महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसं राज्यामध्ये सर्वत्र प्रचार सभा सुरू झाले आहेत या प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत यामध्ये विशेषता अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांच्या काही वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नाही असे संकेत सध्या मिळत आहेत
बारामती मधून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन अजित दादांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे
पण मागील काही दिवसापासून अजित दादा पवार आणि शरद पवार परत एकदा निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येता की काय?असे संकेत सध्या मिळत आहेत याला काही कारणं देखील आहेत अजित दादा पवार यांनी महायुतीच्या विचारांच्या विरुद्ध घेतलेली भूमिका असेल आणि त्यांच्या वक्तव्यामुळे देखील महायुतीमध्ये तणाव आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे?
सौ.सुनीता पवार यांना उमेदवारी देणे चुकीचे
बारामती मधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी शरद पवार यांनी दिल्यानंतर अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांनी भाषणामध्ये सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी ही सुप्रियाताई सुळे यांच्या विरुद्ध देणे हा निर्णय चुकला असल्याचे जाहीर कबूल केले असं करायला नको होतं असं अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांना वाटतं मग अजित दादा पवार यांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्राताई पवार यांना बारामती मधून उमेदवारी देण्यासाठी कोणाचा दबाव होता का ?असा प्रश्न पडत आहे
सदाभाऊ खोत यांच्यावर टीका
सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासमोर शरद पवार यांच्या बद्दल विचित्र टीका केली त्यांच्या शारीरिक वेंगावर सदाभाऊ खोत यांनी टीका केली त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला व निवडणुकांमध्ये टीका ही होतच असते पण टीका करण्याला देखील काही सीमा असतात हे राजकीय मंडळींनी विसरू नये याचा विसर पूर्णपणे सदाभाऊ खोत यांना पडला आहे सदाभाऊ खोत यांच्या टीकेला उत्तर देताना अजित दादा पवार यांनी थेट विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हटलं त्यांच्या या टीकेमुळे सुद्धा महायुती मध्ये सर्व काही व्यवस्थित आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो ? तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सदाभाऊ खोत यांचा निषेध व्यक्त केला
बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचा अजित दादा पवार यांच्याकडून निषेध
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचार सभेमध्ये बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला पण या नाऱ्यामुळे मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावतो की काय अशी भीती अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांच्या मनात निर्माण झाली असावी म्हणूनच त्यांनी योगी आदित्य नाथ यांच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला
अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांना पत्रकाराने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य हे महाराष्ट्रात येऊन करू नका असा सल्ला देखील योगी अदित्यनाथ यांना अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांनी दिला महाराष्ट्र हे राज्य शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आहे यामध्ये जातीयवादी राजकारणाला थारा नाही त्यामुळे अशा पद्धतीचे नारे हे महाराष्ट्रात येऊन देऊ नका असा सल्ला देखील अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला
नवाब मलिक यांचा प्रचार अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांनी केला
नवाब मलिक यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीवर विरोधकांनी चांगलीच टीका केली त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी जाणार नाही असा खुलासा आशिष शेलार यांनी केला जेव्हा राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड शी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अटक देखील झाली होती नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय कारणास्तव जामिनावर आहेत
हे हि वाचा-अजित दादा पवार नाराज महायुतीची साथ सोडणार?
जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक हे विधानभवनात पोहोचले ते नेमके कोणत्या गटात जाणार याविषयी चर्चा सुरू झाली कारण नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांनी बंड केला व ते महायुतीमध्ये सामील झाले होते .नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते नेमके अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांच्या गटात जाणार की शरद पवार यांच्या गटात जाणार पण नवाब मलिक यांनी अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांच्यासोबत राहणे पसंत केले त्यामुळे काँग्रेस मधील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वक्तव्याचे आठवण करून दिली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळते की नाही यावर बऱ्याच चर्चा झाल्या पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवाब मलिक यांना अधिकृत उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोघांचाही विरोध असताना अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली
उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेच्या विजयावर अजित दादा (AJIT DADA PAWAR) यांची प्रतिक्रिया
लोकसभेच्या दरम्यान सातारा लोकसभा विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली याला कारण म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि याच जागेवर उदयनराजे भोसले हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते शेवटीला ही जागा भारतीय जनता पार्टी ला सोडण्यात आली व उदयनराजे भोसले हे महायुतीचे सातारा मतदारसंघात अधिकृत उमेदवार झाले या निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले हे विजयी झाले पण त्यांच्या या विजयामध्ये ट्रंपेट या चिन्हाचा मोठा वाटा आहे असे वक्तव्य अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांनी केले यामुळे महायुतीमध्येच वाद पेटण्याची शक्यता आहे
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस होता तर ट्रंपेट व तुतारी यामध्ये बरीच समानता आहे आणि त्यामुळे ट्रंपेटला तब्बल 37 हजार मतदान मिळाले ट्रंपेट आणि तूतारी यामधील फरक मतदारांना लक्षात नाही आला म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजयी झाली असा दावा जयंत पाटील यांनी केला होता पण हा दावा भारतीय जनता पार्टीने फेटाळला होता आता महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांनीच जयंत पाटलाच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे
यामुळे महायुतीमध्ये सर्व काही व्यवस्थित नाही असं दिसत आहे ?
वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास अजित दादा पवार हे वारंवार महायुतीच्या विरोधात का भूमिका घेत आहेत यावरून सध्या चर्चा रंगत आहेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे मुखपत्र ऑर्गनायझर मधून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना महायुतीमध्ये बरोबर घेतल्यामुळे लोकसभेला अपयश आल्याची टीका करण्यात आली होती
विधानसभा आणि लोकसभा या दोन्हीही निवडणुकीमध्ये अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्यामुळे अजित दादा पवार हे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत
आता बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांच्या विरोधात त्यांचीच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देऊन शरद पवार यांनी अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांना चांगलेच घेरले आहे शरद पवार हे अजित दादा पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर सर्वात जास्त नाराज असल्याच्या चर्चा आहेत असा खुलासा त्यांनी परळी येथील सभेमध्ये सुद्धा केला
अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांच्या पक्षाला विधानसभेसाठी महायुतीमध्ये मिळालेल्या कमी जागा आणि अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) यांचे मागील काही दिवसांमध्ये वक्तव्य यामुळे अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) हे महायुतीमध्ये नाराज आहेत ? आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित दादा पवार (AJIT DADA PAWAR) हे परत एकदा शरद पवार यांच्याकडे जातील काय याविषयी सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत येणार नाही हे तर निश्चित आहे त्यामुळे नेमकं कोणते कोणते पक्ष एका जागी येऊन सरकार स्थापन करतात याविषयी आज तरी शंभर टक्के अंदाज बांधता येत नाही अजित दादा पवार हे नेमकी आता पुढे काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल