महाराष्ट्र विधानसभा निवडणूक(Maharashtra Assembly Elections)मध्ये दोन्हीही आघाड्यांनी जर सत्तेत आल्यावर आपण कोणती कोणती काम करू याविषयी आश्वासनांचा पाऊस पडत आहे या आश्वासनांना मतदार किती प्रतिसाद देतो हे निकालांती स्पष्ट होईल पण सध्या मात्र मोठ-मोठी स्वप्ने दाखविण्यात नेतेमंडळी व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे
महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे दोन्हीही आघाड्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली जात आहे आपण पाहूया की कोणत्या आघाडीने कोणत्या घोषणा केल्या आहेत
महायुती(MAHAYUTI)
महायुती(MAHAYUTI)मध्ये प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे आपल्या कार्यकाळामध्ये महायुतीने (MAHAYUTI)केलेली कामे याविषयी जनजागृती करण्याची मोहीम ही महायुतीने (MAHAYUTI)निवडणुकीपूर्वीच हाती घेतली होती जेणेकरून सामान्य लोकांपर्यंत आपल्या कल्याणकारी योजना पोहोचाव्यात या दोन साठी महायुतीने(MAHAYUTI)भरपूर प्रयत्न केले विधानसभा निवडणुका(Maharashtra Assembly Elections)जाहीर झाल्यानंतर आपल्या जाहीरनाम्याला अंतिम रूप देण्यासाठी महायुतीने(MAHAYUTI)बराच प्रयत्न केला कोल्हापूर येथे प्रचाराची सुरुवात करताना जाहीरनाम्यातील काही योजना या जनतेसमोर मांडण्यात आल्या आहेत आपण महायुती(MAHAYUTI) व महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)या दोघांच्याही योजनांमध्ये काय फरक आहे व त्याचा फायदा कसा मतदारांना होईल याविषयी चर्चा करूया
लाडकी बहीण योजना
महायुती(MAHAYUTI)च्या या महत्त्वकांक्षी योजनेचा फायदा हा राज्यातील महिलांना व्हायला सुरू झाला आहे त्यांच्या खात्यात देखील पैसे आले आहेत पण या योजनेची व्याप्ती वाढवावी यासाठी अनेक स्तरांमधून मागणी होत होती दीड हजार रुपये हे पुरेसे नाहीत अशी टीका देखील महाविकासमहाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केली या मागणीच्या नंतर मतदानाच्या तोंडावर महायुतीने (MAHAYUTI)या योजनेमध्ये बदल करत महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः या योजनेची घोषणा केली
महालक्ष्मी योजना
राज्यातील महायुतीने(MAHAYUTI)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून दीड हजार वरून 2100 रुपये नेली त्या पाठोपाठ महाविकास आघाडीने देखील अशा स्वरूपाची एक योजना जाहीर केली या योजनेचे नाव महालक्ष्मी असे ठेवण्यात आले या योजनेमधून प्रत्येक महिलेला महिन्याला 3000 रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यात टाकण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने काल प्रचाराचा शुभारंभ करताना दिले गेल्या महिन्यांमध्ये महायुती(MAHAYUTI)च्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका करायला चालू केली होती यामध्ये राज्याची अर्थव्यवस्था ही पार डबघाईला आलेली असताना अशा पद्धतीच्या योजना का जाहीर केल्या असा सवाल महाविकास आघाडीचे नेते महायुती(MAHAYUTI)च्या नेत्यांना करत होते पण त्यांच्याही जाहीरनाम्यात पन्नास टक्के मतदान असलेल्या महिलांना महिन्याला पैसे देण्याची योजना लागू करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीला द्यावेच लागले
शेतकरी कर्जमाफी योजना
प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्याची आठवण ही प्रत्येक राजकीय पक्षाला येतेच कारण भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याबरोबरच यातील मोठ्या प्रमाणात लोक हे ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत व ग्रामीण भागातील मतदारांपैकी बहुतांश मतदार हे शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रत्येकच राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासन देत असतो या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) या दोन्हीही आघाड्यांनी दिली आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर महायुती(MAHAYUTI) ही परत सत्तेत आली तर आपण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले आहे
तर महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांनी सुद्धा जर महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)सत्तेत आली तर तीन लाखापर्यंत चे शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाईल अशी घोषणा केली तसेच महायुतीने(MAHAYUTI)जर महायुती(MAHAYUTI) परत सत्तेमध्ये आली तर केंद्राप्रमाणे सुरू असलेल्या शेतकरी सन्मान निधी मध्ये वाढ करून बारा हजार रुपयांच्या जागी 15000 रुपये वर्षाचे अशी वाढ केली जाईल असे आश्वासन महायुतीने (MAHAYUTI)दिले आहे तसेच महायुती(MAHAYUTI) आणि महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)या दोघांच्याही जाहीरनाम्यामध्ये नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे
वृद्धांना पेन्शन
राज्यातील वृद्धांना प्रतिमा हा दीड हजार रुपये एवढे पेन्शन मिळते तर जर राज्यांमध्ये पुन्हा महायुती(MAHAYUTI)चे सरकार स्थापन झाले तर यामध्ये वाढ करून प्रति महिना 2100 रुपये एवढे पेन्शन दिले जाणार आहे अशी घोषणा महायुती(MAHAYUTI)च्या वतीने करण्यात आलेली आहे
25 लाखापर्यंत मोफत उपचार
महाविकास आघाडीने महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)जर सत्तेत आल्यास 25 लाखापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे अशी घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे वृद्धांना पेन्शन देण्याचे आश्वासन महायुती(MAHAYUTI)ने केले तर मोफत उपचाराचे आश्वासन हे महाविकास आघाडीने दिले आहे
हे हि वाचा-शरीरात जर युरिक ऍसिड वाढले तर होतील गंभीर आजार मुतखडा किंवा संधिवात असल्यास करा हि तसपासणी
महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI)च्या युवकांसाठी घोषणा
महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)महायुती(MAHAYUTI)च्या वतीने युवकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आश्वासनांची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने महायुती(MAHAYUTI)च्या वतीने 25 लाख रोजगार निर्मितीचे घोषणा केली आहे तर राज्यातील दहा लाख युवकांना दहा हजार रुपये विद्या वेतन देण्याचे महायुती(MAHAYUTI)ने जाहीर केले आहे
तर महाविकास आघाडीने युवकांसाठी बेरोजगार तरुणांना प्रति महिना 4000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा केली आहे
तसेच महायुती(MAHAYUTI)ने अंगणवाडी काम करणाऱ्या महिलांना पंधरा हजार रुपये प्रति महिना व विमा सुरक्षा कवच देण्याची घोषणा केली आहे तसेच 45 हजार गावांमध्ये पांदण रस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर हे होणार असल्याची घोषणा महायुती(MAHAYUTI)च्या वतीने करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना या आधीच वीज पंपाचे बिल हे पूर्णपणे माफ करण्यात आले आहे अशी माहिती देखील अजित दादा पवार यांनी दिली आहे त्याचा फायदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती अजित दादा पवार यांनी दिली आहे
MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS-कोणता झेंडा घेऊ हाती ?
महाविकास आघाडीच्या वतीने परत एकदा जातीनिहाय जनगणनेची घोषणा करण्यात आली आहे जर महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)राज्यात सत्तेत आल्यास राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना केली जाणार असल्याची घोषणा केली आहे तसेच आरक्षणाची मर्यादा ही 50% ची आहे ती वाढविण्यासाठी प्रयत्न करू अशा आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे
एकंदरीत वरील महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) या दोघांच्याही आश्वासनाचा बारकाईने अभ्यास केल्यास हे लक्षात येते की मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी या योजना आणल्या गेल्या आहेत यामध्ये कुठेही राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा नीट अभ्यास हा राजकीय पक्षांनी केला नाही असे दिसत आहे
पण वरील योजनांची घोषणा झाल्यानंतर जनसामान्यांमध्ये याबाबतीत संमिश्र विचार आहेत खरं पाहिला गेलं तर सामान्य माणूस हा सध्या महागाईने त्रस्त झालेला आहे तसेच शेतकरी हा आजही आम्ही भाव मिळावा यासाठी झगडताना दिसत आहे एवढ्या दोन मोठ्या प्रश्नांकडे महायुती(MAHAYUTI) व महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)या दोघांनीही काना डोळा केल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांना वीज बिलातून माफी देण्यात आली असली तरी अखंड वीज पुरवठा होण्यासाठी शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे यावर देखील कुठल्याही योजनेची घोषणा ही केली गेली नाही खताचे वाढलेले भाव व शेतीत उत्पादन खर्चात झालेली वाढ या दोन्हीकडेही महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) लक्ष देताना दिसले नाही
तसेच राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) या दोघांनीही कुठलेही भाष्य केलेले नाही त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी कसा लागणार याविषयी मराठा समाजाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे
केलेल्या घोषणा व या घोषणांकडे मतदार कसे पाहतात व आपला कौल कोणाच्या बाजूने देतात हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल पण सध्या तरी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष हे अनेक आश्वासन विचार न करता देताना दिसत आहेत निवडणूक पार पडल्यानंतर सत्तेत आलेल्या राजकीय पक्षांनी आपण दिलेल्या शब्दाची जाण ही त्यांना असावी ही नम्र अपेक्षा ही राज्यातील प्रत्येक मतदाराची आहेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये दोन्हीही आघाड्यांनी जर सत्तेत आल्यावर आपण कोणती कोणती काम करू याविषयी आश्वासनांचा पाऊस पडत आहे या आश्वासनांना मतदार किती प्रतिसाद देतो हे निकालांती स्पष्ट होईल पण सध्या मात्र मोठ-मोठी स्वप्ने दाखविण्यात नेतेमंडळी व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे