आज मी तुम्हाला शिक्षा देणार आहे नरेंद्र मोदी खासदारांना बोलले
नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये कामकाज संपल्यानंतर काही खासदारांना म्हणाले
की मी तुम्हाला पनिशमेंट देणार आहे असं बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही खासदारांना घेऊन थेट
संसदेच्या कॅन्टीनमध्ये पोहोचले व खासदारांसोबत जेवण केले
वेळ दुपारचे दोन जागा संसद भवन दुपारच्या विश्रामामध्ये काही खासदार गप्पा मारत उभे होते
व त्यामध्ये एक मंत्री सुद्धा होते ते बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे आले
व खासदारांना पाहून त्यांना म्हणाले की मै आपको पनिशमेंट देने वाला हू हे वाक्य ऐकताच
खासदारांच्या मात्र कपाळाला अटी आल्या आता मोदी आपल्याला कुठली पनिशमेंट देणार
या विचारात ते गुरफटले नंतर हसून नरेंद्र मोदी यांनी एक मंत्री व काही खासदार यांना हाताला
धरून संसदेच्या कॅन्टीनमध्ये नेले व विविध विषयावर चर्चा करत त्यांनी त्यांच्यासोबत जेवण देखील केले
यामध्ये राज्यमंत्री एल मुरगन हिना गावित जयमांग सेरिंग सस्मिता पात्रा रीतेश पांडे
वरील सर्व खासदार यावेळी उपस्थित होते याप्रसंगी पंतप्रधान ची लाईफ स्टाईल तसेच विविध प्रश्नांवर
व अबुधाबी येथे होणाऱ्या मंदिर बाबतीत चर्चा झाली जेवणामध्ये दाल चावल खिचडी व
तिळाचे लाडू असे जेवण सर्वांनी घेतले व बिल नरेंद्र मोदी यांनी दिले
नंतर हसून नरेंद्र मोदी म्हणाले आजची शिक्षा आवडली की नाही
विविध पक्षातील खासदारांसोबत चर्चा करताना नरेंद्र मोदी यांना सुद्धा बरे वाटले