महाराष्ट्र मधील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला(MAHAYUTI)मोठे यश मिळाले याला सुनामी म्हणावं की महायुतीचे(MAHAYUTI) महावादळ म्हणावं असा प्रश्न मनामध्ये पडतो आणि याला कारण आहे महायुतीने जिंकलेल्या जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला(MAHAYUTI)तब्बल 235 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला 50 एवढ्या जागी समाधान मानावे लागले महायुतीला(MAHAYUTI)आलेला यशाचे मागची काय कारण आहेतमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA)
राज्यातील महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) सुरू केली व या योजनेमधून राज्यातील महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये प्रति महिना टाकण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. अशाच पद्धतीची एक योजना ही मध्य प्रदेश मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सुरू केली होती त्या योजनेचे नाव लाडली बहन योजना होते
तशाच पद्धतीची योजना महाराष्ट्र देखील सुरू केली व या योजनेचा सकारात्मक परिणाम हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर पाहायला मिळाला राज्यातील महिलांनी महायुतीला मतदान करणे पसंत केले जेव्हाही योजना जाहीर झाली तेव्हा महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)नेत्यांनी या योजनेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते राज्याची तिजोरी रिकामी असताना ही योजना राज्याला परवडेल काय ?पण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे याच वाक्याला पकडून महायुतीने(MAHAYUTI) महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi)ही लाडकी बहीण योजनेच्या(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) विरोधात असल्याचा प्रचार करायला सुरुवात केली.
अशा पद्धतीच्या जाहिराती सर्व समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात दिल्या जाऊ लागल्या व्यवस्थित रित्या जाहिरात करून महायुतीने(MAHAYUTI) प्रत्येक महिलेच्या मनामध्ये या योजनेबद्दल सकारात्मकता तयार केली आणि याचाच फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला(MAHAYUTI) झाल्याचे पाहायला मिळाले महायुतीला(MAHAYUTI)आलेल्या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) सर्वाधिक वाटा आहे
महाविकास आघाडीच्या प्रचारात दम नसणे
लोकसभेला महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi) आलेले यश आणि महायुतीला(MAHAYUTI)आलेले अपयश महायुतीने(MAHAYUTI)या अपयशातून चांगला धडा घेतला व ग्रामीण भागात जाऊन लोकसभेला नेमकी अपयश का आले याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित कसे करता येईल यासाठी प्रभावी योजना आखायला सुरुवात केली तर दुसरीकडे महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi)लोकसभेला आलेल्या यशामुळे विधानसभेला देखील अशाच पद्धतीचे यश येईल अशा अविर्भावात महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi)नेते वावरत होते
आणि राहुल गांधी व महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) इतर नेते यांच्या भाषणामध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील तेच तेच मुद्दे वारंवार बोलले गेले राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योजक गौतम अदानी या दोन विषया शिवाय नफरत की राजनीति हे एवढेच विषय घेऊन प्रचार सभांमध्ये राहुल गांधी भाषण करत होते महाराष्ट्रातील स्थानिक मुद्दे बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य हे महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)वतीने होताना दिसले नाही तर उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणामध्ये गद्दार खोके अशा पद्धतीचे तेच तेच वक्तव्य वारंवार केले गेले यामुळे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कोणतेही ठोस विचार महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)प्रचारामध्ये दिसले नाही त्याचाही खूप मोठा फटका हा महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi)राज्यात बसताना दिसला
एक है तो सेफ है
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या प्रचार सभांमध्ये एक है तो सेफ है हा नारा दिला आणि या भाषणांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिम समाजाला निघालेला फतवा याचा उल्लेख केला व वोट जिहाद याविषयी प्रत्येक प्रचार सभेमध्ये बोलायला सुरुवात केली तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला वरील तिन्ही वक्तव्य ही महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील काही नेत्यांना पटले नाही त्यांनी या गोष्टीचा विरोध देखील केला पण दुसरीकडे हिंदू धर्मातील मतदारांनी मात्र एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीला व महायुतीला(MAHAYUTI)भरभरून मतदान केले
हे हि पाहा -https://youtu.be/qzmRjrijxIY?si=U62RIOiDQ_1pWT0b
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना
विधानसभा निवडणुकीच्या आधी ही निवडणूक ही सोयाबीनच्या पडलेल्या भावाच्या आसपास फिरेल व विरोधकांच्या प्रचार सभांमध्ये सोयाबीनच्या भावा विषयी चर्चा होईल असे वाटत होते पण महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याने एक दोन वक्तव्य वगळता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर दुसरीकडे महायुतीने(MAHAYUTI)केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सुरू केलेल्या शेतकरी सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनांमधून प्रतिमा हा एक हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते व ते अनुदान खात्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तर निवडणुकीच्या जाहीरनाम्या मध्ये महायुतीने(MAHAYUTI)एक चांगल्या योजनेची घोषणा केली
जर किमान आधारभूत किमतीच्या खाली शेतीमालाचे भाव घसरले तर शेतीमालाला आलेला भाव आणि किमान आधारभूत किंमत यामधील फरक हा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाईल अशी योजना माहितीने जाहीर केली तसेच सत्तेत आल्यानंतर आपण शेतकऱ्यांची कर्ज माफ करू असेही आश्वासन देण्यात आले होते आणि पाच वर्षासाठी कृषी पंपांना विज बिल येणार नाही ही महत्त्वाकांक्षी योजना देखील राज्य सरकारने चालू केली आहे याही गोष्टीचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर दिसून आला शेतकऱ्यांनी जात-पात विसरून महायुतीच्या(MAHAYUTI)मागे राहणं पसंत केलं
हे हि वाचा महायुती व महाविकास आघाडी कडून आश्वासनांचा पाऊस
योग्य उमेदवाराची निवड
कुठलीही निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम उमेदवारांची गरज असते आणि महायुतीने(MAHAYUTI)घटक पक्षांमधील कलह बाजूला करून एकमताने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा देखील झाला महायुतीने संपूर्ण निवडणुकी देवेंद्र फडणवीस यांनी आखून दिलेल्या पद्धतीनेच लढवली आणि त्यामुळे 288 मतदार संघामध्ये महायुतीला(MAHAYUTI) बारकाईने लक्ष देता आले प्रत्यक्षात जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा निर्णय हा महायुतीने (MAHAYUTI)घेतला व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महायुतीने आपल्या विविध योजना पोहोचवल्या देखील
मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे झालेले आंदोलन आणि मराठवाड्यात मराठा समाजाच्या मतदारांची असलेली संख्या लक्षात घेता महायुतीने(MAHAYUTI)मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे उमेदवार दिले व वैयक्तिक संबंध यामुळे महायुतीच्या(MAHAYUTI) उमेदवारांकडे मराठा समाज जाताना दिसला याचा फायदा महायुतीला(MAHAYUTI) मोठा झाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi)तिन्ही घटक पक्षांमध्ये नसलेला समन्वय त्यामुळे जागावाटप हे समाधानकारक न झाल्यामुळे बंडखोरी झाल्याचे दिसून आले आणि याचाही खूप मोठा फटका हा महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi)झाल्याचे दिसले योग्य उमेदवार न निवडल्यामुळे महाविकास आघाडीला(Mahavikas Aghadi)या निवडणुकीमध्ये अपयश आले
ही प्रमुख कारणे आहेत महायुतीला(MAHAYUTI)महाराष्ट्रात महा यश येण्याचे मागची प्रचार तंत्र हे अत्यंत प्रभावीपणे महायुतीने(MAHAYUTI)राबविल्याचे पाहायला मिळाले सभांचे योग्य नियोजन व जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केले पाहिजे याकडे दिलेले लक्ष या कारणांमुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आणि ही वाढलेली टक्केवारी ही मते महायुतीला(MAHAYUTI)मिळाली आता निवडणूक पार पडल्यानंतर वेद लागले आहेत ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार पण पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सभागृहात नसणार कारण विरोधी पक्षनेते या पदासाठी जेवढ्या जागा हव्या आहेत तेवढ्या महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाला जागा मिळवता आल्या नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पद नसणार महायुतीने निवडणुकीच्या दरम्यान दिलेली आश्वासने ही आश्वासने महायुतीने शंभर टक्के पूर्ण करावीत एवढीच अपेक्षा ही मतदारांची आहे पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने स्थिर सरकार दिलेले आहे मागच्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राची राजकीय अस्थिरता पाहायला मिळाली ती पुढच्या पाच वर्षात पाहिला मिळू नये ही अपेक्षा प्रत्येक महाराष्ट्रातील मतदाराची आहे
महायुतीने(MAHAYUTI)आपला पाच वर्षाचा कार्यकाळ हा यशस्वी रित्या पूर्ण करावा व आता बहुमतात असलेल्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रिया ही वेगवान असेल ही अपेक्षा येणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आपण ठेवायला हरकत नाही