महायुतीमध्ये अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या
चालू आहेत आणि यामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी महायुतीतील घटक
पक्षांचे एक तातडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी विधानसभा
निवडणुकीच्या जागा वाटपाचा फार्मूला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
या बैठकीमध्ये सुरुवातीला अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांच्या बद्दल मंत्री
तानाजी सावंत व भाजपाचे(BJP)नेते गणेशराव हक्के यांनी केलेल्या वक्तव्यामुळे
अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)व राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा
सूर होता यावरूनच महायुतीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा सर्वात जास्त गाजला व तिन्ही पक्षांमध्ये
आपापसात कुठल्या प्रकारचे वाईट वक्तव्य न करण्याचे सूचना या कार्यकर्त्यांना देण्याचे ठरले आहे
यामध्ये मुख्य कार्यकर्त्यांना एकमेकांच्या घरीविषयी बोलताना विरोधामध्ये कुठलेच वक्तव्य
करायचे नाही अशा प्रकारच्या सूचना या कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत तसेच काही
लोकांच्या बोलण्यामुळे महायुतीमध्ये तणाव येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे
पुढे या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला ठरविण्यात आला
अशी माहिती आम्हाला सूत्रांनी दिली आहे यामध्ये ज्या जागी जो उमेदवार निवडून येईल त्याच
उमेदवाराला प्राधान्य देण्याचे ठरले आहे व विद्यमान आमदार घेते आहेत तू मतदार संघ हा
त्या पक्षाला देण्याचे ठरले आहे तसेच उर्वरित मतदारसंघांमध्ये व्यवस्थित जागा वाटप करण्यात
आले आहे पुढील दहा दिवसांमध्ये महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा होईल अशी माहिती मिळत आहे
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
सुनील तटकरे व भारतीय जनता पार्टीचे(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेहे उपस्थित होते
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढायची याविषयी पण या
बैठकीत चर्चा झाल्याचे कळत आहे तसेच कार्यकर्त्यांनी वैयक्तिक हेवेदावे विसरून महायुतीचे
काम एका मनाने करावे अशाही सूचना कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत जो पक्ष ज्या जागेवर
दावा करेल त्या जागेवर तो निवडून येईल की नाही याविषयी संपूर्ण माहिती घेतली जाईल तसेच
अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या ही महायुतीकडे जास्त असल्यामुळे यावर
तोडगा काढण्यात आला जो उमेदवार निवडून येईल व तिन्ही पक्षाची याला मान्यता असेल त्याच
उमेदवाराला उमेदवारी देण्यात येणार आहे
या जागा वाटपाच्या फार्मूल्यामध्ये भारतीय जनता पार्टी(BJP)150 जागांच्या आसपास आपले
उमेदवार हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे करतील तर शिवसेना एकनाथराव शिंदे गटाला
60 जागा या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी यातील तर राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)
अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)गट यांना सुद्धा 60 जागा या फॉर्मुल्यामध्ये देण्यात आल्या आहेत
तसेच या बैठकीमध्ये महायुतीतील बाकी घटक पक्षांचा सुद्धा विचार करण्यात आला व या
उर्वरित घटक पक्षांसाठी 18 जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे
या बैठकीनंतर सध्या प्रसार माध्यमांमध्ये कुठलेही वक्तव्य करू नका अशाही सूचना देण्यात आल्या
बैठक संपल्यानंतर प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीत काय झाले असा
प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देण्यात टाळलं व ते गाडीत बसून निघून गेले
काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांनी जागा वाटपावर एका
मेळाव्यात भाष्य करताना आम्हाला कमीत कमी 90 जागा द्याव्यात लागतील असे वक्तव्य केले होते
पण मग आता अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)हे 60 जागांवर संतुष्ट होतील का हा प्रश्न सुद्धा
खूप महत्त्वाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा देण्यात आल्या व
राष्ट्रवादी काँग्रेसचा(NCP)फक्त एकच खासदार लोकसभेला निवडून आला त्यामुळेच विधानसभेसाठी
राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)बॅक फुटला जातीची काय असे वाटत होते पण आता मिळालेल्या माहितीनुसार
60 जागा अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याची माहिती
