नांदेड : वैद्यकीय व समाजिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य केल्याची
दखल घेत लोह्याचे भूमिपुत्र बालासाहेब अन्नदाते यांना मातोश्री प्रतिष्ठानच्या
वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १९ रोजी आयोजित कार्यक्रमात
“नांदेड भूषण” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मातोश्री प्रतिष्ठान नांदेडच्या
वतीने १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त नांदेड येथे आयोजित विशेष
कार्यक्रमात “गौरव कर्तृत्वाचा” समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
करणाऱ्या मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने “नांदेड भूषण” पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान भाऊ नेव्हल पाटील व विनय सिंधुताई सपकाळ
यांच्या हस्ते लोहा शहरातील भूमिपुत्र बालासाहेब अन्नदाते यांना अत्यंत प्रतिष्ठेचा
समजला जाणारा “नांदेड भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी छावाचे माजी जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे ,प्रमोद धुतमाल ,गोविंद अन्नदाते,
अरिहंत अन्नदाते, राम पाटील मोरे, शिवा बोईवार सह बहुसंख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.