नवी दिल्ली– दिल्ली विधानसभा (Delhi Vidhansabha Election)निवडणुकीमध्ये सध्या प्रचार सर्वच राजकीय पक्षांनी जोरात चालू केला आहे यामध्ये आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होताना दिसत आहेत मुख्यता दिल्ली मध्ये भारतीय जनता पार्टी(Bharatiya Janata Party)विरुद्ध आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party) असा सामना होणार आहे कोणत्या कोणत्या प्रचाराच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत आहे

अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जन आंदोलन आणि त्यानंतर लोकपाल विधेयकावरून अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे उपोषण सुरू केले होते या आंदोलना दरम्यान अण्णा हजारे यांच्यासोबत मनीष सिसोदिया किरण बेदी अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांसारखे असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला या आंदोलनामधून अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)हे पुढे राजकारणात सक्रिय झाले आणि त्यांनी आम आदमी पार्टीची(Aam Aadmi Party)स्थापना केली. स्थापना झालेल्या वर्षापासून अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांचा राजकीय आलेख हा चढता राहिलेला आहे ते थेट नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान देखील झाले पण 2020 ते 2025 या दरम्यान मात्र अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांचा आलेख काहीसा उतरला होता पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला आहोत अभुतपूर्व असे यश मिळालं आणि पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून श्री भगवंत मान हे सत्तारूढ झाले पण यानंतर दिल्लीमध्ये कथित मद्य घोटाळा समोर आला आणि याच घोटाळ्याच्या आरोपांमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांना 21 मार्च 2024 रोजी अटक देखील झाली व 13 सप्टेंबर 2024 रोजी पण जेव्हा अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)हे कारागृहामध्ये होते
हे हि वाचा–Mahakumbh mela महा कुंभमेळावाला आज पासून सुरवात
तेव्हा त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही व कारागृहामध्ये बसूनच त्यांनी दिल्लीचा कारभार चालवला आपल्या भाषणांमधून वारंवार अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)म्हणत असत की ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होईल त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही पण अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनी मात्र आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीने(Bharatiya Janata Party)अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांच्यावर अनेक वेळा टीका देखील केली जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्या
हे हि वाचा–MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा
अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनी 2020 च्या निवडणुकीमध्ये चार प्रमुख घोषणा केल्या होत्या व या घोषणा करताना अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनी जर आपण या गोष्टीतील कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकलो नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला मतदान मागायला येणार नाही असे जाहीरपणे सांगितले होते त्या चार घोषणा होत्या
1)दिल्लीमधील प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी नळावाटे येईल
2)दिल्ली मधून वाहणाऱ्या यमुना नदी पूर्ण साफ करू कुठेही तुम्हाला यमुना नदी दूषित दिसणार नाही
3)दिल्ली मधील रस्ते विदेशातील रस्त्यांप्रमाणे तयार करू
4)दिल्लीचे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करू
या प्रमुख मुद्द्यांवर 2020 मध्ये अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनी निवडणूक लढविली होती पण आजही यातील एकही घोषणा ही पूर्णपणे सफल झालेली नाही याच कारणामुळे भारतीय जनता पार्टीने(Bharatiya Janata Party)अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)व आम आदमी पार्टीवर मोठे आरोप करायला सुरुवात केलेली आहे अरविंद केजरीवालेंनी देखील जनतेला मला आणखीन पाच वर्षे द्या मी वरील सर्व घोषणा पूर्ण करतो असे आश्वासन केजीरीवाल यांनी जनतेला दिले आहे
2020 ची दिल्ली विधानसभा (DELHI)निवडणूक दिल्ली विधानसभा (DELHI)निवडणूक
दिल्ली विधानसभेमध्ये एकूण 70 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा हा 36 चा आहे आपण जर 2020 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करायला गेलो तर एकूण मतदान हे 62.59% एवढे मतदान झाले होते या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party)हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party) 54.30% एवढे मतदान मिळाले होते तर त्यांना 62 जागी त्यांचे उमेदवार विजयी झाले होते तर भारतीय जनता पार्टीला(Bharatiya Janata Party)एकूण 32.3% एवढे मतदान झाले होते तर भारतीय जनता पार्टीला(Bharatiya Janata Party)केवळ मात्र आठ जागांवर समाधान मानावे लागले होते या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही दिल्लीमध्ये सर्वात जास्त काळ काँग्रेस सत्तेत होती आणि 2020 मध्ये काँग्रेसला एकही जागा दिल्लीमध्ये जिंकता आलेली नाही

