अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)आणि युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांच्यामध्ये झालेला वाद संपूर्ण जगाने पाहिला पण त्यानंतर झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांनी ब्रिटनचा दौरा केला आणि यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधान केरी स्टार्मर (Keir Starmer)यांनी मात्र झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांना आर्थिक मदत देखील केली आणि संपूर्ण ब्रिटन तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन देखील दिले या दोन घटनांमुळे जागतिक स्तरावर काय होणार त्याविषयी आपण चर्चा करूया
रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध चालू असताना अमेरिकेने मात्र काहीसा वेगळा पर्याय निवडला आहे व या युद्धापासून स्वतःला दूर करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे युद्ध थांबवा अशा सूचना देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांना दिल्या पण झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांचं न ऐकण्याचा निर्णय घेतला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व युक्रेंच राष्ट्राध्यक्ष यांच्यातील वाद(The dispute between the US President and the Ukrainian President)
युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये मागील दोन-तीन वर्षापासून युद्ध चालू आहे रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदत तसेच सैन्य मदत देखील केली होती पण नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)हे परत एकदा सत्तेत आले व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले यानंतर मात्र डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी रशिया आणि युक्रेन युद्धावर काहीशी वेगळी भूमिका घेतल्याची आपल्याला पाहायला मिळाले जर युक्रेन शांती प्रस्ताव मान्य करत नसेल तर अमेरिका या युद्धाच्या बाहेर पडेल असा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांना दिला या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांच्यावर एक पोस्ट द्वारे आरोप केला की ते शांतीसाठी तयार नाहीत
आमच्या भेटीच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी समोर आल्या पण राष्ट्रपती झेलेंस्की (Volodymyr Zelensky) शांती प्रस्तावासाठी तयार नाहीत अमेरिकेला यातून कुठलाही फायदा होणार नाही फक्त शांती राहावी हीच अमेरिकेची इच्छा आहे झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांनी अमेरिकेचा अपमान केला आहे जर त्यांना शांती प्रस्ताव मान्य असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे (Volodymyr Zelensky) यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमां समोर बोलताना युक्रेन आणि अमेरिकेचे संबंध हे पूर्वीसारखे चांगले व्हावे ही माझी इच्छा आहे
हे हि –Union Budget 2025- मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी
चर्चेदरम्यान वाद का झाला ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष या दोघांमध्ये चालू असलेल्या चर्चेमध्ये ठिणगी तेव्हा पडली जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हेन्स यांनी युक्रेन च्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले की या युद्धावर कुटनीती द्वारे सुद्धा काम करता येईल यावर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांनी कुठल्या कुटनीती संदर्भात आपण बोलत आहात त्यावर व्हेन्स यांनी त्या कुटनितीबद्दल बोलत आहे ज्यामुळे तुमचा आणि रशियाचे युद्ध थांबेल यानंतर भडकलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी झेलेंस्की(Volodymyr Zelensky) चांगलेच धारेवर धरले व तिसरं विश्व युद्ध करायचे की काय?
असा प्रश्न देखील त्यांना विचारला यानंतर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) हे उठून एका वेगळ्या रूममध्ये गेले व त्या ठिकाणी अमेरिकेचे रक्षा सल्लागार माइक वोल्टज व विदेश मंत्री मार्को-रुबीयो यांनी झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांना वाईट हाऊस सोडण्याचा सल्ला दिला यानंतर युक्रेंची राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांनी वाईट हाऊस सोडले अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांना तानाशाह देखील म्हटलं होतं आणि त्यांच्यामुळेच रशिया आणि ब्रिटिश मध्ये युद्ध झाल्याचे ही प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी वक्तव्य केलं होतं युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांची कुठलीही गोष्ट ऐकली नाही व त्यांनी अमेरिका सोडली

अमेरिकेने आपली भूमिका का बदलली?(Why did the US change its position?)
मागील काही वर्षापासून अमेरिका ने अनेक युद्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला यामध्ये इराक वर केलेला अमेरिकेचा हल्ला असेल अफगाणिस्तान वर केलेला अमेरिकेचा हल्ला असेल तसेच मागील काही वर्षापासून अमेरिकेने जगामध्ये ज्या ज्या देशांमध्ये युद्ध चालू आहे त्यातील एका देशाला भक्कमपणे आर्थिक पाठिंबा देखील दिलेला आहे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये अमेरिकेने उघडपणे युक्रेनला साथ दिली सैन्य मदत देखील केली तसेच इजराइल आणि पालेस्टीन यांच्या मध्ये चालू असलेल्या युद्धामध्ये देखील अमेरिकेने इजराइलला पाठिंबा दिला आणि त्यांना देखील आर्थिक मदत व सैन्य मदत देखील केली. या युद्धामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे तसेच दुसऱ्या बाजूला चीन कुठलंच युद्ध न लढल्यामुळे चीनची अर्थव्यवस्था ही अत्यंत मजबूत अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेली आहे
हे हि –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
अमेरिकेचा बहुतांश खर्च हा युद्ध आणि सैनिकांवर होत आहे त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी यापुढे कुठल्याही देशाला मदत न करण्याचे ठरविले आहे अशी चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे यामुळे आता थेट युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाला डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी खडे बोल सुनावले व यापुढे कुठलीही मदत न करण्याचा निर्णय देखील घेतला या निर्णयामुळे रशियाला मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर याचे परिणाम म्हणजे चीन देखील आपल्या विस्तारीकरण करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी लहान मोठ्या देशांना त्रास देईल अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे चीनचे मनसुबे हे अधिक तीव्र होतील अशी शक्यता आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक हे व्यक्त करत आहेत तशा बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये सध्या आहेत

यानंतर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांनी देखील एक्स वर एक पोस्ट शेअर केली व त्यामध्ये त्यांनी लिहिले की आभारी आहे अमेरिके चा आभारी आहे तुमच्या समर्थनासाठी आभारी आहे या भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काँग्रेस आणि अमेरिकेचे जनतेची मी आभार मानतो युक्रेन फक्त शांतता प्रस्थापित करू इच्छित आहे आणि आम्ही त्याच्यासाठी काम करत आहोत

संपूर्ण ब्रिटन तुमच्या पाठीशी मिस्टर प्रेसिडेंट(The whole of Britain is behind you, Mr. President.)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी युक्रेचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांच्यामध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची यानंतर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) हे ब्रिटन दौऱ्यावर गेले आणि त्या ठिकाणी लंडनमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान केरी स्टार्मर (Keir Starmer)यांची भेट घेतली या भेटीच्या दरम्यान केरी स्टार्मर (Keir Starmer)यांनी झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांची गळाभेट घेतली व त्यांची पाठ देखील थोपटली अमेरिकेत जे झालं त्याच्या अगदी उलट ब्रिटनमध्ये झालं पंतप्रधान केरी स्टार्मर (Keir Starmer)यांनी युक्रेनला मोठी आर्थिक मदत कर्ज रूपाने केली ब्रिटन हा युक्रेनच्या पाठीशी आहे असा संदेश देखील जगाला दिला या घडामोडी मुळे येणाऱ्या काळात संपूर्ण जगाचा नकाशा बदलेली की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे
युक्रेन आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये 2.26 अब्ज पाऊंड एवढे रुपये देण्याच्या कर्जावर दोन्ही देशांमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या की मदत युक्रेन आपल्या देशाच्या सुरक्षेतेसाठी वापर करेल मागील तीन वर्षापासून ब्रिटन आणि रशियामध्ये चालू असलेले युद्ध हे काही केल्या संपत नाही यापुढे अमेरिकेने देखील ब्रिटनला मोठी सैन्य व आर्थिक मदत केलेली आहे पण यावेळी मात्र व्हाईट हाऊस मधून झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांच्या नशिबी निराशा आली 10 डाऊनिंग स्ट्रीट वरून इंग्लंडने ब्रिटनची मदत करून थेट अमेरिकेलाच आव्हान दिल्याचे पाहायला मिळाले डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अगदी विरुद्ध युरोपमधील राष्ट्रांनी निर्णय घेतला युरोपियन राष्ट्र अमेरिकेत झुकणार नाही हे या कृती मधून दिसून आले या झालेल्या करारानंतर झेलेंस्की(Volodymyr Zelensky) यांनी इंग्लंडचे पंतप्रधान केरि स्टार्मर यांचे उपकार देखील मानले
या दोन्ही घटनांचा परिणाम हा जागतिक स्तरावर होणार आहे अमेरिकेच्या या धोरणामुळे चीन सारख्या देशांचे मनोबल आता वाढणार आहे आणि याचा त्रास चीनच्या लगत असलेल्या छोट्या छोट्या देशांना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे