रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आज पतधोरण जाहीर करणार आहेत
आपल्याला वाटते या पतधोरणाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो
आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की पतधोरण म्हणजे काय
सगळ्या बँका या रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली काम करतात
रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या पद्धतीमध्येच बँकांना काम करावे लागते
तसेच व्याजदर कार्यप्रणाली याविषयी सुद्धा रिझर्व बँक बँकांना सूचना करते
बँका या रिझर्व बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या ग्राहकांना देते
ते कसे एका उदाहरणावरून समजून घेऊ
समजा रिझर्व बँकेने बँकांना चार टक्क्याने कर्ज दिले तर
बँका आपला मुनाफा जोडून आठ टक्क्याने ग्राहकांना कर्ज देते
या घेतलेल्या कर्जाला रिझर्व बँकेच्या भाषेमध्ये रेपो असे म्हणतात
तसेच बँकांकडे जी रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम बँकेत न ठेवता
बँका रिझर्व बँकेकडे ठेवून त्यावर व्याज मिळवतात म्हणजे
खात्यात पैसे ठेवून ते वाढत नाहीत पण बँकात गुंतवले तर परतावा मिळतो
बँक काही तसेच करतात यालाच रिझर्व बँकेच्या भाषेमध्ये रिर्वस रेपो असे म्हणतात
जर रिझर्व बँकेने रेपो रेट म्हणजेच कर्ज यावरील व्याज वाढविले तर
बँका ग्राहकांना वाढीव दरामध्ये कर्ज देतात त्यामुळे कर्जाचा हप्ता हा वाढतो
तसेच जर रेपो रेट कमी केला तर बँकांना कर्ज कमी व्याज दरात मिळते
व ते ग्राहकांनाही कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देतात
त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी होतो
आता या धोरणांचा परिणाम हा शेअर बाजार तसेच मोठ्या कंपन्यांवर कसा पडतो
जर कर्ज महागले तर कंपन्या कमी कर्ज घेतात परिणामी त्यांचे उत्पादन घटते व
त्यांना नफा कमी होतो तसेच रेपो रेट वाढल्यामुळे त्यांना कर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ होते
यामुळे सुद्धा कंपन्यांचा नफा कमी होतो त्यामुळे रेपो रेट वाढल्यास शेअर बाजार कोसळतो
व कमी झाल्यास वाढतो ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा
अशा बातम्यांसाठी वेबसाईटवरील बेल आयकॉन चे बटन दाबा