स्वतःच्या चार चाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या जनतेसाठी आनंदाची बातमी आता तुम्ही जिथे राहता तिथून वीस किलोमीटरच्या मध्ये जर टोल नाका(Toll gate) असेल तर तुम्हाला टोल द्यायची गरज नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे यासाठी एक नवीन प्रणाली कार्यान्वित होणार आहे
मागील काही वर्षांमध्ये देशांतर्गत अनेक नॅशनल हायवे(NHAI)चे काम हे झाले आहेत व प्रगतीपथावर आहेत चांगले रोड हे देशातल्या नागरिकांना मिळत आहेत पण यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये टोल नाके(Toll gate) सुद्धा सुरू झालेले आहेत या नॅशनल हायवे वरून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला शुल्क देणे बंधनकारक आहे यासाठी प्रत्येक साठ किलोमीटरवर टोल नाक्याची(Toll gate) उभारणी करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या गाड्यांना फास्टटॅग(Fasttag)लावलेला आहे त्यांच्याकडून टोल फीस ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते त्यामुळे टोल(Toll gate) नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा यापासून ग्राहकांना मुक्ती मिळाली आहे पण या मध्ये मुख्य अडचण येत होती ती ज्या जागी टोल नाका(Toll gate)आहे त्या जागेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांच्या नागरिकांना या टोल बूथ(Toll gate)वरून जाण्या येण्यासाठी शुल्क द्यावा लागत होता काही जागी तर गावाला अगदी लागून असलेल्या टोल नाक्यावर(Toll gate)टोल द्यावा लागत होता आणि हा टोल जाताना आणि येताना द्यावा लागत होता याच कारणामुळे अनेकदा टोल नाक्यावर(Toll gate) भांडण देखील झाल्याचे पाहायला मिळाले पण शासनाने एक परिपत्रक काढून टोलनाक्या(Toll gate)पासून वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना यापुढे त्या टोलनाक्यावर(Toll gate)टोल टॅक्स(Toll tax)द्यायची गरज नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे टोलबुथ च्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे व यासाठी सरकार एक नवीन कार्यप्रणाली आणणार आहे याला जे एन एस एस असते म्हणतात याचा अर्थ होतो ग्लोबल नविगेशन सॅटॅलाइट सिस्टीम म्हणजे आपल्याला वाहनामध्ये जे एन एस एस ऑन बोर्ड युनिट गाडी लावावे लागेल
या आदेशामध्ये नॅशनल परमिट असलेल्या गाड्या तसेच स्वतःच्या मालकीची गाडी या गाड्यांसाठी ही शुल्क(Toll tax)माफी असेल
पण या नवीन कार्यप्रणालीमुळे ही कार्यप्रणाली कार्यान्वित व्हायच्या आधी नेमकी खिशाला किती झळ पोचवणार याबाबत अजून स्पष्टता नाही
तसेच अनेक ग्राहकांना टोल नाक्या(Toll gate)वर कोणकोणत्या सुविधा या दिल्या पाहिजेत याबाबतीत संपूर्ण माहिती नसते आपण आता त्याविषयी चर्चा करूया
100 मीटर वर असलेली पिवळी रेष
आपण टोल नाक्यावर(Toll gate) जाण्याच्या 100 मीटर आधी तुम्हाला एक पिवळ्या रंगाची पट्टी आडवी ओढलेली दिसेल या पट्टीचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमची गाडी टोल नाक्या (Toll gate) जवळ येते जर गाड्यांची लाईन ही पिवळ्या पट्टी पर्यंत आली असेल तर पिवळ्या पट्टीच्या मागील गाड्यांना
टोल टॅक्स(Toll tax)द्यायची गरज नाही कारण यासाठीच फास्टटॅग(Fasttag)सारखी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती जेणेकरून टोल नाक्यावर(Toll gate) जाणारा ग्राहकांचा वेळ हा कमी व्हावा यासाठी फास्टटॅग(Fasttag)यंत्रणेद्वारा टोल टॅक्स(Toll tax)घेतला जातो जर एवढे असून देखील 100 मीटर पर्यंत गाड्या ह्या उभ्या असतील तर तुम्हाला त्या टोल नाक्यावर(Toll gate) टोल द्यायची गरज नाही जर तुमच्या सोबत असे कधी घडले तत्त्वरीत आपल्या खिशातील मोबाईल काढून पिवळ्या पट्टी पर्यंत च्या गाड्यांचा व्हिडिओ तुमच्याजवळ ठेवा नाहीतर टोलबुथ वाले कर्मचारी तुम्हाला गाड्या उद्या नव्हत्याच अशा कारण तुम्हाला सांगतील त्यामुळे तुमच्याजवळ व्हिडिओ जरूर असू द्या
दहा सेकंदाचा नियम(The ten second rule)
समजा तुमची गाडी फास्टटॅग(Fasttag)च्या लाईनी समोर आली व दहा सेकंदामध्ये जर तुमचा फास्टटॅग(Fasttag)स्कॅन करून त्यामधून तुमचा टोल टॅक्स{Toll tax)घेऊन गाडीच्या समोर असलेले टोल गेट(Toll gate)हे आपोआप दहा सेकंदातच उघडले गेले पाहिजे नाहीतर तुम्हाला टोल टॅक्स(Toll tax)द्यायची गरज नाही बऱ्याच वेळा टोल नाका(Toll gate)वरील फास्टटॅग(Fasttag) स्कॅन करणारी मशीन खराब झालेली असते त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळ टोल नाक्यावर(Toll gate) उभे राहावे लागते म्हणून हा 10 सेकंदाचा नियम एन एच ए आय((NHAI))नी घालून दिलेला आहे
