हिंगोली- डॉक्टरचा पोरगं डॉक्टर होतं मेडिकल वाल्याचा पोरगं मेडिकलवाला होतो इंजिनिअरचे पोरग इंजिनियर होतं
आणि शेतकऱ्याचे पोरग शेतकरी होतं हे आपण आतापर्यंत पाहिले आहे पण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी
तालुक्यातील शिवनी या गावचे प्रगतशील शेतकरी केशवराव जाधव यांचा मुलगा मात्र याला अपवाद ठरला आहे
कारण डॉक्टर आंकेत केशवराव जाधव हा उच्च विद्या विभूषित असून सुद्धा चांगल्या नोकरीला असून सुद्धा त्याने
कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं वडिलांनी दिलेल्या साथीमुळे ते स्वप्न आंकेत नि पूर्णही केलं शिवनी हे छोटस गाव
गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे केशवराव जाधव यांनी मुलाला कळमनुरी मधील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय
येथे प्रवेश दिला व तेथे आंकेत ने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले स्वतः शेतकरी असून देखील मुलगा शिकावा असे स्वप्न
असल्यामुळे आंकेत अकरावी बारावी साठी नांदेड येथील यशवंत महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला व दिवस-रात्र अभ्यास करून
आंकेतने एमबीबीएस ला प्रवेश मिळवला व बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे एमबीबीएस ची परीक्षा पास झाला व डॉक्टर
झाला लगेच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे नोकरीसाठी रुजू झाला पण कलेक्टर
व्हायचे स्वप्न तो पाहतच होता व त्याने आहोरात्र अभ्यास करून यूपीएससीची परीक्षा दिली व पहिल्या प्रयत्नामध्येच त्याने पूर्ण
देशातून 395 व रैक मिळून ही परीक्षा पास झाली आता तो कलेक्टर होणार आहे त्यामुळे त्याचे कुटुंब हे आनंदी आहे व संपूर्ण
कळमनुरी तसेच हिंगोली जिल्ह्याला त्याचा अभिमान वाटत आहे व नवयुवकांना यामुळे चांगली प्रेरणा मिळेल असा विश्वासआंकेत आहे
आंकेत जेव्हा दहावीला होता तेव्हा मराठवाड्यामधील नावाजलेले व्यक्तिमत्व शिवाजी गावंडे यांनी त्याचा अभ्यास व त्याची जिद्द
पाहून हा एक दिवस कलेक्टर होणार असं भाकीत केलं होतं व ते आता खरं झालं आहे
आंकेत तुझ्या या कार्याला संकल् टुडे चा मानाचा मुजरा