Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » 1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल
    1 Comment

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    नेमके काय बदल घडणार?
    Sankalp TodayBy Sankalp TodayJune 1, 2025

    आज एक जून(1st June New Rule)पासून काही सरकारी नियमानं मध्ये काही बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम हा आपल्या आयुष्या वर होऊ शकतो कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे ते समजून घेऊया

    1st June New Rule

    1)एटीएम मधून पैसे काढणे महाग होणार
    आपण रोजच्या वापरामध्ये एटीएम चा वापर पैसे काढण्यासाठी करतो पण मागील काही वर्षापासून बँकांनी सुरुवातीचे काही व्यवहार हेच फक्त मोफत असतात त्यानंतर मात्र प्रत्येक एटीएम च्या व्यवहारासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात यामध्ये ज्या बँका एटीएमची सुविधा आपल्या ग्राहकांना देतात त्यांनी फक्त तीन ते पाच व्यवहार हे मोफत ठेवलेले आहेत त्यानंतरच्या व्यवहाराला मात्र अतिरिक्त पैसे द्यावे लागतात आता या अतिरिक्त दरामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे एक जून 2025(1st June New Rule)पासून तीन ते पाच एटीएम च्या व्यवहारानंतर बाकी सर्व व्यवहारांवर जादा पैसे द्यावे लागतील

    हे हि वाचा-Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    2)क्रेडिट कार्ड वापरणे होणार आणखी महाग
    आपल्यापैकी बरेच जण क्रेडिट कार्डचा उपयोग करतात यामध्ये विशेषता नोकरदार वर्ग व मध्यमवर्गीय व्यक्तींची संख्या ही जास्त आहे पण एक जून(1st June New Rule)पासून क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी द्यावे लागणाऱ्या शुल्कामध्ये वाढ होणार आहे
    1)विदेशी पैशाची देवाणघेवाण यावर अतिरिक्त शुल्क लागणार आहे
    2)युटिलिटी बिल व इंधन यावर देखील अतिरिक्त शुल्क लागणार आहे
    3)क्रेडिट कार्डचा जास्त वापर व्हावा म्हणून बँका अनेक ऑफर काढतात ज्यामध्ये ग्राहकांना पॉईंट्स मिळतात या मिळणाऱ्या पॉईंट्स मध्ये कपात केली जाऊ शकते यामध्ये याचा फरक हा कॅशबॅक ऑफर आणि विदेशातील खर्चावर पडू शकतो

    3)बँकेमधील मुदत ठेव योजना(फिक्स डिपॉझिट)वर व्याज कमी मिळणार
    मध्यमवर्गीयांचे सोन्यानंतर गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना यामध्ये ठराविक मुदतीसाठी एखादी रक्कम ही आपण बँकेमध्ये ठेवतो व त्यावर बँक आपल्याला रिझर्व बँकेने ठरवून दिल्याप्रमाणे व्याजही देते व काही बँका या गुंतवलेल्या रकमेला विमा संरक्षण देखील देतात त्यामुळे मध्यमवर्गीयांचा कल हा फिक्स डिपॉझिट कडे जास्त असतो
    पण आता सहा जून 2025 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया व्याजदरांची समीक्षा करणार आहे यामध्ये रेपो रेट कमी व्हायची शक्यता जास्त आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुदत ठेव योजनेवर मिळणारे व्याज ही कमी होऊ शकते ?याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे या बँकांमध्ये भारतातील सर्वच मोठ्या बँकांचा समावेश होऊ शकतो?

    हे हि वाचा-Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    4)घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ होऊ शकते ?
    प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या दराची समीक्षा करत असते यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलेंडरचे दर हे कमी किंवा वाढत असतात तसेच याही एक जून 2025(1st June New Rule)रोजी होणाऱ्या दरांच्या समीक्षेमध्ये गॅस सिलेंडरचे भाव वाढू शकतात अशी चर्चा सध्या सर्वत्र आहे जे परिवार हे सबसिडी मिळणाऱ्या सिलेंडरवर अवलंबून असतात त्यांचे महिन्याचे बजेट बिघडू शकते?

    1st June New Rule

    5)जीएसटी इनव्हॉईस फॉरमॅट मध्ये बदल
    एक जून 2025(1st June New Rule)पासून जीएसटी च्या इन्व्हाईस फॉरमॅट सिस्टम मध्ये बदल केला जाणार आहे यामध्ये मुख्यतः कॅपिटल लेटर अर्थात पहिल्या बाराखडीत जीएसटी चे सर्व इन्व्हाईस आता आपोआप कॅपिटल लेटर अर्थात पहिल्या बाराखडीत लिहिले जातील
    एक जून 2025 पासून सर्व जुने इन्व्हाईस नंबर केस सेन्सिटिव्ह होतील उदाहरणात XYZअसेल किंवा Xyz असेल xyz असेल कोणत्याही पद्धतीने असेल तरी एकच समजले जाईल यासाठी व्यापाऱ्यांना आपले बिलिंग सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यावे लागतील

    6)आधार मोफत अपडेट करण्यासाठी शेवटची संधी
    आपल्या आधार कार्ड मध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला काही बदल करावे लागतात यामध्ये मुख्यतः आधार कार्ड वर पडलेली चुकीची तारीख असेल किंवा पत्ता असेल किंवा जन्मतारीख असेल या सर्व गोष्टी अपडेट करण्यासाठी आतापर्यंत कुठलेही शुल्क नव्हतं पण 14 जून 2025 पासून मात्र कुठलीही गोष्ट आधार कार्ड मध्ये अपडेट करण्यासाठी पन्नास रुपयांची शुल्क भरावे त्यामुळे आपल्याला जर आधार कार्ड मध्ये कुठलेही अपडेट करायचं असेल तर ते 14 जून पूर्वीच करून घ्यावे

    हे काही महत्वाचे नियमांमध्ये बदल होणार आहे याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे तरीपण आपण काही गोष्टी वेळेत केल्या तर आपला निश्चित फायदा होऊ शकतो यामध्ये

    1) मोफत आधार अपडेट करण्यासाठी 14 जून 2025 पर्यंत ची वेळ आहे यावेळी आधी आपण आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला अतिरिक्त शुल्क लागणार नाही

    2)तसेच जीएसटी संदर्भामध्ये आपण आपले बिलिंग सॉफ्टवेअर लवकरात लवकर अपडेट करून घ्यावे

    3)मुदत ठेव योजनेचे व्याजदर कमी होणार असल्यामुळे म्युचल फंड शेअर्स यांसारखे दुसरेही पर्यायाचा आपण विचार शक्य झाल्यास जरूर करावा

    4)गॅस सिलेंडरचे भाव हे वाढू शकतात त्यामुळे एक जून च्या आधीच आपण गॅस सिलेंडर बुक करून ठेवावे

    5)एटीएम वर अतिरिक्त शुल्क लागणार आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त व्यवहार हा यूपीआय द्वारेच करावा

    वरील काही गोष्टीची काळजी घेतल्यास मात्र आपल्याला निश्चित आर्थिक फायदा होऊ शकतो एक जून 2025(1st June New Rule)पासून कुठल्या नियमांमध्ये बदल होणार आहे ते आपण पाहिले आहे

    Post Views: 208
    1june2025 aadhaarupdate bankingupdates creditcardpolicy epfo3.0 financialrules fixeddeposit newrules
    View 1 Comment

    1 Comment

    1. Kumar on June 1, 2025 9:01 am

      Good information

      Reply

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130215
    Views Today : 1524
    Who's Online : 1
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.