लोहा – दोन वर्षापूर्वी संपूर्ण जग करोणाच्या विळख्यात अडकले होते या प्रसंगी माणसाला सर्वात जास्त गरज पडली
ती डॉक्टरांची पहिल्यांदा पी पी ई कीट मध्ये डॉक्टरांच्या रूपात साक्षात देवच इलाज करत आहेत
असे सर्वांना वाटू लागले मुळात दवाखाना म्हटले व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना मंदिरा सारखा वाटतो
डॉक्टर जर गेल्यानंतर हसून व आपुलकीने बोलत असेल तर निम्मा रोग तसाच बरा होतो
धीर देणारा डॉक्टर प्रत्येकाला हवा आसतो नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरांमध्ये डॉक्टर दीपक मोटे
हे साक्षात देवदुतच म्हणावे लागतील करोना काळामध्ये प्रचंड घाबरलेल्या लोकांना धीर देण्याची काम
व स्वतःच्या जीवाची काळजी न करता डॉक्टर मोटेनी ही जबाबदारी यशस्वी पार पडली
नोकरी निमित्त श्री गुलाबराव मोटे हे लोहा शहरात आले त्यांना तीन मुले
त्यातील पहिले संजय जी मोटे यांनी फार्मसी मध्ये शिक्षण पूर्ण केले
दुसरे डॉक्टर दीपक मोटे यांनी वैद्यकीय शास्त्रात शिक्षण पूर्ण केले
तिसरे दिनेश मोटे यांनी पण फार्मसी मध्ये शिक्षण पूर्ण केले
यातील दीपक मोटे यांनीलोहा शहरामध्ये दवाखाना चालू केला प्रेमळ स्वभाव
यामुळे ते प्रत्येकाच्या मनात घर करू लागले गोरगरिबांची वैद्यकीय सेवा करण्याचा
त्यांनी वसा घेतला व हा पूर्णही केला यशाची एक एक पायरी चढत मोटे परिवार जनमानसांना
आपला सा वाटू लागले त्यानंतर करोणाचा भयंकर काळ चालू झाला त्या काळामध्ये
आयुष मधून डॉक्टर मोटे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून लोहा ग्रामीण रुग्णालयात काम करू लागले
करोना च्या भयंकर काळात लोक प्रचंड भिलेले होते याच काळात डॉक्टर मोटे यांनी लोकांना धीर
द्यायचा व या आजाराबाबतीत संपूर्ण माहिती वेगवेगळ्या माध्यमातन त्यांनी द्यायला काम चालू केले
ज्या लोकांना दवाखान्यात ऍडमिट करण्याचे वेळ आली त्यांना सरकारी तसेच खाजगी
दवाखान्यांमध्ये बेड उपलब्ध करून देणे हे काम डॉक्टर दीपक यांनी केले तसेच
हैदराबाद मुंबई पुणे इथल्या आपल्या डॉक्टर मित्रांना संपर्क साधक काही लोकांना
थेट वरील ठिकाणी नेऊन ऍडमिट केले तसेच त्यांच्या घरच्यांचे मनोबल वाढविण्याचे
काम हे डॉक्टर दीपक यांनी केले माजी शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे
लोहा शहराचे माजी नगराध्यक्ष कल्याण सरकार सूर्यवंशी व स्वतः मी संतोष पवार यांना हैदराबाद
मधील अपोलो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिथल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहून प्रचंड मानसिक
आधार दिला व या व्याधीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली पेशंटच्या घरच्यांनी या काळामध्ये सर्व
दवाखान्या बाबतीत चे निर्णय घ्यायचा अधिकार डॉक्टर मोटे यांना दिला त्यामुळे योग्य ते निर्णय डॉक्टरांनी
घेतला माझ्या स्वतःबाबतीत माझा स्कोर सिटीस्कॅन चा जास्त होता तरीपण काही होत नाही सगळं
कमी होऊन जाईल असं म्हणत तो वाईट काळ डॉक्टर दीपक यांनी पार करून दिला
रात्री अपरात्री कधीही फोन केला तरी डॉक्टर दीपक हे फोन उचलत होते व सगळं म्हणणं ऐकून घेत होते
ऍडमिट असलेल्या पेशंटच्या घरच्यांना सर्व माहिती देण्याचे काम डॉक्टर दीपक मोटे यांनी केले
करोना सारख्या महामारी मध्ये अनेक पेशंटचे जीव वाचवले म्हणून मी त्यांना देवदूत असं म्हणतो
मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे करोना काळात देव मंदिरात नाही तर साक्षात पी पी कीट मध्ये होते
असं म्हणावे लागेल डॉक्टर दीपक मोटे यांच्या कर्तुत्वाला संकल्प टुडे चा मानाचा मुजरा
Add A Comment