राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार गट व शरद पवार गटवेगवेगळे झाले
व त्यानंतर ही लढाई ही न्यायालयात गेली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या
व सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार
निवडणूक लढवतील असे चित्र सध्या दिसत आहे
पण अजित पवार यांना पवार कुटुंबीयांकडूनच विरोध होताना दिसत आहे
काल एका कार्यक्रमात बोलतानाअजित पवार यांचे
सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली श्रीनिवास पवार
म्हणाले की शेतकऱ्याला कसायला शेत दिले म्हणजे आपण शेताचे मालक होत नाही माननीय शरद पवार साहेब
यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत ते विसरता कामा नये तसेच सुप्रियाताई सुळे या खासदार आहेत
व अजित पवार हे आमदार आहेत त्याच्यामुळे या दोघांचा एकामेकाला विरोध करणेहे काही मला
आवडले नाही असे ते म्हणाले लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसे एकमेकावर टीका
करणे सुरू झालेले आहे पण अजित पवारांना सख्या भावाने केलेला विरोध याकडे ते कसे
पाहतात ते पाहावे लागेल