श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वादांचा मोठा अनुभव सोनखेड
येथील श्री भास्कर श्रीपतराव मोरे राहणार सोनखेड तालुका लोहा
यांना आलेला स्वामी महाराजांच्या सेवेचा फार मोठा अनुभव दिड वर्षानंतर पुत्ररत्न पोटी दिले.
भास्कर मोरे यांना दोन मुले होते ते या दोन्ही मुलांना घेऊन शिक्षणासाठी
मगनपुरा नांदेड येथे राहत होते. मगनपूरा भागातच श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे .
केंद्रात आरती व पारायण इतर सेवेत ते सहभागी राहात असत. पण नियती पुढे कोणाचे
चालत नसते छोटा मुलगा १२ वर्षाचा वरद जुन २०१३ मध्ये मुलगा सज्जावरून काही
सामान काढत असताना स्टुल वरून खाली पडला व त्याच्या डोक्याला जबरदस्त मार
लागला व तो कोमात गेला होता. तेव्हा खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात
आले उपचार चालू होते.भास्कर मोरे व त्यांची पत्नि सौ रंजनाबई मोरे हे केंद्रात जाऊन स्वामी
महाराजांना त्यांचा मुलगा लवकर बरा व्हावा यासाठी तासनतास जप करत महाराजांना विनंती करत
पण नियतीच्या मनात वेगळेच कांही होते चार दिवसांनी वरद याने शेवटचा श्वास घेतला व
भास्कर मोरे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
भास्कर मोरे यांचा देवावरचा विश्वास उडाला होता.पण शिवाजीनाना मोरे व इतराने त्यांचे
सांतवन केले होणारी घटना होते. स्वामी वरील विश्वास सोडु नका परत सेवेला लागा असे सांगितले
ते सोनखेड केंद्रात येण्यास सुरुवात केली व मगनपूरा नांदेड येथील केंद्रात आरती केली स्वामी
महाराजांना विनंती केली कि महाराज मला दोन मुले होती एक गेला लवकरच दुसरे मुल दिले
तरच मि आपल्यावर विश्वास ठेवेल. भिऊ नकोस मि तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य खरे ठरले.
सतरा महिन्यांनी त्यांना २५ नोव्हेबर २०१४ रोजी सकाळी ८.१५ वाजता मुलगा झाला विशेष
म्हणजे त्या दिवशी मंगळवारची चतुर्थी होती.पहिला मुलगा वारला त्या दिवशी हि मंगळवार
ची चतुर्थी होती वेळही सकाळची ८.१५ वाजताची होती.पहिल्या मुला प्रमाणे प्रत्येक आवड
निवड या मुलाच्या अंगी आहे. अशक्य ते शक्य करून स्वामी महाराजांनी दाखवले.
भास्कर मोरे यांनी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सोनखेड केंदासाठी ४० बाय ७५ इतकी भुमी दान
श्री स्वामी समर्थ महाराजांची
सेवा करा व आशिर्वादरूपी फळ मिळवा
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