महाराष्ट्रामध्ये मागील दोन अडीच वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडवून गेल्या व
यामुळे सबंध महाराष्ट्रातील राजकीय चित्र हे पूर्णपणे बदलले आहे नुकत्याच झालेल्या
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले दोन मोठ्या पक्षात
पडलेली फुट व त्यानंतर घडलेल्या काही राजकीय घडामोडी आता अवघ्या काही महिन्यांमध्ये
महाराष्ट्र मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे आणि या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक
राजकीय पक्षाने आपले मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे गत विधानसभा निवडणुकीत व येणाऱ्या
विधानसभा निवडणुकीत जमीन आसमान चा फरक आहे गतनिवडणुकीमध्ये फक्त चार राजकीय मोठी पक्ष होती
तर या निवडणुकीमध्ये ती संख्या सहा वर जाऊन पोहोचली 1)भारतीय जनता पार्टी 2)शिवसेना शिंदे गट
3)राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4) उद्धव ठाकरे गट 5)शरद पवार गट 6)काँग्रेस यामुळे प्रत्येक राजकीय
पक्षाला विधानसभेमध्ये उमेदवाराची गरज पडत आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये फूट पाहायला मिळत आहे
नांदेड जिल्हा आणि राजकारण (Nanded District and Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने नांदेड जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे कारण या जिल्ह्यामधून
कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी देशपातळीवर तसेच राज्यामध्ये प्रतिनिधित्व केले आहे शंकरराव चव्हाण हे
देशाचे गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत काँग्रेस पक्षामध्ये शंकरराव चव्हाण यांचा फार
मोठा प्रभाव होता गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले शंकरराव हे काँग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्यच्या नंतर च्या कालावधीमध्ये
काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते होते शंकरराव चव्हाण यांची पुढची पिढी देखील राजकारणात आहे यामध्ये त्यांचे
सुपुत्र अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) यांनी सुद्धा लोकसभा तसेच विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे व
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा काम पाहिलेले आहे तसेच चव्हाण परिवारातील
दुसरे राजकीय सदस्य आहेत भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) हे शंकरराव चव्हाण
यांचे जावई व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
यांचे दाजी भास्करराव पाटील खतगावकर( Bhaskar Rao Patil Khatgaonkar)यांनी सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर
मोठा प्रभाव आपल्या कर्तुत्वाने पाडला
ते विधानसभेमध्ये तसेच लोकसभेमध्ये त्यांनी सुद्धा प्रतिनिधीत्व केलेले आहे व मंत्रिपद सुद्धा भूषवलेले आहे शंकरराव चव्हाण यांचे
जावई असून देखील त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये आपला प्रभाव पडला पुढे शंकराव चव्हाण यांच्या निधनानंतर
अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) व भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांच्यामध्ये
काहीसा मनभेद झालेला पाहायला मिळाला पण नंतर या दोघांनी एकत्र येऊन लोकसभेची
निवडणूक लढविण्याचे ठरविले याप्रमाणे भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
यांनी लोकसभेमध्ये नांदेड लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले
याच दरम्यान अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांना आदर्श प्रकरणानंतर
मुख्यमंत्रीपद सोडावे लागले अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) यांनी लोकसभेत जायचा निर्णय घेतला व काँग्रेस पक्षश्रेष्ठी व
भास्करराव पाटील खतगावकर( Bhaskar Rao Patil Khatgaonkar)यांनी
अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) यांना उमेदवारी दिली त्यानंतर अशोकराव चव्हाण लोकसभेला निवडून आले पण याच दरम्यान
भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांची नाराजी समोर आली
त्यानंतर भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांनी
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांना बरोबर
घेऊन अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) यांना शह देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला अशोकराव चव्हाण
आणि भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांनी राजकीय
मतभेद असली तरी सुद्धा कौटुंबिक स्तरावर आपली नाती जपण्याचा प्रयत्न या दोघांनीही केला लोकसभा निवडणुकीच्या
आधी अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर
भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan)
यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले व
तसेच यानंतर अशोकराव चव्हाण व भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांनी
भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे
बरेच प्रयत्न केले पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी
विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली यानंतर आपल्या सुनबाईला उमेदवारी न
मिळाल्याची खंत ही भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांच्या मनात असल्याची चर्चा आहे
व विधानसभेची मीनल ताई यांना उमेदवारी
मिळावी यासाठी भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) आग्रही आहेत पण यामध्ये अडचण
अशी आहे की खतगावकर हे नायगाव
विधानसभेमधून इच्छुक आहेत पण तिथून भारतीय जनता पार्टीचे आमदार हे राजेश पवार हे आमदार आहेत त्यामुळे
भारतीय जनता पार्टी पक्षश्रेष्ठी त्यांना उमेदवारी न देता मीनल ताई खतगावकर यांना उमेदवारी देईल अशी शक्यता खूप कमी आहे
तर दुसरीकडे खतगावकर कुटुंबीयां कडून नांदेड उत्तर मतदारसंघाला प्राधान्य दिले जात आहे पण तेथेही एकनाथराव शिंदे
यांच्या गटाचे नांदेड जिल्ह्यातील एकमेव आमदार बालाजी पाटील कल्याणकर हे तेथील आमदार आहेत व
बालाजी पाटील कल्याणकर यांना उमेदवारी मिळणारच अशी चर्चा आहे कारण एकनाथराव शिंदे यांनी केलेला बंड तेव्हा
पहिल्या दिवशी पासूनच बालाजी कल्याणकर हे एकनाथराव शिंदे यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसले आहे त्यामुळे ही
जागा भाजपाला एकनाथराव शिंदे सोडणार नाहीत असेच काही चित्र सध्या दिसत आहेत
भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पुढील पर्याय (Next option for Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
भास्करराव पाटील खतगावक(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) र हे पूर्वी काँग्रेसमध्ये असल्यामुळे आजही
काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांसोबत
भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांची चांगली मैत्री आहे व अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan)
यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी यामुळे
अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) यांना त्यांच्याच घरातून शह देण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष हे प्रयत्न करत
असल्याची चर्चा आहे यामधूनच भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
यांच्या कुटुंबातील सदस्याला नायगाव किंवा नांदेड उत्तर ज्या मतदार संघामधून
भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) इच्छुक आहेत त्या मतदारसंघांमधून उमेदवारी
देण्याचा प्रयत्न काँग्रेस करू शकते यामुळे
काँग्रेसला नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो कारण भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा खूप मोठा
वर्ग हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे तसेच मुस्लिम समाजामध्ये भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
यांचा प्रभाव मोठा आहे त्याचाही
फायदा काँग्रेसला या निवडणुकीत होऊ शकतो
आता नुकत्याच झालेल्या भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या बड्या मंडळींनी भास्कररावपाटील खतगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निवासस्थान
गाठले यामध्ये माजी सनदी अधिकारी अनिल मोरे काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांचा समावेश होता
काँग्रेसला पण या दोन मतदारसंघांमध्ये चांगल्या उमेदवाराचा शोध चालू आहे त्यामुळे काँग्रेस व मित्र पक्षांची प्रथम पसंती ही
भास्करराव पाटील खतगावक(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) र राहू शकतात आता या दोन जागा नेमक्या कोणाला
सुटतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण ही जागा भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
यांना देऊन त्यांच्या हातामध्ये तुतारी किंवा मशाल किंवा पंजा यापैकी कोणालाही जागा
सुटली तरी भास्कराव पाटील खतगावकर यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न या तीन पक्षांकडून होऊ शकतो
काँग्रेसच्या मंडळींनी घेतलेली भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांची भेट यामुळे सध्या
राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क
काढले जात आहेत नेमकी काँग्रेसच्या या दोन नेत्यांनी वाढदिवसानिमित्त घेतलेली भेट ही भेट होती की निमंत्रण होतं असा प्रश्न
सध्या जनतेच्या मनात पडला आहे
आता नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाऊ विरुद्ध बहीण अशी काही लढत होण्याची शक्यता आहे तर
सबंध नांदेड जिल्ह्यामध्ये दाजी विरुद्ध मेहुना म्हणजेच अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) विरुद्ध
भास्करराव पाटील खतगावकर असा सामना होतो की काय अशी जोरदार चर्चा सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे
तसं पाहायला गेलं तर भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar) यांना जर मीनल ताई खतगावकर
यांना विधानसभेची उमेदवारी द्यायची असेल तर महाविकास आघाडीमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर सध्या तरी दिसत नाही
आणि याचा फायदा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा
खूप मोठा वर्ग हा नांदेड
जिल्ह्यामध्ये आहे आणखी काही दिवसांमध्ये भास्करराव पाटील खतगावकर(Bhaskar Rao Patil Khatgaonkar)
हे भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार की
महाविकास आघाडीमध्ये जाणार हे चित्र स्पष्ट होईल अद्याप खतगावकर कुटुंबीयांच्या वतीने याविषयी कुठल्याही प्रकारचे
भाष्य केले गेलेले नाही सध्या या फक्त चर्चा आहेत