टमाट्याला योग्य भाव मिळत नाही
म्हणून तरी त्रस्त झालेल्या संतप्त
शेतकऱ्याने आपले टमाटे थेट रस्त्यावरून
फेकले
सदरील घटना ही लोहा नांदेड रोडवरची आहे
या राज्य महामार्गावर एका स्थानिक शेतकऱ्याने
टमाट्याला योग्य भाव मिळत नाहीये उत्पादन
खर्च निघत नाहीये म्हणून टमाटे सरळ रस्त्या
वर फेकले यामुळे रस्त्यावर सगळीकडे
लाल लाल टमाटे दिसत होते त्यावरून वाहने
जाताना वाहन चालकाच्या सुद्धा मनामध्ये
त्या शेतकऱ्याच्या नुकसानीची जाणीव होत
होती प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होते
जगाच्या पोशिंद्याला ही वेळ येणे ही
प्रत्येकासाठीच घातक आहे काहीच इलाज
चालत नाहीये काय करावे हे कळत नाहीये
नाईलाजस्तव हा पर्याय त्या शेतकऱ्यांनी निवडला
सदरील शेतकऱ्याचा आंदोलनाचा फायदाही काही
लोकांनी उचलला अनेक फुकट्या लोकांनी टमाटे रस्त्यावरचे उचलून आपल्या घरी नेले व नक्की टमाट्याची भाजी
किंवा टमाटे चटणी चा बेत त्यांनी आखला असेल
शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार कधी गंभीरतेने
पाहणार हाच प्रश्न या प्रसंगी सर्वांना पडला आहे असंच म्हणावं लागेल सगळे तुपाशी आणि जगाचा पोशिंदा उपाशी