तिरुपती- मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती तिरुमल्ला देवस्थानामधील(Tirupati Tirumalla Temple)प्रसादाच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप केला त्यानंतर तिरुपती तिरूमला देवस्थान कोणत्या घडामोडी यादरम्यान घडल्या देशातील भगवान बालाजीच्या भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहेत
तिरुपती तिरूमला देवस्थान(Tirupati Tirumalla Temple)अर्थात टीटीडी ही एक सरकारी ट्रस्ट आहे ज्या ट्रस्टचा कारभार हा आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने चालविला जातो त्याचे मुख्यालय आंध्र प्रदेश मधील तिरुपती येथे आहे
महाशांती होम चे आयोजन व शुद्धीकरण
तिरुपती मंदिराच्या लाडूच्या प्रसादामध्ये झालेली भेसळ यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत प्रायश्चित्त म्हणून तिरुपती तिरूमला देवस्थान(Tirupati Tirumalla Temple)आर्थत टीटीडी ने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत यामध्ये महत्त्वाचा म्हणजे देवस्थानाने महाशांती होम करण्याचे आयोजन केले आहे यासाठी तिरुपती तिरूमला देवस्थाना (Tirupati Tirumalla Temple)मधील मुख्य पुजारी व इतर पुजारांच्या हस्ते हे महाशांती होम केला जाणार आहे
या संदर्भामध्ये आंध्र प्रदेश सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत यामध्ये
1)मंदिराचे शुद्धीकरण(Purification of the temple)
प्रसादामध्ये झालेली भेसळ यामुळे आता तिरुपती तिरुमल्ला देवस्थानाच्या(Tirupati Tirumalla Temple)वतीने तेथील मुख्य पुजारी व इतर पुजारांच्या देखरेखी खाली मंदिराची पूर्ण शुद्धीकरण करण्यात आले आहे
काल सकाळी ब्रह्म मुहूर्ता मध्ये पुजारी आणि धर्माचार्य यांच्या उपस्थिती खाली मंदिराचे संपूर्ण शुद्धीकरण करण्यासाठी सुरुवात झाली यामध्ये प्रथमता संपूर्ण मंदिरामध्ये पंचद्रव्याने मंदिर धुतले गेले पंचगव्यामध्ये पाच सामग्री असते यामध्ये 1)गाईचे तूप 2)गाईचे दूध 3)गोमूत्र 4)दही 5)गाईचे शेण यांचा समावेश असतो
ही संपूर्ण प्रक्रिया ही मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu)यांनी आगमशास्त्र पंडितांना विचारून शंकराचार्यांशी चर्चा करून वेदांचा संपूर्ण अभ्यास करून हा निर्णय घेतला गेला की मंदिराचे पंचगव्याने शुद्धीकरण केले जावे त्यानंतर संपूर्ण मंदिरामध्ये मंदिराचे गर्भ ग्रह अन्नप्रसाधम रसोई प्रसाद वितरण काउंटर या ठिकाणी संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये पंचगव्याने शुद्धीकरण केले गेले
हे शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मंदिराचे मुख्य पुजारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आता मंदिराची व परिसराची पूर्णपणे शुद्धीकरण झालेले आहे आता कुठल्याही भक्ताला याविषयी शंका मनात राहू नये
हे हि वाचा https://sankalptoday.com/tirupati-balaji-laddu-exposed-fat-in-tirupati-balaji-ladoo-exciting-report/
2)उच्चस्तरीय चौकशीचे आदेश(Order of High Level Inquiry)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूChief Minister Chandrababu Naidu)यांनी एका कार्यक्रमात केलेल्या आरोपानंतर एनडीडीबी चा एक अहवाल सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये आला होता त्याच्या पार्श्वभूमीवर कथित तिरुपती देवस्थान मधील लाडू मध्ये चरबीयुक्त पदार्थ असल्याचा आरोप होत होता या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूChief Minister Chandrababu Naidu)यांनी आय जी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले आहे की जी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून पुढील कारवाई करतील
3)श्रद्धा असलेलेच व्यक्ती यापुढे मंदिराचे सदस्य(Only those who have faith are henceforth members of the temple)
तिरुपती तिरूमला देवस्थानाच्या(Tirupati Tirumalla Temple)समितीच्या सदस्य पदी यापुढे ज्यांची देवावर श्रद्धा आहे अशाच लोकांच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत अशी माहिती तिरुपती तिरूमला देवस्थानाच्या(Tirupati Tirumalla Temple)वतीने देण्यात येत आहे तसेच या विषयासंदर्भात मानक संचारण प्रक्रिया (SOP) तयार केली जाणार असण्याची घोषणा केली
तिरुपती तिरूमला देवस्थान(Tirupati Tirumalla Temple)मध्ये एकूण 29 सदस्य असतात यामध्ये काही सदस्य हे वेगवेगळ्या राज्यातून घेतलेले असतात या सदस्यांचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो त्यानंतर गरज पडल्यास त्यांचा कालावधी वाढविला सुद्धा जाऊ शकतो पण या सदस्यांच्या नियुक्तीचा अधिकार हा पूर्णपणे आंध्र प्रदेश सरकारकडे असतो या ट्रस्टची स्थापना 1933 मध्ये केली गेली
याच विषयाला धरून नांदेड मधील हिंदूवादी नेते एडवोकेट गंगाप्रसाद यन्नावार यांनी संकल्प टुडेशी बोलताना अशी मागणी केली की यापुढे देशातील कुठल्याही मंदिरांच्या समितीवर हिंदू सदस्यांचीच नेमणूक करावी
तुपात भेसळ थांबविण्या करीत नवीन योजना (New scheme to stop ghee adulteration)
तसेच तुपामध्ये झालेल्या भेसळीमुळे आता आंध्र प्रदेश सरकारने काही योजना आखल्या आहेत ज्यामुळे मंदिरांमधील तुपामध्ये भेसळ होण्यापासून रोखता येईल यासाठी ज्या ठिकाणी हे तूप तयार होईल त्या फॅक्टरी मधून तूप सरळ ज्या ठिकाणी लाडू बनविण्यात येतात त्या ठिकाणी येईपर्यंत सॅटॅलाइटच्या मदतीने या टँकरवर नजर ठेवली जाणार आहे
तसेच टँकरच्या दरवाजावर इलेक्ट्रॉनिक लोक टाकले जाणार आहे की जे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही ते उघडता येणार नाही फक्त मंदिरामध्ये आल्यानंतरच या टँकरचे दार हे उघडले जाईल इलेक्ट्रॉनिक लोक असल्यामुळे ओटीपी टाकल्या शिवाय या टँकरचे दार उघडता येणार नाही आणि हा ओटीपी फक्त मंदिरातील उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांकडे असतील या लॉक सोबत छेडछाड करता येणार नाही यामुळे फॅक्टरीमध्ये तयार झालेले तूप त्याच्या शुद्धतेसहित लाडू बनवायचे ठिकाणी पोहोचेल
धर्मपंडितांचे याविषयी काय मत आहे(What do religious scholars think about this?)
तिरुपती बालाजी मंदिराच्या(Tirupati Tirumalla Temple) प्रसादामध्ये झालेल्या भेसळीमुळे धर्मपंडित तसेच पुजारी हे प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे आणि आता त्यांची मागणी आहे ती या प्रकारामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच हिंदू मंदिर हे सरकारी देखरेखीच्या बाहेर काढून ते ट्रस्टच्या हवाली केले जावेत तसेच सनातन बोर्डाची स्थापना करण्यात यावी अशी ही मागणी धर्म पंडित व पुजाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे आता सरकार यावर काय निर्णय घेईल हे पहावे लागेल
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची काय मागणी आहे?(What is the demand of Deputy Chief Minister Pawan Kalyan?)
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी ज्या वेळेला तिरुपती बालाजी मंदिरा(Tirupati Tirumalla Temple)मधील प्रसादाच्या तुपामध्ये भेसळ झाल्याचा आरोप झाला त्यानंतर पवन कल्याण हे चांगलेच व्यतीत झाल्याचे पाहायला मिळाले त्यांनी प्रायचित्त म्हणून 11 दिवसांचा उपवास देखील करायचे ठरवले गुंटूर मधील दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिर मध्ये त्यांनी आपल्या उपासाला सुरुवात केली आहे व त्यांनी तिरुपती तिरुमला देवस्थानच्या वतीने करण्यात येणाऱ्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदविणार आहेत व 2 ऑक्टोबर रोजी प्रायचित्त दीक्षा घेतल्यानंतर ते तिरुपती येथे बालाजी भगवान चे दर्शन करायला जाणार आहेत तसेच त्यांनी देशातील मंदिरांचा कारभार हा सनातन बोर्ड स्थापन करून त्यांच्याकडे यावा अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार करता तिरुपती तिरुमल्ला देवस्थान(Tirupati Tirumalla Temple)मध्ये झालेल्या प्रसादामधील भेसळीमुळे हे संस्थान परत एकदा चर्चेत आहे करोडो भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या या मंदिरामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होणे यामुळे भक्तांना प्रचंड कष्ट झाला आहे
मागील काही वर्षां पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टिकर असलेली गाडीमध्ये पुतळा असलेल्या गाड्या या बालाजीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सप्तगिरी पर्वतावर जाण्यापासून रोखण्यात आल्या त्यामुळे सुद्धा महाराष्ट्रातले भावी हे ट्रस्टच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात नाराज होते अनेकांनी ही नाराजी बोलून दाखवली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनीही तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संपर्क करून या विषयाची दखल घेण्याची मागणी केली होती
मंदिर प्रशासनाने लाडू प्रसादामध्ये चरबीयुक्त तेलाचा वापर झाल्याचा आरोप झाल्यानंतर लगेच शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडली व यापुढे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचा उपयोग केला जाणार असल्याची ग्वाही दिली आहे तसेच आता याविषयी कुठल्याही भक्ताच्या मनात शंका राहू नये अशी माहिती तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या वतीने देण्यात आली आहे
भक्तांची मागणी आहे की या प्रकाराना मध्ये दोषी असणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जावी जेणेकरून पुढे कोणीही असा प्रकार करताना दहादा विचार करेल
आंध्र प्रदेश सरकारने या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एस आय टी तयार करत असून ही चौकशी समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल व त्यानंतर या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू(Chief Minister Chandrababu Naidu) यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच एस आय टी ची स्थापना केली आहे तसेच केंद्र सरकारने देखील याची चौकशी होणार असल्याची घोषणा केली आहे या संदर्भातील सर्व अहवाल हे खाद्य मंत्री जे पी नड्डा यांनी मागविले आहेत
आता भगवान बालाजी व श्रद्धा असणाऱ्या भक्त आता या समितीची चौकशी पूर्ण होऊन दोशींवर काय कार्यवाही होती का याची वाट पाहत आहे
नोट वरील सर्व माहिती ही प्रसार माध्यमांमधून गोळा केलेली आहे