महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले शरद पवार(Sharad Pawar)परत एकदा चर्चेत आहेत आणि ही चर्चा व्हायच्या मागे कारण आहे ते शरद पवार(Sharad Pawar)यांनी एका कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली की काय ? असं वाटायला लागले शरद पवारांनी(Sharad Pawar)उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eknath Shinde)यांच्यासोबत एक स्टेज शेअर करणे हेच महाविकास आघाडीतील इतर पक्षांना आवडलेले नाही
नेमकं शरद पवार असं का वागतात ?(Why is Sharad Pawar acting like this?)
राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय नेत्याचा अभ्यास करून काही अंशी आपल्याला त्या नेत्याचा अंदाजा बांधता येतो पण शरद पवार(Sharad Pawar)मात्र या संपूर्ण प्रक्रियेच्या वेगळे आहेत शरद पवार(Sharad Pawar)कधी काय करतील हे आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय विश्लेषकाला कळालेले नाही भाकरी फिरवायची वेळ आली आहे असे म्हणतत व शरद पवारांनी(Sharad Pawar)कोणाला अपेक्षित नसतात अशी काही राजकीय डाव खेळलेले आहेत ?

एकनाथराव शिंदे,शरद पवार,ज्योतिरादित्य शिंदें एकाच मंचावर(Eknathrao Shinde, Sharad Pawar, Jyotiraditya Shinde on the same stage)
शरद पवार(Sharad Pawar)यांच्या नावाची परत एकदा चर्चा सुरू झाली ती एका कार्यक्रमाला नवी दिल्ली येथे मराठा सरदार महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार हा यंदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eknath Shinde)यांना जाहीर झाला आणि याच कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदें यांनी या पुरस्काराच्या वितरणासाठी शरदचंद्र पवार(Sharad Pawar)यांना आमंत्रण दिले शरदचंद्र पवार(Sharad Pawar)यांनी या कार्यक्रमाला हजेरी देखील लावली त्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार(Sharad Pawar)यांनी एकनाथराव शिंदे(Eknath Shinde)यांचा पगडी घालून सत्कार देखील केला हा कार्यक्रम संपल्याबरोबर लगेच या कार्यक्रमा विषयी प्रतिक्रिया या महाराष्ट्रात उमटायला लागल्या दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा सत्कार झाला ? या कार्यक्रमांमध्ये बोलताना शरद पवार(Sharad Pawar)यांनी नागरी समस्यांची जाण असणाऱ्या नेत्यांपैकी एकनाथराव शिंदे(Eknath Shinde)असा उल्लेख देखील त्यांनी केला आहे

खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये संजय राऊत यांनी शरद पवार(Sharad Pawar)यांनी एकनाथराव शिंदे(Eknath Shinde) यांचा सत्कार करायला नको होता ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांचा शरद पवार(Sharad Pawar)यांनी सत्कार करून कसे चालेल असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला हे शरद पवार(Sharad Pawar)यांचं राजकारण आहे आम्हालाही ते राजकारण कळतं असं देखील संजय राऊत यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार(Sharad Pawar)यांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली जेव्हा शरद पवार(Sharad Pawar)यांना या नाराजीच्या बातम्या सांगितल्या तेव्हा त्यांनी फक्त एक स्मित हास्य केले अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली आहे
हे हि वाचा–मंडल आयोगाच्या शिफारसी शरद पवार यांच्यामुळे लागू झाल्या ? -छगन भुजबळ
महाविकास आघाडी च्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान एकनाथराव शिंदे(Eknath Shinde) यांना गद्दार असल्याचे वारंवार आपल्या प्रचार सभांमधून सांगितले आणि ते कसे चुकले आणि त्यांना चूक कोणी करावा लावली याविषयी सुद्धा अनेक विधान उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये केले पण शरद पवार(Sharad Pawar)यांनीच एकनाथराव शिंदे(Eknath Shinde)आणि भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदें यांच्यासोबत एकाच मंचावर का गेले असाही प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आला आहे
एकीकडे संजय राऊत व उद्धव ठाकरे हे शरद पवार(Sharad Pawar)यांच्यावर टीका करत असताना याच कार्यक्रमांमध्ये ठाकरे गटाचा एक खासदार देखील उपस्थित होता अशीही चर्चा आहे त्यामुळे या कार्यक्रमाकडे मिशन टायगर म्हणून देखील बघितले जात आहे?याआधी देखील पुण्यातील लोकमान्य टिळक यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला या पुरस्काराचे पत्र शरद पवार(Sharad Pawar)यांनी नरेंद्र मोदी यांना पाठवले व तो पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला
शरद पवार यांचे राजकारण (Politics of Sharad Pawar)
शरद पवार(Sharad Pawar)हे बोलतात तेव्हा त्यांचा रोख नेमका कोणाकडे असतो याची आकलन करणे अवघड असते ज्यावेळेस ते असं म्हणतात की माझं कोणाशी शत्रुत्व नाही त्याचा अर्थ त्यांनी सगळे दरवाजे उघडे ठेवले आहेत असा देखील होतो ? 2014 मध्ये देवेंद्र फडवणीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये वाद चालू असताना शरद पवार(Sharad Pawar)यांनी सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता ? तसेच त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढल्या पण बहुमताचा आकडा हा भारतीय जनता पार्टीला गाठता येत नाही व उद्धव ठाकरे यांची नाराजी शरद पवार(Sharad Pawar)यांनी बरोबर ओळखली आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांची मिळून महाविकास आघाडी तयार करून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील केले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमध्ये वैचारिक भिन्नता ही खूप मोठी होती
हे हि वाचा–गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज
तरी देखील शरद पवार(Sharad Pawar)यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलेच
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा हा महाविकास आघाडीचा होता तो आदानींचा धारावी पुनर्व विकास प्रकल्प आदानींना द्यावा की नाही याविषयी वारंवार राहुल गांधी उद्धव ठाकरे ही टीका करत असताना महाविकास आघाडीचा घटक पक्षाचे नेते असलेले शरद पवार(Sharad Pawar) यांनी मात्र आदाणी यांच्यावर कुठलीही टीका केली नाही या उलट गौतम आदानि आणि शरद पवार(Sharad Pawar)या दोघांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण असल्याचे वारंवार आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहिले आहे
शरद पवार(Sharad Pawar)यांच्या राजकारणाविषयी वारंवार एक गोष्ट बोलली जाते की तें संबंध जपणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते पण या हितसंबंधांमधून अनेक वेळा आपण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचे सुद्धा पाहिले आहे

मैत्री जपणारे शरद पवार(Sharad Pawar who cherishes friendship)
मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे दोन राजकीय भूकंप झाले. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष फुटले एकनाथराव शिंदे यांच्या बंडा नंतर उद्धव ठाकरे व एकनाथराव शिंदे(Eknath Shinde)या दोघांमध्ये कुठेही संवाद झाल्याचे पाहायला मिळाले नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक नेते हे शरद पवार(Sharad Pawar)यांच्या संपर्कात होते ?शरद पवार(Sharad Pawar)यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः अजित दादा पवार हे शरद पवार(Sharad Pawar)यांना भेटायला देखील गेले होते त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपण्याची कला ही शरद पवारांमध्ये(Sharad Pawar)आहे
या सत्कार समारंभाकडे महाराष्ट्र कसा पाहत आहे
दिल्लीतील सत्कार समारंभ नंतर महाराष्ट्रात मात्र वेगवेगळ्या प्रतिक्रिया या उमटत आहेत
या सत्कार समारंभामुळे महाराष्ट्रामध्ये कोणता राजकीय भूकंप येणार नाही अशी देखील चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये आहे ?
शरद पवार(Sharad Pawar)हे नेमकं कधी काय करतील याचा कुठलाही नेम सांगता येत नाही त्यामुळे या सत्कार समारंभाकडे प्रत्येक अँगलने बघणे गरजेचे आहे असेही काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे ?
एखाद्या महाराष्ट्राच्या हितासंदर्भात कुठला निर्णय घ्यायचा असेल तर ही राजकीय मंडळी एकत्रित येत नाही पण एरवी मात्र ही राजकीय मंडळी एकत्रित येतात मग महाराष्ट्राच्या प्रश्नावर हे एकत्रित का येऊ नये असा प्रश्न देखील जनता उपस्थित करत आहे
शरद पवार(Sharad Pawar)यांनी खरोखरच राजकारणा पलीकडची मैत्री कशी असती हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ?
अशा अनेक प्रतिक्रिया सध्या महाराष्ट्रात उमटत आहेत पण तरीसुद्धा दिल्लीमध्ये झालेल्या सत्कार समारंभामुळे आघाडीत बिघाडी होती की काय हा प्रश्न मात्र निश्चित तयार झाला आहे ?
या सत्कार समारंभ फक्त मैत्री जपणे सुसंस्कृत राजकारण हे असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे पण नेमके यामागे काय कारण आहे हे पुढील काही दिवसांमध्ये एखाद्या वेळेला स्पष्ट देखील होऊ शकते
सामान्य कार्यकर्ते मात्र राजकीय विचारसरणीमुळे अनेकदा वाद करताना आपल्याला पाहायला मिळतात पण आपण जर वरच्या स्तरावरील राजकारणाचा विचार केला तर तेथे मात्र कोणीही मित्र नसतो आणि कोणीही शत्रू नसतो असते ती फक्त वैचारिक मतभिन्नता
1 Comment
Good