सूत्रांकडून मिळत आहे तसेच अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांच्या संपर्कामध्ये काही
दुसऱ्या पक्षातील काँग्रेस पक्षातील काही नेते असल्यामुळे त्या जागांपैकी सुद्धा संभ्रम कायम आहे
नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार श्यामसुंदर शिंदे हे तेथील
आमदार असून ते सुद्धा अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांच्या संपर्कात असल्याचे बोलले
जात आहे अशा किमान पाच तास जागी विद्यमान आमदार हे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)
यांच्या संपर्कात असल्यामुळे ठरलेल्या फॉर्मुल्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता दाट आहे
शिवसेना एकनाथराव शिंदे गटाला सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या हक्काच्या लोकसभा
मतदारसंघावर पाणी सोडावे लागले पण लोकसभेला दिलेल्या जागा या शिवसेनेने निवडून
आणल्यामुळे त्यांना या जागा वाटपामध्ये विधानसभेला जास्त जागा मिळतील असा अंदाज होता
पण त्यांच्या विद्यमान आमदारांची संख्या बघतात त्यांना फक्त 18 जागा जास्त मिळतील असा
अंदाज आहे गेल्या विधान निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी(BJP)व शिवसेना हे दोनच पक्ष
असल्यामुळे जागा वाटपावर निर्णय लवकर झाला होता पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये
महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे याला थोडा उशीर लागत आहे आज प्रसार माध्यमांशी बोलताना
भारतीय जनता पार्टीचे(BJP)अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की 10 सप्टेंबर च्या
आसपास आमचा जागा वाटपाचे निश्चित होईल व त्यानंतर आम्ही प्रसार माध्यमांना याविषयी जरूर
माहिती देऊ असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे
महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा(BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे कारण
288 पैकी तब्बल 150 जागा भारतीय जनता पार्टीची(BJP)स्वतः लढवणार आहे यामुळे महायुतीमध्ये
मुख्यमंत्री कोणाचा होईल याविषयी थोडी स्पष्टता जागा वाटपावरून येऊ शकते
10 सप्टेंबर पर्यंत या जागा वाटपाच्या फॉर्मुल्याची घोषणा होऊ शकते तसेच महाविकास आघाडीमध्येसुद्धा जागा वाटपाचा फार्मूला हा तयार झाल्याची चर्चा सध्या चालू आहे लोकसभेला आलेल्या यशा
नंतर महाविकास आघाडीमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस हा
पक्ष उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या दोन गटांपेक्षा अधिक जागा लढविणार आहे महाविकास
आघाडीमध्ये सुद्धा काहीसा फार्मूला हा महायुतीप्रमाणेच असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे जेथे
विद्यमान आमदार आहेत त्या आमदारांना परत उमेदवारी देणे व उर्वरित जागांवर वाटाघाटी करणे
अशा पद्धतीचा फार्मूला हा महाविकास आघाडीचा असू शकतो येत्या काही दिवसांमध्ये महान
विकास आघाडी सुद्धा आपले उमेदवारांची यादी लवकरात लवकर जाहीर करेल असा अंदाज आहे
पण राज्याची सध्या एकंदरीत परिस्थिती बघता राज्यातील जनता ही नेमकं कोणाच्या बाजूने जाईल
याविषयी संभ्रम कायम आहे कारण मराठा आरक्षणामुळे नाराज असलेला मराठा समाज व मराठा
समाजाला ओबीसीत घेऊ नका म्हणून आक्रमक झालेला ओबीसी समाज आणि मुस्लिम समाज हे
वर्ग नेमकी कोणाकडे जाणार याबद्दल राजकीय मंडळीच्या मनामध्ये शंका आहे हे सर्व मुद्दे घेऊन
सर्वच राजकीय पक्ष विधानसभेला कसे सामोरे जातात ते आता पहावं लागेल महिलांवर अत्याचार
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा व बदलापूर सारख्या घटना व या घटनांवर झालेले
राजकारण या गोष्टीमुळे सामान्य मतदारांच्या मनामध्ये चीड बसली आहे कारण छत्रपती शिवाजी
महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची असेल नाहीतर बदलापूर मधील घटनेचे असेल यावर
राजकारण करणे हे महाराष्ट्रातला जनतेला रुचलेलं नाही आणि या नाराजीमुळे हा नाराज झालेला
समाज हा कोणत्या पक्षाच्या पारड्यात आपले मत टाकतो हे अध्यापही स्पष्ट झालेले नाही त्यामुळे
येणारी विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होऊ शकते
विधानसभेसाठी जागा वाटपाचा फार्मूला हा महायुतीचा येणाऱ्या दहा दिवसांमध्ये म्हणजेच 10 सप्टेंबर
रोजी आपल्याला कळेल तसेच महाविकास आघाडी मधील सुद्धा फार्मूला हा फायनल झाल्याचे
माहिती मिळत आहे त्यामुळे दहा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा
निवडणुकीच्या संभाव्यवती कशा असतील हे चित्र स्पष्ट होईल असे संकेत सध्या मिळत आहेत