भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)हे आज अंतराळ मोहीम पूर्ण करून मायदेशी परतले याप्रसंगी त्यांचे दिल्ली विमानतळावर भारतीयांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह व दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता याप्रसंगी उपस्थित होत्या ही प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे भारतातील एक वायुसेनेमध्ये कार्यरत असलेल्या पायलेट ने अंतराळ मोहीम यशस्वी पार पाडली

शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांचा परिचय
शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla) यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे 10 ऑक्टोबर 1985 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव आशा शुक्ला त्या एक ग्रहणी आहेत तर त्यांच्या वडिलांचे नाव शंभू दयाल शुक्ला ते सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकारी होते त्यांचे शालेय शिक्षण हे सिटी मॉन्टेसरी स्कूल (CMS), लखनऊ. इथून पूर्ण केले. शालेय शिक्षणाच्या दरम्यानच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेले करगिल युद्ध या युद्धामुळे

त्यांना आपणही देश सेवा करावी असे वाटायला लागले आणि त्यांनी भारतीय सेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA): मध्ये बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) पदवी पूर्ण. त्यानंतर डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीमध्ये उड्डाण प्रशिक्षण. त्यानंतर शुभम शुक्ला यांनी पुढील शिक्षण हे भारतीय विज्ञान संस्था (IISC) इथून एअरोस्पेस/एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये एम.टेक.चे शिक्षण पूर्ण केले
हे हि वाचा-UNESCO listed forts of Maharashtra युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील गड किल्ले
शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांची भारतीय वायुसेनेतील कारकीर्द
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी भारतीय वायुसेनेमध्ये 17 जून 2006 मध्ये फायटर स्ट्रीममध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून काम सुरू केले
या ठिकाणी शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी मन लावून काम केले यादरम्यान शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी टेस्ट पायलट/एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम करत असताना सुमारे दोन हजार तासांपेक्षाही जास्त त्यांचे उड्डाणतास झाले या दरम्यान त्यांनी सर्व प्रकारचे भारतीय वायुसेनेमधील विमाने
अवकाशात उडवली यामध्ये प्रामुख्याने मिग 21, मीग 29, सुMKI,जग्वार,हॉक,डॉर्नियर-228, ॲन-32 अशा विविध विमानांमधून उड्डाणे केली हा एक प्रकारचा विक्रमच आहे त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली आणि ते 17 जून 2019 मध्ये ते विंग कमांडर झाले 2024 मध्ये त्यांना ग्रुप कॅप्टन म्हणून पदोन्नती मिळाली

शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांची गगनयान या अंतराळ मोहिमेसाठी निवड
भारतीय वायुसेनेमध्ये कार्यरत असताना शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांची जिद्द व चिकाटी पाहून वायुसेनेतील बड्या अधिकाऱ्यांनी त्यांना भारत आणि अमेरिका यांच्यात संयुक्तरीत्या होणाऱ्या अंतरयाळ मोहीम मिशन गगनयान साठी त्यांची निवड केली आणि शुभम शुक्ला यांचं लहानपणापासून अंतराळात जायचं हे स्वप्न सत्यात उतरायला सुरू झाले निवड झाल्यानंतर शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतराळात जाण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले यामध्ये प्रामुख्याने इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिनमार्फत निवड; 2020–21 मध्ये रशियातील युरी गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर येथे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले व त्यानंतर शुभम शुक्ला ISRO इस्त्रो बंगळूर येथे अंतराळ मिशनची विशेष प्रशिक्षण घेतले

आंतरराष्ट्रीय मोहिम (Axiom Mission-4): ही मोहीम भारत आणि नासा संयुक्त विद्यमान राबवली गेली यासाठी भारताने ISRO ने 548कोटी रुपयांची गुंतवणूक केली विशेष म्हणजे या अंतराळ मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी कुठंलीच फीस घेतली नाही ही विशेष बाब आहे 2025 मध्ये मिशन पायलट म्हणून ISS वर प्रायव्हेट-संघटित Ax-4 मोहिमेत सहभाग; लॉन्च स्थान व यंत्रणा: SpaceX Falcon 9 रॉकेटद्वारे Crew Dragon (Grace C213) वापरून LC-39A, केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा मधून 25 जून 2025 रोजी प्रक्षेपण; ही मोहीम 18 दिवस चालली वैज्ञानिक प्रयोग पार पाडून 15 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर परतले. पॅसिफिक महासागरामध्ये व्यवस्थित रित्या उतरले भारताकडून ISS वर जाणारे ते पहिले, आणि अंतराळात गेलेले राकेश शर्मा यांच्या नंतरचे दुसरे भारतीय ठरले.
हे हि वाचा-Trump Tariff-भारत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ का उघडत नाही? हे खरे कारण आहे
त्या मोहिमेच्या दरम्यान शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी आपल्या देशवासीयांशी संवाद देखील साधला त्यांनी 28 जून 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा केली व नेमकं अंतराळातून आपला देश कसा दिसतो हे विचारलं यादरम्यान शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं हा संवाद भारतातील कोट्यावधी लोकांनी पाहिला व शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)याने आपल्या देशाचे नाव हे अंतराळ देखील कोरले आहे अशा प्रकारची भावना प्रत्येक भारतीयांनी व्यक्त केली पहिला भारतीय जो ISS वर पोहचला आणि भारताला 41 वर्षांनंतर महत्वाची जागतिक दृश्यभूमिका प्राप्त झाली.
7 नवोन्मेषी प्रयोगांसह शास्त्रीय महत्त्व, जे भविष्यातील मानवनिर्मित स्पेस फ्लाइट्समध्ये उपयोगी ठरतील.मिशनचे यश भारताच्या Gaganyaan प्रेग्रामसाठी आधार तयार करते.शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांचे भारतात आगमन
अंतराळातून आल्यानंतर काही दिवस अंतराळवीरांना विशेष निगराणीत ठेवले जाते आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाते शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)देखील दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी मायदेशी परतले व नवी दिल्ली मधील विमानतळावर त्यांची जंगी स्वागत करण्यात आले उद्या म्हणजे 18 ऑगस्ट 2025 रोजी शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत
अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या नंतर शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी अंतराळ मोहीम पूर्ण केली आपण जर विचार करायला गेलो तर अंतराळ मोहिमेमध्ये भारतीयांचा दबदबा हा कायमस्वरूपी राहिलेला स्वर्गीय कल्पना चावला,सुनिता विलियम्स या भारतीय वंशाच्या महिलांनी देखील अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे एका मोहिमेदरम्यान अंतराळवीर कल्पना चावला यांच्या यांना अपघात झाला होता आणि त्यामध्ये त्या मृत्युमुखी पडल्या होत्या
शुभांशू शुक्ला(Shubhanshu Shukla)यांनी ही अंतराळ मोहीम पूर्ण केली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे