सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या(Legislative Assembly Elections)निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत आणि यामुळे सध्या
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र बैठका सभा पदयात्रा अशा पद्धतीने मतदारांची संपर्क साधण्याचा प्रयत्न हा राजकीय मंडळी कडून सध्या होताना दिसत आहे तसं पाहायला
गेलं तर महाराष्ट्र हे लोकसभेच्या जागेच्या नुसार देशांमधील नंबर दोनचे राज्य आहे यामुळे व मुंबई ही भारत देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे या राज्याच्या
विधानसभेच्या(Legislative Assembly Elections) निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रात बरीच राजकीय उलतापालथ
झाली यानंतर राज्यातील दोन मोठ्या राजकीय पक्षांचे रूपांतर हे अन्य दोन गटात झाले आता विधानसभेच्या जागांसाठी प्रत्येक राजकीय आघाड्यांमध्ये रस्सीखेच
चालू आहे व यातच काही मतदारसंघ महाराष्ट्रातील चर्चेत आहेत कारण या मतदारसंघांमध्ये थेट नात्यांमध्येच विधानसभेची निवडणूक
(Legislative Assembly Elections) व्हायची दाट शक्यता सध्या तीन विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे या नात्यातील राजकीय लढाया कशाप्रकारे
होऊ शकतात त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया
बारामती विधानसभा मतदारसंघात काका पुतण्या आमने-सामने?
(Uncle Nephew Face to Face in Baramati Assembly Constituency)
बारामती हे नाव आपण उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर पवार कुटुंबीयांचा चेहरा नजरेसमोर येतो याच मतदारसंघांमधून शरद चंद्र पवार यांनी अनेक वर्ष विधानसभा
व लोकसभा गाजवली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते देशाचे कृषिमंत्री या पदापर्यंत शरद पवार(Sharad Pawar)यांनी काम पाहिले शरद पवार यांची दुसरी पिढी देखील
राजकारणात आहे त्यांचे पुतणे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) व शरद पवार(Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे हे दोघे देखील राजकारणात
सक्रिय आहेत अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे राज्यामधील नेतृत्व करतात तर सुप्रियाताई सुळे याकेंद्रामध्ये नेतृत्व करतात पण गतवर्षी अजितदादा पवार
यांनी आपल्या काकांची साथ सोडून महायुतीला पाठिंबा दिला व ते महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्यासोबत त्यांनी सत्ता स्थापन केली
आणि यानंतर काका पुतण्यांमध्ये मोठा संघर्ष हा महाराष्ट्राने पाहिला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह दोन्हीही अजितदादा पवार
(Ajit Dada Pawar) यांच्या गटाला दिले आणि शरद पवार(Sharad Pawar) यांना नवीन चिन्ह तुतारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी हे चिन्ह दिले हे चिन्ह घेऊन
शरद पवार(Sharad Pawar) हे लोकसभेला सामोरे गेले व त्यांच्या गटाने लोकसभेच्या 10 जागा लढविल्या व त्यातील तब्बल आठ जागा या निवडून आणल्या या आठ
जागांमध्ये ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते ती जागा होती बारामती लोकसभा मतदारसंघाची येथून शरद पवार(Sharad Pawar) यांच्या गटातर्फे विद्यमान खासदार
सौ सुप्रियाताई सुळे यांना उमेदवारी दिली तर महायुतीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती मधून अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्या पत्नी
सौ सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी दिली पण या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांनी सुनेत्राताई पवार यांचा सहज पराभव केला याच लोकसभेच्या दरम्यान
अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे कौटुंबिक स्तरावर एकटे पडलेले दिसले कारण पवार कुटुंबीयांनी शरद पवार(Sharad Pawar) यांच्या बाजूला उभे राहणे पसंत केले.
आता होणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्याविरुद्ध अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांचे पुतणे
युगेंद्र पवार(Yugendra Pawar) यांच्या नावाची चर्चा सध्या चालू आहे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे पण ते शरद पवार
(Sharad Pawar) यांच्या संपर्कात असतात लोकसभेला त्यांनी सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार केला अशी चर्चा आहे आणि कार्यकर्त्यांनी आता युगेंद्र पवार यांनाच शरद पवार(Sharad Pawar)
यांनी आपल्या पक्षाची उमेदवारी द्यावी अशी मागणी बारामतीकर करत आहेत पण अद्यापही शरद पवार(Sharad Pawar) किंवा युगेंद्र पवार(Yugendra Pawar) किंवा
अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्याकडून याविषयी कुठलीही घोषणा झालेली नाही पण जर खरोखरच योगेंद्र पवार(Yugendra Pawar) यांना उमेदवारी
शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिली तर परत एकदा बारामती मध्ये काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष पाहायला मिळू शकतो की पवार कुटुंबीय मध्यस्थी करून हा होणारा
राजकीय संघर्ष टाळतात हे पहावे लागेल
दिंडोरी विधानसभा मतदारसंघ मध्ये वडील विरुद्ध मुलगाअशी लढत होऊ शकते?
(In Dindori Assembly Constituency, there could be a fight between father and son)
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघ(Legislative Assembly Elections) मागच्या पाच वर्षांमध्ये बऱ्याच चर्चेत होता कारण येथून विद्यमान आमदार नरहरी झीरवळ
हे आहेत हा विधानसभा मतदारसंघ(Legislative Assembly Elections) राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट होताना नरहरी झीरवळ हे सुरुवातीला
शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून असल्याचे बोलले जात होते पण नंतर त्यांनी अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्यासोबत जाणे पसंत केले आणि आता
विधानसभेला महाविकास आघाडी तर्फे कोण उमेदवार असणाऱ्या विषयी दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये चर्चा सुरू झाली याच दरम्यान शरद पवार(Sharad Pawar) हे
नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नरहरी झीरवळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार(Sharad Pawar) साहेब यांची भेट घेतली व या भेटीमुळे या मतदारसंघातली
राजकीय समीकरणे ही पूर्णपणे बदलली कारण या भेटीच्या नंतर गोकुळ झिरवळ यांनी प्रसार माध्यमांची बोलताना जर शरद पवार(Sharad Pawar) साहेब यांनी आदेश दिला तर
मी दिंडोरी विधानसभा मतदार संघामधून शरद पवार(Sharad Pawar) यांच्या गटातर्फे निवडणूक लढविण्यास तयार आहे माझ्यासमोर माझे वडील हे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील
याची मला पूर्ण जाण आहे तरीपण माझ्यासाठी शरद पवार(Sharad Pawar) यांचा शब्द शेवटचा शब्द आहे असं गोकुळ झिरवळ यांनी बोलताना सांगितले आणि मग दिंडोरी
विधानसभा मतदारसंघांमध्ये पिता विरुद्ध पुत्र असा राजकीय संघर्ष होतो की काय याविषयी चर्चा रंगू लागल्या पण नरहरी झिरवळ यांनी मात्र काहीशी सावध भूमिका घेत असं
काही होणार नाही माझे कुटुंबीय माझ्या मुलाची समजूत काढतील असं मत त्यांनी व्यक्त केलं पण एकंदरीत गोकुळ झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या मतदारसंघां मध्ये
पिता विरुद्ध पुत्र असा संघर्ष होऊ
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात बहिण विरुद्ध भाऊ अशी लढत होऊ शकते?
(In Loha Kandahar Assembly Constituency, there could be a fight between brother and sister)
नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघ पूर्वी या मतदारसंघाचे नाव कंधार विधानसभा मतदारसंघ(Legislative Assembly Elections) होते नंतर ते लोहा
विधानसभा मतदारसंघ झाले हा मतदारसंघ लोकसभेला लातूर लोकसभा मतदारसंघात आहे या मतदारसंघांमध्ये भाई केशवराव धोंडगे यांनी जवळपास 35 वर्ष या
मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर शिवसेनेचे रोहिदासरावजी चव्हाण यांनी दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरांना धोंडगे यांनी पाच वर्ष तर प्रतापराव पाटील चिखलीकर
यांनी दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रताप पाटील चिखलीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली
व त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला लोकसभा निवडणूक लढविण्याच्या आधी प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar)
हे लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते ते खासदार होताच या मतदारसंघामधून त्यांचे दाजी माजी सनदी अधिकारी शामसुंदर शिंदे यांनी निवडणूक लढविली
पण त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागली या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे हे विजयी झाले व शामसुंदर शिंदे यांच्या पत्नी सौ आशाताई शिंदे
या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या व या पती पत्नीने लोहा विधानसभा मतदारसंघांत विकास कामांचा धडाका लावला व या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली 2024 च्या
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांना भारतीय जनता पार्टीने परत एकदा लोकसभेची उमेदवारी दिली पण यावेळी मात्र
प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांना पराभवाचा सामना करावा लागला नांदेड लोकसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे वसंतरावजी चव्हाण हे विजयी
झाले व प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांनी परत एकदा आपल्या मतदारसंघावर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि याच मतदारसंघामधून
प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) यांच्या बहिण सौ आशाताई शिंदे या सुद्धा विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत आशाताई शिंदे यांनी सुद्धा
विधानसभेसाठी आपली तयारी सुरू केली आहे व चिखलीकर हे सुद्धा याच मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार
हे प्रतापराव पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) असू शकतात तर महाविकास आघाडीच्या वतीने तो आशाताई शामसुंदर शिंदे या उमेदवार असू शकतात आशि
चर्चा सध्या या मतदारसंघात व नांदेड जिल्ह्यात चालू आहे जर असे झाल्यास या मतदारसंघांमध्ये भाऊविरुद्ध बहीण अशी लढत पहावयास मिळू शकते
वरील तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये लढत होईल की नाही ते सांगता येत नाही पण या निवडणुकांमुळे कोणाच्याही घरामध्ये कुठलाही संघर्ष तयार होऊ नये हीच नम्र अपेक्षा
प्रत्येकाची असते तरीसुद्धा आता हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल की खरोखरच वरील तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये राजकीय संघर्ष होतो की कुटुंबप्रमुख महत्त्वाची भूमिका पार पाडून
हा संघर्ष टाळतील हे आता पहावे लागेल
Recent News
या तीन विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार नात्यानं मधील राजकीय संघर्ष ?
बारामती, दिंडोरी.लोहा या विधानसभा मतदारसंघा कडे स लागले सर्वांचे लक्ष