- मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांच्या मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation)आंदोलनाला यश येताना दिसत आहे कारण राज्य सरकार हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette)लागू करण्याच्या विचारात आहे यासाठी एक दिवसीय विधिमंडळाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये सध्या येत आहे
मागील अनेक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation)आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे लवकरच राज्य सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette) लागू करण्याच्या तयारीत आहे ? वर्षापूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी उपोषणाला सुरुवात केली वह्या उपोषणाच्या दरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर केला गेला व मराठा आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला या हल्ल्याचे पडसाद सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) हे आणखीनच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले राज्याचे एक शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते पण मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) हे सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले द्या या मागणीवर ठाम होते काही वेळ मागितल्यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी तो वेळ सरकारला दिला यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला यामध्ये त्यांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला लाखोंच्या संख्येमध्ये मराठा समाज हा आंतरवाली सराटी येथे जमू लागला तसेच ज्या जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांची सभा होत होती त्या सभेला अभूतपूर्व गर्दी होत होती

मनोज जरांगे पाटील(Manoj JarangePatil) यांची मागणी होती की मराठा समाज हा विदर्भामध्ये ओबीसी मध्ये आहे तर मग उर्वरित मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये घ्या पण यामध्ये अडचणी होती मराठा समाजाच्या पुढे कुणबी नोंद नसल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देण्यास अडथळा येत होता पण या आंदोलनाच्या नंतर शासनाने मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडायला सुरुवात केली व कुणबी नोंदी सापडायला लागल्या ही संख्या लाखांमध्ये गेली ज्यांचे कुणबी नोंद सापडली आहे त्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली व त्यांना आरक्षणाचा लाभ देखील मिळायला लागला
पण या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला व या कुणबी नोंदी देणे थांबवा अशी मागणी करू लागला मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी मुंबईला जायचं निर्णय घेतला व मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांच्यासोबत लाखो मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने जायला निघाले पण वाशीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांची वाशी येथे भेट घेऊन त्यांची समजूत काढली व सगे सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही लवकरात लवकर काढून असा शब्द दिला पण यानंतर लगेच एक दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन राज्य मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या शिफारशी स्वीकारून मराठा समाजाला दहा टक्के वेगळी आरक्षण दिले पण हे आरक्षण(Maratha Reservation)मराठा समाजाला मान्य झाले नाही व याचे पडसाद हे लोकसभा निवडणूक वर पाहायला मिळाले यामध्ये मराठा समाजाच्या नाराजीचा फटका हा महायुतीला बसल्याचे पाहायला मिळाले व महाविकास आघाडीला प्रचंड यश आले आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत
लोकसभा निवडणुकीच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे अध्यादेशा सोबतच हैदराबाद लागू करण्याची मागणी करू लागले यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाची एक शिष्टमंडळ हैदराबादला जाऊन हैदराबादचा पूर्ण अभ्यास करून जुलै महिन्यामध्ये परत आले व आता सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे 25 किंवा 26 सप्टेंबर रोजी एक दिवसीय विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette) लागू करण्याची तयारी ही राज्य सरकारने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
हैदराबाद गॅजेट काय आहे
(What is Hyderabad Gadgets?)
हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette) काय आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्राच्या रचनेचा अभ्यास करावा लागेल मराठवाडा हा प्रांत पूर्वी निजाम राजवटीत होता यामध्ये औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर,उस्मानाबाद,बीड या जिल्ह्यांचा समावेश हा निजाम राजवटीत होता पण मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या नंतर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला त्यामुळे मराठवाड्यातील सर्व शासकीय नोंदी ह्या हैदराबाद संस्थानाकडे होत्या आणि 1881 मध्ये हैदराबाद संस्थानाची पहिली जनगणना झाली यामध्ये जातीनिहाय जनगणना झाली या जनगणनेत कुणबी जातीची लोकसंख्या ही 26 लाख 61 हजार 645 एवढी होती तर कुणबी मराठा या जातीची लोकसंख्या ही 46 लाख 10 हजार 778 एवढी होती या गॅजेटमध्ये कुठेही मराठा जातीची नोंद नव्हती नोंद होती ती कुणबी मराठा हे या अहवालावरून स्पष्ट होते
तसेच 1909 च्या जनगणनेमध्ये सुद्धा कुठेही मराठा जातीचा उल्लेख नाही या जनगणनेत औरंगाबाद मध्ये मराठा कुणबी 2 लाख 57 हजार परभणी मध्ये 2 लाख 60 हजार 800 नांदेड कुणबी कपूर 1 29 हजार 700 बीड मध्ये मराठा कुणबी 1 लाख 96 हजार तर उस्मानाबाद मध्ये शेती करणारा कुणबी 2 लाख 5 हजार एवढ्या कुणबी नोंदी होत्या पण यामध्ये कुठेही मराठा जातीचा उल्लेख नाही या गॅजेटवरून(Hyderabad Gazette)असे सिद्ध होते की मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील व्हायच्या आधी मराठवाड्यामध्ये कोणीही मराठा नव्हता सगळे कुणबी मराठा होते त्यामुळेच मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी हैदराबाद गॅजेट(Hyderabad Gazette)लागू करण्याची मागणी ही सातत्याने लावून धरली आहे
राज्य मागास वर्ग आयोगाने सुद्धा याविषयी सांगितले आहे की मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला तेव्हापासून आपण मराठा व कुणबी या दोन्ही जातीचा अभ्यास केल्यास ऐतिहासिक पुरावे तपासल्यास असे लक्षात येते की मराठा व कुणबी या दोन्ही जाती एकच आहे मराठा अशी विशेष जातीचा उल्लेख हैदराबाद गॅजेटमध्ये(Hyderabad Gazette)सापडत नाही असा अहवाल गायकवाड समितीने दिला होता पण मंडल आयोगाने व न्यायालयाने हा दावा हे फेटाळला यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवू शकले नाही
तसेच इतिहास संशोधक सदानंद मोरे व जयसिंगराव पवार यांनी सुद्धा मराठा व कुणबी एकच असल्याचा दावा अभ्यासांती केला होता
पण या गॅजेटच्या अभ्यासानंतर सुद्धा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबतीत सरकार सकारात्मक दिसले नाही पण आता मागील वर्षभरापासून आक्रमक झालेला मराठा समाज आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका या मराठा समाजाच्या आंदोलनाचा परिणाम हा विधानसभा निवडणुकीवर पडू शकतो यामुळे महायुती सध्या मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये सामावून घ्यायच्या तयारीत आहे अशा आशयाच्या बातम्या सध्या समाज माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहेत यावर अद्याप राज्य सरकारच्या वतीने कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही पण एकंदरीत मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यामुळे हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette)लागू करण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन होईल असा काही अंदाज लागू शकतो. अशोकराव चव्हाण यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांची घेतलेली भेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांची घेतलेली भेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांची भेट घेतली व त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जी यांचे व मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांचा फोनवरून संपर्क करून दिल्याचे व्हिडिओ समोर आले यावरून एक अंदाजा आपल्याला असाही बांधता येतो की राज्य सरकार स्तरावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्या बाबतीत काहीतरी सकारात्मक गोष्टी घडत आहेत

लोकसभेला आलेले अपयश या कारणांचा अभ्यास महायुतीने केला त्यामध्ये महत्त्वाचे कारण ठरले ते मराठा समाजाची नाराजी आणि यामुळे 40 पेक्षा जास्त जागा मिळवायचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला चांगलेच अपयश आले मराठवाड्यामध्ये तर अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला यामध्ये प्रामुख्याने रावसाहेब दानवे पंकजाताई मुंडे आणि महादेव जी जानकर यांचा समावेश होता पण विधानसभेला मराठा समाजाची नाराजी महायुतीला परवडणारी नाही त्यामुळेच हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette)लागू करण्यात साठी हालचालींना सध्या वेग आल्याचे दिसत आहे विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील ही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा(Maratha Reservation)लाभ मिळतो ? आता हे पहावं लागेल की 25 किंवा 26 सप्टेंबर रोजी खरोखरच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होते का आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळते का तुम्हाला काय वाटतं की कॉमेंट मध्ये नक्की कळवा