काँग्रेस पक्षाची जवळीक
आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party)या पक्षाचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष हा काँग्रेस होता पण पुढे लोकसभेसाठी व इतर राज्यासाठी काँग्रेस सोबत आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party)अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनी हात मिळवणी केली हे दोन्हीही पक्ष हे लोकसभेला एकत्रित लढतात तर विधानसभेला मात्र त्यांची युती तुटलेली असते याचाही खूप मोठा फटका हा अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांना या निवडणुकीत बसू शकतो?
भारतीय जनता पार्टीकडे(Bharatiya Janata Party)मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्ली मधून भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले दिल्लीमध्ये येणाऱ्या लोकसभेच्या सातही जागी भारतीय जनता पार्टीचे(Bharatiya Janata Party)उमेदवार निवडून आले आपण जर दिल्लीच्या मतदारांचा विचार करायला गेलो तर हे मतदार लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या(Bharatiya Janata Party)बाजूने तर विधानसभेला आम आदमी पार्टीच्या(Aam Aadmi Party)बाजूने उभे राहतात हे आपण पाहिलेले आहे तसेच भारतीय जनता पार्टीकडे(Bharatiya Janata Party)मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही निवडणूक झाल्यानंतर आम्ही ते ठरवू असे भारतीय जनता पार्टीच्या(Bharatiya Janata Party) प्रवक्त्यांनी सांगितले आहे याच मुद्द्याला धरून आम आदमी पार्टीने(Aam Aadmi Party)भारतीय जनता पार्टीवर आरोप करायला सुरुवात केली आहे
दिल्ली विधानसभा (DELHI)निवडणुकीमध्ये गाजणारे काही मुद्दे
अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)जेंव्हा पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनी घोषणा केली होती की ते सरकारी निवासामध्ये राहणार नाहीत लाल दिव्याची गाडी वापरणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी त्यावेळी केल्या होत्या पण आज मात्र अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)हे सरकारी गाडी वापरतात ? आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री चे निवासस्थानावर केले गेलेला खर्च सुद्धा चर्चेचा विषय हा मागच्या वर्षभरामध्ये राहिलेला आहे या दोन मुद्द्यावर सध्या भारतीय जनता पार्टी(Bharatiya Janata Party)आम आदमी पार्टीला(Aam Aadmi Party) टीका करत आहेत
दिल्ली विधानसभा (DELHI)निवडणुकीचा प्रचार हा आता जोरात सुरू झाला आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रभाव हा बिलकुल पाहिला मिळत नाहीये लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही निवडणुकीमध्ये काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही व याही निवडणुकीमध्ये काँग्रेसचा प्रभाव या निवडणुकीमध्ये दिसून येत नाहीये असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे भारतीय जनता पार्टी(Bharatiya Janata Party)आणि आम आदमी पार्टीमध्ये(Aam Aadmi Party)दिल्ली विधानसभेसाठी थेट लढत होईल या संपूर्ण लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीने(Bharatiya Janata Party)प्रचारासाठी

आपले सर्व दिग्गज प्रचारासाठी पाठवले आहेत तर दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)हे सुद्धा प्रचाराला लागलेले आहेत कथित मद्य घोटाळ्यामध्ये झालेली अटक त्यानंतर मिळालेला जामीन हा सर्व घटनाक्रम पाहता अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांनाही निवडणूक गतनिवडणुकी इतकी सोपी जाणार नाही असे संकेत सध्या मिळत आहेत भारतीय जनता पार्टीने(Bharatiya Janata Party)आठवा वेतन आयोगात लागू करण्याचा निर्णय घेतला त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीला(Bharatiya Janata Party)नेमकं या निवडणुकीत होतो की नाही ते आता पहावं लागेल कारण दिल्लीमध्ये सरकारी नोकरदारांची संख्या ही मोठी आहे हे मतदार निर्णायक मतदार आहेत
वरील सर्व गोष्टींचा विचार करता आम आदमी पार्टीवर या निवडणुकीमध्ये दिल्लीची जनता विश्वास करेल का ? तसेच मुख्यमंत्री पदा बाबतीत कुठलीही चेहरा हा भारतीय जनता पार्टीकडे(Bharatiya Janata Party) नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला(Bharatiya Janata Party)याचा फटका बसेल काय ? या सर्व गोष्टींचा निर्णय हा निकालांती स्पष्ट होईल पण एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party)या दोघांपैकी कोण सत्तेत येईल हे आपल्याला निकालांती स्पष्ट होईल पण दिल्लीची जनता अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांना परत एकदा पाच वर्षाची संधी देईल की बदल करून भारतीय जनता पार्टीला(Bharatiya Janata Party)दिल्लीची सत्ता देतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
दोन्हीही पक्षांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मोठमोठ्या आश्वासन दिलेली आहेत दिल्ली विधानसभा (DELHI)निवडणुकीमध्ये महाराष्ट्राप्रमाणेच लाडकी बहीण या योजनेची चर्चा सर्वात जास्त सध्या आहे
2 Comments
Pingback: delhi exit poll 2025-दिल्ली मध्ये तख्तापलट ... बीजेपी सरकार,डबल इंजिन सरकार एक्झिट पोल मध्ये - Sankalp Today
Pingback: Delhi Election Result 2025 : 'आप'चा सुपडा साफ; अरविंद केजरीवाल पराभूत,दिल्लीत भाजपा सरकार - Sankalp Today