संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत पुढील आठवड्यामध्ये केव्हाही महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागू शकते. अशातच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांचा बीड(BEED) जिल्ह्यातील नारायण गड(NARAYAN GAD)येथे दसरा मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)काय बोलतात व त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करू शकतो याविषयी चर्चा करूया
पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत पण या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतोय तो मराठा आरक्षणाचा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या मागणीला यश येताना दिसत नाही गेल्या आठवड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी प्रवर्गात नवीन 15 जातींचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर करून केंद्र शासनाकडे तो पाठविला आहे पण या प्रस्तावामध्ये त्या 15 जातींमध्ये मराठा समाजाचे नाव नाही त्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये नाराजीची भावना आहे अशी सध्या चर्चा आहे अशातच मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी बीड(BEED) जिल्ह्यातील धाकली पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या नारायण गडावर(NARAYAN GAD)दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यामध्ये समाजातील प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी यावे असे आवाहन नारायण गडाचे(NARAYAN GAD)महंत शिवाजी महाराज यांनी केले आहे
नारायण गडाचा इतिहास
बीड(BEED) जिल्ह्यातील नारायण गड(NARAYAN GAD)हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे बीड(BEED) शहराच्या वायव्य दिशेला 21 किलोमीटर अंतरावर नारायण गड(NARAYAN GAD)हे तीर्थक्षेत्र आहे समुद्रसपाटीपासून हा गड 3500 फुट आहे या गडाची अजून एक विशेषता म्हणजे हा गड कोणत्याही बाजूने पाहिला तरी अर्धचंद्र कोर आकाराचा दिसतो या गडाची दक्षिण उत्तर लांबी सात किलोमीटर आहे तर पूर्व पश्चिम लांबी तीन किलोमीटर रुंद आहे या गडावर स्वयंभू महादेवाची पिंड तर विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिरही आहे तसेच या गडाचे पूर्वीचे महंत यांच्या आठ समाध्या देखील तिथे आहेत या गडावर आपण आपली इच्छा व्यक्त केल्यानंतर लगेच आपल्याला त्याचे फळ मिळते म्हणूनच येथील महाराजांना नगद नारायण महाराज असे म्हणतात याच गडावर महंत म्हणून संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनीही काम पाहिलेले आहे सध्या या गडाचे महंत शिवाजी महाराज हे आहेत
नारायण गडावर दसरा मेळाव्याची तयारी
मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी गेल्या महिन्यामध्ये आपले उपोषण स्थगित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी दसऱ्याला श्री क्षेत्र नारायण गड(NARAYAN GAD)येथे भव्य दिव्य असा दसरा मेळावा घेण्याच्या निर्णय घेतला त्यानंतर या गडाच्या पायथ्याशी मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांच्या सभेसाठी तयारी सुरू झाली जवळपास 900 एकर चा भाग हा जो आधी काटेरी झुडपांनी व जंगली झाडांनी वेढलेला होता तो भाग जेसीबीच्या साह्याने अहोरात्र मेहनत करून त्याचे रूपांतर मैदानामध्ये केले गेले यासाठी शेकडो जेसीबी अहोरात्र हे काम करीत होत्या तसेच नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून बुंदीचे वाटप केले जाणार आहे त्यासाठी सात चूलंगणावर अहोरात्र बुंदी तयार करण्याचे काम चालू आहे ही बुंदी 300 क्विंटल ची असेल व प्रत्येक व्यक्तीला जो या मेळाव्यात येणार आहे त्याला प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे
हेही वाचा –http://MAHARASHTRA VIDANSABHA ELECTIO विधानसभा निवडणूक कधी होणार आचार संहिता कधी पासून? https://sankalptoday.com/maharashtra-vidansabha-election-when-to-be-code-of-conduct-from-when/
या मेळाव्यासाठी मेळाव्याच्या परिसरामध्ये 1000 भोंगे लावण्यात येणार आहेत तसेच या मेळाव्याचे प्रक्षेपण करण्यासाठी 70 एलईडी चाही समावेश असणार आहे यामुळे दूरवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांचे विचार ऐकता येतील व त्यांना पाहता देखील येईल या ठिकाणी 50 बेस व दोनशे साऊंड ही लावण्यात येणार आहेत तसेच मेळाव्याच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये 51 डॉक्टरांचा समावेश असेल तर 450 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे दहा खाटांचे आयसीयू रूम देखील तयार करण्यात आल्या आहेत तसेच 14 ठिकाणी वैद्यकीय स्टॉल लावण्यात येणार आहेत या मेळाव्यासाठी 20 टन फुलांची सजावट केली जाणार आहे
या मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित रित्या पार पडण्यासाठी 11000 स्वयंसेवकांची एक टीम तयार करण्यात आली आहे जी आलेल्या प्रत्येक भाविकाला मार्गदर्शन करणार आहे या स्वयंसेवकांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ज्या जबाबदाऱ्या ज्यांना दिले आहेत ते त्याच पद्धतीने आपले काम चोख पार पाडणार आहेत एकूण येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता स्वयंसेवकांची संख्या कमी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वयंसेवक वाढविण्याबाबत सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे तसेच या मैदानाला संपूर्ण भगव करण्यासाठी साडेसात हजार मोठ्या झेंड्याची व्यवस्था करण्यात आली आहे
हे झेंडे या परिसरामध्ये लावण्यात येतील तसेच स्टेजच्या मागील बाजूला रावण दहन देखील केले जाणार आहे 51 जेसीबीच्या साह्याने फुलं उधळली जाणार आहेत तसेच मेळाव्याच्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यातून वियोग ठिकाणावरून 51 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे याव्यतिरिक्त दहा लाख पाणी बॉटल सुद्धा वाटप केल्या जाणार आहेत तसेच नारायण गडवर येणाऱ्या सर्व बाजूंच्या रस्त्यांवर स्वयंसेवकांची तैनाती करण्यात आली आहे या दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)हे स्वतः हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच परगावातून येणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे आहे .
समर्थ मंगल कार्यालय, नगर रोड, बीड(BEED)
आशिर्वाद मंगल कार्यालय, बार्शी रोड, बीड(BEED)
रामकृष्ण मंगल कार्यालय, कॅनॉल रोड, बीड(BEED)
माऊली लॉन्स, नगर रोड, बीड(BEED)
सूर्या लॉन्स, कॅनॉल रोड, बीड़
सिंह्गड मंगल कार्यालय, कॅनॉल रोड, बीड(BEED)
सम्राट लॉन्स, उत्तम नगर, बीड(BEED)
साई पंढरी मंगल कार्यालय, च्हाटा फाटा, नगर रोड, बीड(BEED)
राजयोग मंगल कार्यालय, धानोरा रोड, बीड(BEED)
वरील ठिकाणी मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे
मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)काय बोलणार ?
आपले उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी जाहीरपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ असेल त्यामुळे मनोज जरांगे पाटील ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय भूमिका घेतात काय बोलतात याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे विविध प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत यामध्ये प्रामुख्याने मनोज रंगे पाटील हे महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करणार का याविषयी सुद्धा राजकीय विश्लेषकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे
जर मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी उमेदवार उभे नाही केले तर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हेही पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे
मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांची नाराजी नेमकी कोणाविषयी आहे हे सुद्धा उद्याच्या मेळावा मध्ये स्पष्ट होईल
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा महायुतीला चांगलाच बसला होता आता विधानसभेसाठी मराठा समाज नेमकी काय भूमिका घेतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यासाठी ठराव घेतला गेला व तो केंद्राकडे पाठवलाही गेला केंद्रशासन सुद्धा त्यावर सकारात्मक आहे पण या 15 जातींमध्ये मराठा जातीचा समावेश नाही यामुळे मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)कमालीचे नाराज झाले आहेत
दसरा मेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)नेमकं काय बोलतात व कुठली भूमिका घेतात याविषयी सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे
वरील सर्व गोष्टींचा विचार करता होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अभूतपूर्व आहे तसेच ग्रामीण भागामधून या दसरा मेळाव्याचा जाण्यासाठी हजारो मराठा बांधव तयारी करत आहेत व नारायणगडाकडे ते रवाना देखील झालेले श्री क्षेत्र नारायण गड(NARAYAN GAD)येथील दसरा मेळाव्याला बीड(BEED) पोलिसांच्या वतीने 16 अटी शर्तीसह परवानगी देण्यात आलेली आहे
नारायण गडावर(NARAYAN GAD)होणारा दसरा मेळावा हा आतापर्यंतच्या गर्दीचा सर्व विक्रम मोडणार असल्याची चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये व सोशल मीडियामध्ये आहे