लोहा -मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून अमरण उपोषणाला बसले आहेत
आज पाच दिवस झाले व मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे
यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे
त्याला लोहा शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकाने हॉटेल्स शंभर टक्के बंद ठेवली
लोहा शहरांमध्ये हा बंद 100% आहे
सगे सोयरे या अध्यादेशाची रूपांतर जीआर मध्ये करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे
अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत
मागील पाच दिवसापासून त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतलि नाही असाही निर्णय घेतला
त्यांची प्रकृती खालावत आहे
यामुळेच मराठा समाजाने बंदची हाक दिली नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये तसेच परिसरामध्ये
हा बंद 100% यशस्वी होताना पाहत आहेत वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद
ठेवले आहेत कडकडीत बंद लोहा शहरात आहे वहा बंद शांततेच्या मार्गाने होत आहे
याप्रसंगी संकल्प टुडे शी बोलताना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारने लवकरात लवकर
मनोज रंगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी ही मागणी करण्यात आली आहे
मनोज जनक यांच्या तब्येतीमुळे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती सध्या चिंतेत आहे
सरकारनी ही मनोज जरांगे पाटलांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहावे