महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष हा आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याकडे सध्या त्यांचे लक्ष आहे व उमेदवार निश्चित करणे त्याचबरोबर जर सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर सध्या मॅरेथॉन बैठका सर्वच राजकीय पक्षांमध्ये चालू आहे
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही मुख्यतः महायुती यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकनाथराव शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट तर दुसऱ्या बाजूला महास विकास आघाडी सुद्धा निवडणुकीसाठी तयार आहे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेस शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटतसेच महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची सुद्धा मोर्चेबांधणी चालू आहे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी मुख्यतः मागणी केली की निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा याविषयी चर्चा झाली पाहिजे व मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव देखील जाहीर केले पाहिजे पण शरद पवार यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळला व मुख्यमंत्री कोण असेल याविषयी आत्ताच चर्चा करण्यात काही अर्थ नाही निवडणूक झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू असे शरद पवार यांनी सांगितले म्हणजे यावरून स्पष्ट संकेत मिळतात की कुठलीही युती जेव्हा होते आघाडी जेव्हा होते तेव्हा ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा येतील तो पक्ष हा मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार असतो त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील निवडणुकीच्या नंतरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर निर्णय घेतला जाणार आहे काँग्रेसमध्ये असे कोणते चेहरे आहेत की जे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असतील त्याविषयी आपण चर्चा करूया
आ. पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan)के गांधी घराण्याची एकनिष्ठ आहेत व ते सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण हे राज्यसभेचे खासदार होते व काँग्रेसच्या कमिटी मधील अत्यंत महत्त्वाचे नेते होत मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते मंत्री देखील होते यानंतर अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रातील काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती ही पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan)ही होते त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 2010 ते 2014 पर्यंत काम पाहिले काँग्रेस पक्षामध्ये अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले पण पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan)हे मात्र काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले सध्या ते विधानसभेचे आमदार आहेत व जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर एक मराठा नेतृत्व म्हणून व कामाचा अनुभव पाहता पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan)हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती असतील
आ.नाना पटोले
नाना पटोले(Nana Patole)हे सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत व एक आक्रमक नेता म्हणून नाना पटोले(Nana Patole)यांच्याकडे पाहिले जाते
विदर्भातील अत्यंत महत्त्वाचे नेते पूर्वी ते काँग्रेसमध्ये काम करत होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व 2014 च्या निवडणुकीमध्ये ते लोकसभेला विजयी देखील झाले पण 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी तुला सोडचिट्टी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सभापती म्हणून देखील काम पाहिलेले आहे त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भ मराठवाडा तसेच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठे यश आले त्यामुळे नाना पटोले(Nana Patole)यांचे काँग्रेस मधील महत्त्व हे वाढले आहे ते विदर्भातील आहेत व ओबीसी समाजामधून येतात त्यामुळे नाना पटोले यांची कार्य पाहता नाना पटोले(Nana Patole) हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असू शकतात
आ.बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)नगर जिल्ह्यातील संगमनेर येथून बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)हे अनेकदा विजय झालेत व काँग्रेस पक्षाचे मोठे नेते म्हणून ते ओळखले जातात नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखे घराण्याचे खूप मोठा दबदबा आहे पण विखेंना वेळोवेळी शह देण्यामध्ये बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)यशस्वी झाल्याचे दिसत आहे 1995 पासून बाळासाहेब थोरात हे सतत विधानसभेला विजयी झाले आहेत व काँग्रेस पक्षामध्ये त्यांचे स्थान देखील मोठे आहे त्यांनी राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम पाहिलेले आहे आज जर आपण अनुभवी नेत्यांचा जर विचार केला तर बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)यांच्या इतका अनुभवी नेता काँग्रेसमध्ये दुसरा नाही त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्याही नावाचा विचार जर सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदासाठी करू शकते
खासदार वर्षा गायकवाड
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झालेले नाही पण वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)यांच्या रूपाने महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)या पण जर सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार आहेत वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)यांचे वडील एकनाथ गायकवाड हे आहेत ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)या चार वेळा धारावी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून आल्या तर 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मुंबई उत्तर मध्य मधून निवडून आले आहेत राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही युवकांना नेतृत्व करण्याची संधी देणार वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)या अवघ्या 49 वर्षाच्या आहेत यामुळे जर सत्ता आल्यास वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad)यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो
खासदार प्रणिती शिंदे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती ताई शिंदे(Praniti Shinde)या सोलापूर विधानसभा मतदारसंघ मधून अनेक वेळा निवडून आल्या आहेत व 2024 च्या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्या काँग्रेस पक्षाच्या वतीने विजयी झाल्या आहेत त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री असा कार्यकाळ त्यांनी सांभाळलेला आहे सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीय यांपैकी एक सुशीलकुमार शिंदेचे आहेत व यामुळेच जर काँग्रेसची सत्ता आली तर प्रणिती शिंदे(Praniti Shinde)या मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार असतील
आमदार अमित देशमुख
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख(Amit Deshmukh)हे मागील अनेक वर्षापासून मराठवाड्यातील लातूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत तसेच 2019 च्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख व त्यांचे बंधू धीरज देशमुख हे दोघेही विधानसभेसाठी निवडून आलेले आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख हे काँग्रेसचे कट्टर समर्थक व त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेले आहे काँग्रेस पक्षातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांपैकी विलासराव देशमुख हे होते केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी मंत्रिपद भूषवलेले आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा चेहरा म्हणून विलासराव देशमुख यांच्याकडे पाहिले जात होते शरद पवार यांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली अशा कठीण काळामध्ये विलासराव देशमुख यांनी काँग्रेसला परत एकदा भक्कमपणे उभे केले
अमित देशमुख(Amit Deshmukh)देखील मागील अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत व त्यांनी देखील मंत्रिपद भूषवलेले आहे अमित देशमुख(Amit Deshmukh)हे देखील काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात व मराठवाड्यातील एक काँग्रेसचा मोठा चेहरा अमित देशमुख(Amit Deshmukh)हे आहेत त्यामुळे जर महाविकास आघाडी सत्ता आली तरअमित देशमुख(Amit Deshmukh)हे सुद्धा मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असतील
जर महाविकास आघाडीचे सत्ता आली तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार याला कारण आहे आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात जास्त जागा लढविणार आहे एकंदरीत लोकसभेचा विचार करता काँग्रेसला यावेळी 70 ते 75 जागा यायचा अंदाजा आहे त्यामुळे सध्या वरील सर्वनामांची भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या चर्चा चालू आहे तसेच विजय वडेट्टीवार मुकुल वासनिक यांच्या सुद्धा नावाची सध्या चर्चा जोरात चालू आहे
जर महाविकास आघाडीला बहुमत आल्यास काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित आहे ?
त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये आत्तापासूनच मुख्यमंत्री कोण असेल यावर विचारमंथन चालू आहे अशा बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत