हे निवडून आले होते
1984 लोकसभा निवडणूक
यामध्ये काँग्रेसचे शंकरराव भाऊराव चव्हाण हे दुसऱ्यांदा निवडून आले होते
1987 लोकसभा पोटनिवडणूक
यामध्ये काँग्रेसचे अशोकराव शंकरराव चव्हाण हे निवडून आले होते
1989 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये जनता दलाचे व्यंकटेश काब्दे हे निवडून आले होते
1991 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या निवडून आल्या होत्या
1996 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे गंगाधरराव कुंटूरकर (देशमुख) हे निवडून आले होते
1998 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे निवडून आले होते
1999 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे निवडून आले होते
2004 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दिगंबर बापूजी पाटील हे निवडून आले होते
2009 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर निवडून आले होते
2014 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अशोकराव शंकरराव चव्हाण हे निवडून आले होते
2019 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडून आले होते
हा आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास आता
भारतीय जनता पार्टीने परत एकदा विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
यांना उमेदवारी दिली आहे