जर तुमचा फास्टटॅग खराब आहे म्हणून दुप्पट दंड वसूल करत असतील तर
(If your FASTag is bad then they charge double penalty)
बरेचदा फास्टटॅग(Fasttag)स्कॅन करणारी मशीन टोल नाक्या(Toll gate)वरची खराब झाली असेल तर तेथील कर्मचारी तुम्हाला तुमचाच फास्टटॅग(Fasttag) खराब झाला आहे म्हणून तुमच्याकडून दुप्पट दंड वसूल करतात समजा तुमच्या सोबत असे काही घडले तर तेथील पावती जपून ठेवा व जर पुढच्या टोल नाक्या(Toll gate)वर तुमचा फास्टॅग(Fasttag)स्कॅन झाला तर मागील टोलनाक्या वरचे स्कॅनर मशीन खराब झाली आहे हे सिद्ध होतं यानंतर तुम्ही जर एन एच ए आय च्या(NHAI)टोल फ्री क्रमांक वर किंवा वेबसाईटवर तक्रार केल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील जर टोलनाक्या(Toll gate)वरचे स्कॅनर खराब असेल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही
नॅशनल हायवे ला तुमची गाडी खराब झाली तर(If your car breaks down on the National Highway)
जर नॅशनल हायवे ला तुमची गाडी खराब झाली किंवा अपघात झाल्यास आपण त्वरित एन एच ए आय(NHAI)चा टोल फ्री क्रमांक 1033 वर्त्वैत सूचना द्या जेणेकरून तुम्हाला जागेवर मदत मिळेल पण यामध्ये तुमची गाडी खराब झाली असल्यास तुमच्या गाडीला टो करून नेण्याची शुल्क मात्र गाडी मालकाला भरावे लागेल
टोल नाक्यावर असलेल्या सुविधा(Facilities at toll booths)
प्रत्येक टोल नाक्यावर(Toll gate) महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या शौचालयाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे तसेच टोल नाक्यावर(Toll gate) प्राथमिक उपचार पेटी असणे बंधनकारक आहे जेणेकरून एखाद्या वेळेला तुमची तब्येत बिघडली असेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा इलाज तेथे करता येईल काही टोल नाक्यांवर(Toll gate)ॲम्बुलन्स ची व्यवस्था ही असते वरील सर्व गोष्टी या आपल्या अधिकार आहे त्यामुळे प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव होणे महत्त्वाचे आहे जर टोल कर्मचारी तुमच्याशी उद्धटपणे वागत असतील व वरील नियमांचे पालन करत नसतील तर तुम्ही एन एच ए आय(NHAI)च्या वेबसाईटवर जाऊन किंवा1033 या टोल फ्री नंबर वरून येथील टोल कर्मचाऱ्यांची तक्रार तुम्ही दाखल करू शकता
आपल्या अधिकारांचा योग्य उपयोग करून आपला स्वतःचा फायदा करून घ्या कारण सरकार अशा प्रकारच्या योजना या ग्राहकांच्या हितासाठी आणत असते तरी आपण वरील योजनांचा फायदा जरूर घ्यावा
नांदेड ते लातूर रोडवर असलेला एकमेव टोल नाका(Toll gate)हा माळेगाव यात्रा या ठिकाणी आहे या टोल नाक्या(Toll gate)वरून रोज लोहा तालुका व परिसरातील अनेक नागरिक हे जा करत असतात हा टोल नाका(Toll gate)लोहा शहरापासून 15 किलोमीटरवर आहे त्यामुळे या टोल नाक्यावर(Toll gate)टोल शुल्क(Toll tax)देण्याची गरज नाही जर या टोल नाक्यावर(Toll gate)लोहा शहर व परिसरातील कोणाकडून टोल नाका(Toll gate)घेतल्यास आंदोलनाचा इशारा लोहा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शरद पवार यांनी संकल्प टुडे शी बोलताना यांनी दिला आहे
चांगले रोड मिळणे व त्यासाठी शुल्क भरण्यासाठी देखील नागरिक तयार आहेत पण अनेक जागी रोड अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आणि अशातच जर टोल टॅक्स(Toll tax)द्यायची वेळ आली तर नागरिकांचा संताप हा वाढतो सरकारने आता जे रोड अपूर्ण आहेत त्यावरील टोल नाके(Toll gate) त्वरित बंद करावेत बऱ्याचदा टोल नाक्या(Toll gate)वर असणारे मॅनेजर हे तेथील कर्मचाऱ्यांचे जास्त ऐकतात यातील काही कर्मचारी उद्धट देखील असतात त्यामुळे सुद्धा नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागतं आपण बऱ्याच सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये टोल नाक्या(Toll gate)वरील कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली त्याचे रूपांतर भांडणात झाले अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण हमेशात पहात असतो पण सरकारने देखील या अशा उद्धट टोल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही नागरिकांची अपेक्षा आहे तरी सरकार आता आणखीन काही निर्णय बदलेल अशी आशा सामान्य नागरिकाच्या मनामध्ये आहे
जर तुम्हाला टोल नाक्यावर(Toll gate)कुठल्याही पद्धतीतून चा त्रास होत असेल तर आपण एन एच ए आई(NHAI)च्या वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार दाखल करावी किंवा टोल फ्री क्रमांक1033 वर त्वरित आपली तक्रार दाखल करावी येथे तक्रार केल्यानंतर आपल्याला न्याय हा शंभर टक्के मिळतो
टीप–सदरील लेख हा वेगवेगळे प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे